अलेक्सांदर लुकोविच
Appearance
अलेक्सांदर लुकोविच (सर्बियन: Александар Луковић; २३ ऑक्टोबर १९८२ , क्रालयेव्हो, युगोस्लाव्हिया) हा एक सर्बियन फुटबॉल खेळाडू आहे. २००५-२०१२ दरम्यान सर्बिया राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला लुकोविच २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियासाठी खेळला आहे. क्लब पातळीवर लुकोविच २००७-२०१० दरम्यान सेरी आमधील उदिनेस काल्सियो तर २०१० पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.