अशोक कुमार (आरमारी अधिकारी)
Appearance
अशोक कुमार हे एक नौदल अधिकारी होते.
| अशोक कुमार (निवृत्त) | |
|---|---|
| [[File:|frameless|alt=]] | |
| जन्म | बहराइच, उत्तर प्रदेश. |
| मृत्यू |
१८ ऑक्टोबर २०२५.७७ वर्षे. मुंबई |
| सैन्यशाखा | भारतीय नौदल |
| हुद्दा | सब लेफ्टनंट |
| सैन्यपथक | पूर्व कमांड |
| लढाया व युद्धे | भारत पाक १९७१ युद्ध |
| पुरस्कार | वीर चक्र |
जीवन व कारकीर्द
[संपादन]कमांडर अशोक कुमार यांचा जन्म उत्तर प्रदेश येथील बहराइच येथे झाला. त्यांचे शिक्षण लखनौ विद्यापीठात झाले.त्यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आयएनएस पनवेल या गस्तीनौकेने जाऊन शौर्य गाजविले होते. ते त्यावेळी युद्धनौकेचे तोफखाना अधिकारी होते. ते पूर्व कमांडच्या युद्धनौका ताफ्यात सब लेफ्टनंट पदावर कार्यरत होते.ते नौदलातून निवृत्त झाले होते.
पुरस्कार
[संपादन]बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या इसवी सन १९७१ च्या युद्धात त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल त्यांना वीरचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
मृत्यू
[संपादन]अलीकडेच शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार,२५ ऑक्टोबर २०२५