अविजीत राय
Appearance
अविजीत राय (बंगाली: অভিজিৎ রায়, १२ सप्टेंबर, इ.स. १९७२ - २६ फेब्रुवारी, इ.स. २०१५:ढाका, बांगलादेश) हे एक विचारस्वातंत्र्याचे आग्रही असलेले बांगलादेशी कार्यकर्ते व लेखक होते. ते एक मुक्तो-मोना नावाची अनुदिनी लिहीत असत. अविजित रॉय हे प्रामुख्याने सरकारी सेन्सॉरशिपविरुद्ध लिहीत. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुक्त अभिव्यक्तिप्रचारक होते. अभिजित रॉय बुद्धिप्रामाण्यवादी आणि निरीश्वरवादी होते. आणि याच कारणासाठी त्यांची बांगला देशात २६ फेब्रुवारी २०१५ रोजी ढाका येथे हत्या करण्यात आली.