अलेक्झांड्रिया (व्हर्जिनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्झांड्रिया अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. पोटोमॅक नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९,९६६ होती.

अलेक्झांड्रिया वॉशिंग्टन डी.सी. पासून ११ किमी अंतरावर आहे. येथील बव्हंश लोक वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये काम करतात.