अलका कुबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अलका कुबल
जन्म अलका कुबल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
अलका कुबल

अलका कुबल (माहेरच्या अलका आठल्ये) ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. [१]बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली, इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. "माहेरची साडी " ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या, त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले, यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप अश्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.


अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सचिन अशा मराठीतील आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हिंदीमधल्या चक्र (नसीरुद्दीन शाह), शिर्डी साई बाबा आदी चित्रपटातील भूमिका उल्लेखनीय आहेत.


अलका कुबल-आठल्ये यांना मिळालेले पुरस्कार :-[संपादन]
स्त्रीधन, तुझ्यावाचून करमेना या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचप्रमाणे २०१३चा महाराष्ट शासनाचा विशेष कला पुरस्कार, त्याच वर्षासाठी सह्याद्री वाहिनीचा तसेच बळीराम बिडकर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला, तर युगंधरा या टी व्ही मालिकेसाठी त्यांना आशीर्वाद पुरस्कार मिळाला. पी सावळाराम यांच्या स्मराणार्थ दिल्या जाणाऱ्या गंगा-जमुना या पुरस्काराच्याही त्या मानकरी आहेत.[संपादन]
  1. ^ कुबल, अलका (१ जानेवारी २०१९). विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. नाथीबाई दामोदर ठाकरसी, पुणे: साप्ताहिक विवेक (हिन्दुस्थान प्रकाशन). pp. ८.