Jump to content

अर्नेस्ट बोर्जेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस हे कर्करोग तज्ञ होते. त्यांचे नाव टाटा मेमोरियल हॉस्पिटल ते आयटीसी हॉटेल ह्या रस्त्याला दिलेले आहे.

बालपण

[संपादन]

डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस ह्यांचा जन्म इसवी सन १९०९ मध्ये मुंबईत झाला.त्यांच्या वडिलांचे नाव कजेतन फ्रान्सिस बोर्जेस होते. त्यांच्या आईचे नाव इनेझ द नझारे असे होते. ते मुळचे गोवा राज्यातील उकसीम गावातील रहिवासी होते.त्यांना अनिता बोर्जेस नावाची कन्या होती.[]

शिक्षण

[संपादन]

त्यांचे शिक्षण गिरगाव येथील सेंट तेरेसा हायस्कूल येथे झाले.सेंट झेविअर्स महाविद्यालय येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले.त्यांनी पुढे मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज मधून एम.बी.बी.एस चे शिक्षण घेतले आणि पुढे एम.एस. पदवी मुंबई विद्यापीठ येथून प्राप्त केली.त्यांनी पुढचे शिक्षण इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथे पूर्ण करून एफ. आर. सी. एस फेलोशिप मिळवली.नंतर त्यांनी न्यू यॉर्क येथे मेमोरियल हॉस्पिटल मध्ये काही काळ प्रशिक्षण घेतले.

कारकीर्द

[संपादन]

मुंबई येथील टाटा रुग्णालयात त्यांनी ३० वर्षे चीफ सर्जन म्हणून कारभार पाहिला. सुरुवातीला त्यांनी पोटाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टर बोर्जेस ह्यांचे टाटा हॉस्पिटल हे भारतातील प्रमुख कर्करोग उपचार केंद्र करण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. टाटा रुग्णालयाचे ते इसवी सन १९६७ ते इसवी सन १९६९ पर्यंत संचालक होते. त्यांनी त्यांच्या हयातीत खालील प्रमाणे अनेक संस्थांची जबाबदारी सांभाळली.

  1. सेंट ल्युक मेडिकल गिल्ड -अध्यक्ष.
  2. कथॉलिक मेडिकल बुलेटीन -संपादक.
  3. इंडियन फेडरेशन ऑफ कँथॉलिक गिल्ड -अध्यक्ष.
  4. इंटरनेशनल फेडरेशन ऑफ कँथॉलिक मेडिकल असोसिएशन- उपाध्यक्ष.

पद्मश्री पुरस्कार

[संपादन]

इसवी सन १९६६ मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या हस्ते त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांना पोपकडून कॅथॉलिक चर्च ची सेवा केल्याबद्दल नाइटहूड हा किताब देण्यात आला होता.त्यांना ऑर्डर ऑफ द प्रिव्ही चेंबरलेन हा पुरस्कारही मिळाला होता.

सामाजिक कार्य

[संपादन]

त्यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय व्हावी म्हणून अर्नेस्ट आर्क- डॉ. अर्नेस्ट बोर्जेस मेमोरियल होम हे स्थापन केले होते.त्या संस्थेची इमारत वांद्रे पूर्व कलानगर भागात आहे.इंडियन कँन्सर सोसायटी च्या गोवा शाखेने ७ सप्टेंबर १९७१ रोजी त्यांच्या नावे टपालतिकीट प्रकाशित केले होते. इसवी सन १९६९ मध्ये ३ मार्च रोजी त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.

जन्मशताब्दी

[संपादन]

इसवी सन २००९ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टाटा मेमोरियल हॉस्पिटल ने कर्करोगाच्या आजारावर शोधून काढलेल्या उपचाराबद्दल दिनांक ६ सप्टेंबर २००९ रोजी एका पुस्तिकेचे प्रकाशन करून त्यांच्या स्मृती जागविल्या.त्यांच्या रेनी मारिया बोर्जेस ह्या मुलीने बोर्जेस ह्यांचे खालील पुस्तकरुपाने चरित्र लिहिले आहे.

  1. इन अर्नेस्ट क्वेस्ट::ई. जे. बोर्जेस, लिंजेडरी अँड रिव्हर्ड कँन्सर सर्जन. प्रकाशन जानेवारी २०२३.

[]

संदर्भ

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, रविवार,२१ सप्टेंबर २०२५
  2. महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,२६ जून २०२५