अलेस्सांद्रो दे मेदिची
| लिंग | पुरूष |
|---|---|
| स्थानिक भाषेतील नाव | Alessandro di Lorenzo de' Medici, detto il Moro |
| दिलेले नाव | Alessandro |
| आडनाव | मेदिची |
| उत्कृष्ट पदवी | duke |
| नाव | duc Alexandre, Alexandre de Médicis, Alexander |
| जन्म तारीख | २२ जून 1510 |
| जन्मस्थान | फिरेंझे |
| मृत्यू तारीख | ६ जानेवारी 1537 |
| मृत्यूस्थान | फिरेंझे |
| मृत्युची पद्धत | खून |
| चिरविश्रांतीस्थान | बेसिलिका दि सान लॉरेन्झो (फिरेंझे) |
| वडील | लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची |
| आई | Simonetta da Collevecchio |
| भावंडे | कॅथरीन दे मेदिची |
| वैवाहिक जोडीदार | Margaret of Parma |
| सहचर | Taddea Malaspina of Massa-Carrara |
| अपत्य | Giulia de' Medici, Giulio de' Medici, Porzia de' Medici |
| कुटुंब | मेदिची घराणे |
| Significant person | Pietro Bembo |
| व्यवसाय | राजकारणी |
| कार्यक्षेत्र | राजकारण |
| निवासस्थान | Palazzo Vecchio |
| Depicted by | Portrait of Alessandro de' Medici, Alessandro de' Medici as the first Duke of Florence |
अलेस्सांद्रो दे मेदिची (२२ जुलै, १५१० – ६ जानेवारी १५३७) हा १५३२ ते १५३७ दरम्यान फिरेंझेचा ड्यूक होता. फिरेंझेच्या ड्युकांपैकी तो पहिला असून त्याला तो इल मोरो (मूर) असे टोपणनाव होते. त्याची आई काही अंशी आफ्रिकी वंशाची होती असा समज होता. मेदिची घराण्यातील तो फिरेंझेवर राज्य करणारा पहिला वंशपरंपरागत ड्युक होता.
सुरुवातीचे जीवन आणि पालक
[संपादन]मेदिचीचा जन्म फिरेंझे (फ्लोरेन्स) किंवा रोममध्ये झाला असावा असे मानले जाते. त्याच्या वडिलांबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. अधिकृतपणे तो दुसऱ्या लोरेन्झो दे मेदिचीचा असल्याचे सांगितले जात असले[१], तरी अनेक आधुनिक इतिहासकार आणि समकालीन संदर्भ असे सुचवतात की तो प्रत्यक्षात जुलिओ दे मेदिची (जो पुढे पोप क्लेमेंट सातवा झाला) याचा अनौरस मुलगा होता.[२] अलेस्सांद्रोच्या आईचे नाव सिमोनेत्ता दा कोल्लेव्हेकियो होते. ही मेदिची कुटुंबासाठी काम करणारी एक दासी होती. अलेस्सांद्रोच्या शारीरिक ठेवणीवरून आणि वर्णनावरून त्याच्यात काही आफ्रिकी गुण असल्याचे दिसते.[३][४][५][६][७][८] यामुळे त्याला युरोपीय राजघराण्यांतील पहिला कृष्णवर्णीय वंशाचा शासक म्हणून ओळखले जाते.
सत्ता
[संपादन]
१५२७ मध्ये फिरेंझेमध्ये झालेल्या बंडामुळे मेदिची कुटुंबाला शहरातून हाकलून देण्यात आले होते आणि तिथे प्रजासत्ताकाची स्थापना झाली होती. पोप क्लेमेंट सातवा आणि पवित्र रोमन सम्राट चार्ल्स पाचवा यांच्यात झालेल्या तहामुळे मेदिचींनी पुन्हा फिरेंझेवर नियंत्रण मिळवले. १५३० मध्ये फिरेंझेच्या पाडावानंतर अलेस्सांद्रोला सत्तेवर बसवण्यात आले.[९] यावेळी त्याचा चुलतभाऊ इप्पोलितोला डावलले गेल्याने त्यांच्यातील विसंवाद वाढला.[१०]
१५३२ मध्ये त्याला ड्यूक ऑफ द फ्लोरेन्टाइन रिपब्लिक ही पदवी देऊन फिरेंझेचा वंशपरंपरागत शासक घोषित करण्यात आले.[११][१२] याने अनेक शतके अस्तित्त्वात असलेले फिरेंझेचे प्रजासत्ताक नामशेष झाले आणि पुढील २०० वर्षे राजेशाही आले.
शासन आणि धोरणे
[संपादन]अलेस्सांद्रोचे शासन काळ अत्यंत वादग्रस्त होता. त्याने फिरेंझेची जुनी प्रजासत्ताक व्यवस्था मोडीत काढून हुकूमशाही चालवली. त्याच्या क्रूर वागणुकीमुळे आणि अनिर्बंध सत्तेमुळे फिरेंझेच्या अनेक खानदानी नागरिक आणि त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांनी अलेस्सांद्रोला विरोध केला. निर्वासित फ्लोरेन्टाइन नागरिकांनी सम्राट चार्ल्स पाचवा याच्याकडे अलेस्सांद्रोच्या तक्रारी केल्या होत्या, परंतु सम्राटाने त्याचा पाठिंबा काढला नाही.
अलेस्सांद्रोने शहराचे रक्षण करण्याासाठी तेथे फोर्तेझ्झा दा बास्सो नावाचा विशाल किल्ला बांधला. याचे अवशेष आजही शहरात आहेत.[१३]
विवाह
[संपादन]राजकीय संबंध घट्ट करण्यासाठी १५३६ मध्ये अलेस्सांद्रोने सम्राट चार्ल्स पाचव्याची अनौरस कन्या ऑस्ट्रियाची मार्गारेट हिच्याशी लग्न केले. यानंतर एका वर्षातच अलेस्सांद्रोची हत्या झाली.
हत्या
[संपादन]६ जानेवारी १५३७ च्या रात्री अलेस्सांद्रोचा चुलत भाऊ लॉरेन्झिनो दे मेदिची याने त्याचा विश्वासघात करून त्याची हत्या केली. लोरेन्झिनोचा फिरेंझेला हुकूमशाहीतून मुक्त करण्यासाठी आणि प्रजासत्ताकाचे पुनरुत्थान करण्यासाठी आपण हे केल्याचे सांगितले. अलेस्सांद्रोच्या मृत्यूनंतर मेदिची घराण्याची मुख्य शाखा संपुष्टात आली पहिला कोसिमो दे मेदिची आणि सत्तेवर आला.
वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व
[संपादन]अलेस्सांद्रो दे मेदिची हा इटलीतील रिनैसाँ काळातील एक गूठ शासक होता. मेदिची घराण्यातील इतर शासकांसारखे कला आणि साहित्याची वाढ करण्यापेक्षा त्याने लष्करी शक्ती आणि राजकीय वर्चस्वावर अधिक भर दिला. त्याच्या कृष्णवर्णीय पूर्वजांबद्दल आजही संशोधकांमध्ये उत्सुकता आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ A. London Fell (1993). Origins of legislative sovereignty and the legislative state: Modern origins,developments, and perspectives against the Background of "Machiavellism".Book I: Pre-Modern "Machiavellism". Praeger. ISBN 978-0-275-93975-5. 12 January 2012 रोजी पाहिले.
- ↑ Catherine Fletcher, The Black Prince of Florence: The Spectacular Life and Treacherous World of Alessandro de' Medici (London: Bodley Head, 2016), pp. 16, 280–81.
- ↑ Christopher Hibbert (2003). The House of Medici: Its Rise and Fall. Harper Perennial. pp. 151–. ISBN 0-688-00339-7. 10 June 2022 रोजी पाहिले.
- ↑ George L. Williams (2004). Papal Genealogy: The Families And Descendants Of The Popes. McFarland. pp. 74–. ISBN 978-0-7864-2071-1. 12 January 2012 रोजी पाहिले.
- ↑ "The Blurred Racial Lines of Famous Families: Alessandro De Medici". Frontline. c. 1995. 22 October 2022 रोजी पाहिले.
- ↑ "A View On Race And The Art World | FRONTLINE". www.pbs.org. 2024-10-22 रोजी पाहिले.
- ↑ Rogers, J. A., World's Great Men of Color, Volume 2, p. 31 (Touchstone, 1996), आयएसबीएन 0684815826
- ↑ Caroline P. Murphy, Murder of a Medici Princess, p. 9 (Oxford University Press, 2008), आयएसबीएन 978-0-19-531439-7
- ↑ "Africans in Medieval & Renaissance Art: Duke Alessandro de' Medici". Victoria and Albert Museum. 13 January 2011. 5 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 May 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Alessandro | duke of Florence".
- ↑ Hibbert 1999, pp. 250–252.
- ↑ Schevill 1936, pp. 482, 513–514.
- ↑ "Fortezza da Basso". 26 September 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2023 रोजी पाहिले.
- एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका: Alessandro - Duke of Florence
- द मेदिची आर्काइव्ह प्रॉजेक्ट: Historical records on Alessandro de' Medici
- कृष्णवंशीय पूर्वज: Alessandro de' Medici - The First Black Head of State in the Modern Western World[permanent dead link]