अलन्या जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलन्या
जिल्हा
लाल छतांनी सजलेले एक रंगीबेरंगी शहर, एका निळ्या पाण्याने आणि जलपर्यवाह जहाजासह कर्व्ह हार्बरमधून बाहेर पडून लांब पियर्सने वेढलेले.
अलन्या शहराचे केंद्र आणि बंदर
Nickname(s): 
Güneşin Gülümsediği Yer
("जिथे सूर्य हसतो")
देश तुर्कस्तान ध्वज तुर्की
प्रदेश भूमध्य (मेडिटेरियन)
प्रांत अंतल्या
निगमित १८७२
सरकार
 • प्रकार मजबूत नगराध्यक्ष समिती
 • नगराध्यक्ष अडेम मुरात येसेल (नॅशनलिस्ट मुव्हमेंट पार्टी)
 • राज्यपाल डॉ. हसन तानरेसेव्हन
क्षेत्रफळ
 • जिल्हा १,५९८.५१ km (६१७.१९ sq mi)
Elevation
०−२५० m (०–८२० ft)
 • जिल्हा density एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Demonym(s) Alanyalılar
Time zone UTC+3 (Further-eastern European Time)
पोस्टल कोड
०७४००
Area code(s) +९० २४२
Licence plate ०७
संकेतस्थळ www.alanya.bel.tr
www.alanya.gov.tr

अलन्या हा एक तुर्की देशातील दक्षिणेकडील किनारपट्टीवरील अंतल्या प्रांताचा एक घटक जिल्हा आहे. देशाच्या भूमध्य (मेडिटेरियन) प्रदेशात, १३८ किलोमीटर (८६ मैल) अंतरावर अंतल्या प्रांताच्या पूर्वेस वसलेला आहे. याचे पूर्वीचे नाव अलैये असे होते. तुर्कीच्या २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ९८,६२७ होती. या शहराच्या आणि त्याच्या अंगभूत क्षेत्राचा समावेश असलेल्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,५९८.५१ चौरस किमी (६१७.१९ चौ. मैल) होते.

या जिल्ह्याची जागा टौरस पर्वताच्या पायथ्याशी आहे. हा भूमध्य (मेडीटरेनियन) सागरात असलेला लहान द्वीपकल्प आहे. हे स्थान अतिशय मोक्याचे असल्यामुळे हा टॉलेमाइक, सेलेयूसीड, रोमन, बायझॅंटाईन आणि ऑट्टोमन अशा बऱ्याच भूमध्य-आधारित साम्राज्यांसाठी स्थानिक किल्ला होता. अलन्या चे सर्वात मोठे राजकीय महत्त्व मध्ययुगात अलेद्दिन काकबद प्रथमच्या शासनाखाली रामच्या सेल्जुक सुलतानाबरोबर होते, या शहराचे नाव अलेद्दिन काकबद प्रथमच्या नावावरूनच ठेवले आहे. त्याने बांधलेल्या इमारती उदा. काझल कुळे (रेड टॉवर), तर्साने (शिपयार्ड) आणि अलन्या कॅसल या आजही महत्त्वाच्या शहरातील महत्त्वाच्या इमारती आहेत.

अलन्या कडे भूमध्य हवामान, नैसर्गिक आकर्षणे आणि ऐतिहासिक वारसा असल्यामुळे पर्यटनासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. तुर्की देशाच्या नऊ टक्के पर्यटन उत्पन्न याचे क्षेत्रातून येते. या क्षेत्रात तुर्कीमधील तीस टक्के जमीन परदेशी नागरिकांनी खरेदी केलेली आहे. इ.स. १९५८ पासून या भागात पर्यटन वाढले. पर्यटन हे या शहरातील प्रमुख उद्योगधंदा बनला. परिणामी या शहराची लोकसंख्या वाढली. अलन्यामध्ये दरवर्षी उबदार-हवामानाचे क्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सव होतात. इ.स. २०१४ मध्ये नॅशनलिस्ट मुव्हमेंट पार्टीचे अ‍ॅडम मुरत येसेल नगराध्यक्ष बनले. त्यांनी जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीच्या हसन सिपाहीओलु यांना हरवले. हसन सिपाहीओलु इ.स. १९९९ पासून शहराचे नगराध्यक्ष होते.

नावे[संपादन]

शतकानुशतके या शहरावरील राजे अनेक वेळा बदलले आणि त्याचबरोबर या शहराचे नावही बदलत होते. अलन्या लॅटिनमध्ये कोरेसेझियम किंवा ग्रीक भाषेत कोराकेसीन म्हणून ओळखले जात असे. प्राचीन ग्रीक नाव Κορακήσιον होते. याचे नाव लुईयन कोराकसा म्हणजे "पसरनारे शहर" असेही होते. [१] रोमन कॅथोलिक चर्च आजही या शहराला त्याच्या लॅटिन नावानेच ओळखते. रोमन कॅथोलिक चर्चने या नावाचा उल्लेख त्याच्या यादीत केलेला आहे. [२] बायझांटाईन साम्राज्याच्या वेळेस या शहराला कॅलनोरॉस किंवा कॅलन ओरोस म्हणून ओळखले जात होते, याचा अर्थ ग्रीक भाषेत "सुंदर / ललित पर्वत" असा आहे. [३] सेल्जूकांनी शहराचे नाव बदलून अलैये (علائیه) केले, हे सुलतान अलाएद्दीन केकबाद प्रथम यांचे नाव होते. १३ व्या आणि १४ व्या शतकात, इटालियन व्यापाऱ्यांनी या शहराला कॅन्डेलोर किंवा कार्डेलोरो म्हणून संबोधले होते. [४] इ.स. १९३५ मध्ये मुस्तफा कमल अटॅटार्कने या शहराला भेट दिली. त्यावेळेस त्यांनी सध्याचे नाव ठरवले. इ.स. १९३३ मध्ये तारेतील चुकीच्या शब्दलेखनामुळे अलन्यातील 'आय' आणि 'ई' बदलले होते. [५][६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Alanya – Korekesion". Daily Life, Culture, and Ethnography of Antalya. Antalya Valiliği. February 6, 2008. Archived from the original on August 24, 2007. September 7, 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Coracesium". Catholic Hierarchy. October 7, 2013. January 18, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Crane, Howard (1993). "Evliya Çelebi's Journey through the Pamphylian Plain in 1671-72". Muqarnas. 10 (Essays in Honor of Oleg Grabar): 157–168. doi:10.2307/1523182. JSTOR 1523182.
  4. ^ Mason, Roger (1989). "The Medici-Lazara Map of Alanya". Anatolian Studies. 39: 85–105. doi:10.2307/3642815. JSTOR 3642815.
  5. ^ Yetkin, Haşim (1990). Dünden Bugüne Alanya. Antalya: Yetkin Dağitim. Archived from the original on May 13, 2008. March 10, 2008 रोजी पाहिले.
  6. ^ "Alaiye's Becoming Alanya". Alanyanın Web Sitesi. 2008. Archived from the original on 2010-07-29. August 1, 2008 रोजी पाहिले.