Jump to content

अलका कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ. अलका कुलकर्णी या एक वैद्यकीय प्रॅक्टिशनर आणि मराठी लेखिका आहेत. मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आलेल्या अलका कुलकर्णी तेथे ४२हून अधिक वर्षे बालआरोग्यतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे धुळे येथे ६-७ फेब्रुवारी, २०१६ या काळात भरलेल्या पहिल्या शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलनात डॉ. अलका कुलकर्णी यांचे ‘भुलवा’ हे अनुवादित हिंदी पुस्तक प्रकाशित झाले होते.

डाॅ. अलका कुलकर्णी यांची अन्य पुस्तके

[संपादन]
  • चकवा (कादंबरी)
  • स्थलांतर (कादंबरी). सानिया यांची याच नावाची एक कादंबरी आहे.

डाॅक्टर नसलेल्या अलका कुलकर्णी नावाच्या आणखी एक लेखिका आहेत. त्या नाशिकला असतात. त्यांच्या कथा अक्षरगंध, कादवाशिवार, गोदाभूमी, झुंज, तनिष्का, नाशिकदर्शन, निसर्गवेध, प्रतिबिंब, रानफूल, राष्ट्राभिमान, ललना, सहस्रबाहू,आदी मासिकांतून/दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या एका कथेला सावानातर्फे डाॅ. अ.वा. वर्टी पुरस्कार मिळाला आहे. या अलका कुलकर्णींनी लिहिलेली पुस्तके :

  • ओळख (कथासंग्रह)
  • गंध ओलेत्या मातीचा (कवितासंग्रह)
  • देवचाफ्यावरचं चांदणं (कथासंग्रह)
  • नवे स्पंद (कवितासंग्रह)
  • सैलानीबाबा (हिंदीवरून अनुवादित संत साहित्य)