Jump to content

अर्चना (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Archana; અર્ચના; ارچنا; Archana; Арчана; Archana; Archana; Արչանա; Archana; अर्चना; アルチャナ; Archana; ಅರ್ಚನಾ (ನಟಿ); अर्चना; అర్చన; ਅਰਚਨ; অৰ্চনা; அர்ச்சனா; ارچنا (اداکارہ); অর্চনা; Archana; अर्चना (अभिनेत्री); Archana; Archana; Archana; Archana; ارچنا (اداکارہ); Archana; Archana; അർച്ചന; Archana; Archana; آرچانا; ಅರ್ಚನಾ; अर्चना; Archana; أركانا; Archana; Archana; ভারতীয় অভিনেত্রী ও নৃত্যশিল্পী; actrice indienne; ભારતીય અભિનેત્રી અને નૃત્યાંગના; އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; Indian actress and dancer; indische Schauspielerin und Tänzerin; بازیگر هندی; indisk skuespiller; भारतीय अभिनेत्री; arxana; indisk skodespelar; ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി; Indiaas actrice; भारतीय अभिनेत्री और नर्तकी; actores; indisk skuespiller; ভাৰতীয় অভিনেত্ৰী তথা নৃত্যশিল্পী; indisk skådespelare; Indian actress and dancer; இந்திய நடிகை; நடிகை அர்ச்சனா
अर्चना (अभिनेत्री) 
Indian actress and dancer
माध्यमे अपभारण करा
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९७१
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Adyar Film Institute
व्यवसाय
कार्यक्षेत्र
  • Cinema of South India
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3531820
आय.एम.डी.बी. दुवा: nm0033610
विकिडाटावर माहिती संपादित करा

अर्चना (जन्म नाव सुधा) ही एक भारतीय अभिनेत्री आणि कुचीपुडी आणि कथ्थक नृत्यांगना आहे, जी तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमधील तिच्या कामांसाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.[][]

कारकीर्द

[संपादन]

१९८० च्या दशकात, अर्चनाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात विविध छोट्या भूमिकांनी केली, सुरुवातीला तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये. तमिळ मधील थाई पोंगल (१९८०), थुनिव्ह थोझान (१९८०) आणि तेलुगू मधील मधुरा गीतम (१९८१) हे तिचे सुरुवातीचे काही चित्रपट होते ज्यात ती छोट्या भुमीकांमध्ये दिसली होती.

१९८६ च्या तेलुगू चित्रपट निरीक्षणा मध्ये ती एका आदिवासी महिलेची भूमिका साकारते जी भानू चंदरने साकारलेल्या वन अधिकाऱ्याच्या प्रेमात पडते. एका पोलिस अधिकाऱ्याला चुकून मारल्याबद्दल चंदरला जन्मठेपेची शिक्षा होते. पण अर्चना त्याचे प्रेम परत येण्याची वाट पाहते. या चित्रपटासाठी तिला नंदी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला.[] तमिळ चित्रपट वीडू (म्हणजे घर) मध्ये अर्चना एका अविवाहित तरुणीची भूमिका साकारते, जी स्वतःसाठी, तिच्या धाकट्या बहिणीसाठी आणि वृद्ध आजोबांसाठी घर बांधण्याची योजना आखते. बऱ्याच नोकरशाहीच्या संघर्षानंतर, कामगार आणि कंत्राटदारांचे व्यवस्थापन केल्यानंतर, नैसर्गिक आणि वैयक्तिक समस्यांनंतर, ती बांधकाम पूर्ण करू शकते. पण अखेर दुसऱ्या सरकारी संस्थेने ती जमीन त्यांची असल्याचा दावा केला. या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[] या चित्रपटासाठी तिला दक्षिण - तमिळ फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. पुढच्या वर्षी लगेचच, तिला दासी या तेलुगू चित्रपटासाठी तोच पुरस्कार मिळाला. तिने १९२० च्या दशकात एका गुलाम महिलेची भूमिका साकारली होती, जिला घरातील सर्व कामे करावी लागतात तसेच ती ज्या कुटुंबात काम करते त्या कुटुंबातील पुरुष आणि पाहुण्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण कराव्या लागतात.[][]

बुद्धदेव दासगुप्ता दिग्दर्शित, बाघ बहादूर (१९८९) या हिंदी चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती, ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[]

चित्रपटांची यादी

[संपादन]
तमिळ
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
१९८० थाई पोंगल
थुनिव्ह थोझान
१९८२ कधल ओवियम
१९८३ वसंतमे वारुगा
१९८४ नींगल केट्टावई राधा
१९८५ येमात्राथे येमाराथे
पुयाल कदंथा बूमी
१९८७ रेट्टाई वाल कुरुवी तुळशी
१९८८ वीडू सुधा
१९८९ संध्या रागम तुळसी
१९९१ वैदेही वंधाचु
२००७ परातै इंगिरा अढागु सुंदरम् मीनाक्षी
ओनबाधू रुबाई नोट्टू वेलायी
२०१८ केनी सुगंधी
सीताकाठी लक्ष्मी
२०१९ नम्मा वीट्टू पिल्लई थेंमोझी
अझियथा कोलांगल २ मोहना
तेलगू
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
१९८१ मधुरा गीतम
१९८३ पोलीस वेंकटस्वामी
१९८६ निरीक्षणा तुळशी
महिला शिंपी सुजाता
१९८८ उक्कू संकेल्लू
दासी कामाक्षी
योगी वेमन विश्वदा
१९९० मॅटी मानुशुलु
१९९१ भारत बंद
विधाता ज्वाला []
१९९२ चक्रव्यूहम्
प्रेमा द्रोही
१९९४ पच्चा तोरणम
२०२२ <i id="mw9g">चोर बाजार</i>
मल्याळम
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
१९८५ थम्मिल थम्मिल गायत्री
१९८६ मालमुकालिले दैवम मेरी
१९८९ पिरावी चाक्यारची मुलगी
१९९१ ओणम मुहूर्तम राधिका विश्वनाथ
१९९२ यमनम अंबिल
१९९४ संमोहनम पेनू
१९९६ मॅडम्मा
२०१८ किनार सुगंधी
कन्नड
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
१९८४ प्रेमिगाला सावल
१९८६ बेली नागा
गुरी शांतादेवी
१९८७ ओंडू मुत्तीना काठे काकी
१९९६ हुलिया मायदानी

दूरदर्शन

[संपादन]

२०२२ ते २०२३ अर्चनाने मीनाक्षी पोननुंगा (अर्थ - मीनाक्षीच्या मुली) या झी तमिळवरील टीव्ही मालिकेत मीनाक्षीची मुख्य भूमिका साकारली. ही तिची पहिली दूरदर्शन मालिका होती. पण तिला कार्यक्रमाचा आशय आवडला नाही आणि म्हणूनच एप्रिल २०२३ मध्ये तिने मालिका सोडली आणि तिच्या जागी अभिनेत्री श्रीरंजनी आली.[]

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी चित्रपट
१९८६ नंदी पुरस्कार नंदी स्पेशल ज्युरी पुरस्कार निरीक्षणा (१९८६)
१९८८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वीडू (१९८७)
१९८९ फिल्मफेर पुरस्कार दक्षिण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - तमिळ
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दासी (१९८८)
२००७ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट पात्र कलाकार (स्त्री) [१०] ओंबाधू रुबाई नोट्टू (२००७)

संदर्भ

[संपादन]
  1. "Waiting for good roles: Archana". द हिंदू. 4 May 2007. 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2010 रोजी पाहिले.
  2. "Star Talk - Archana". IndiaGlitz. 22 August 2007. 24 August 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2010 रोजी पाहिले.
  3. "నంది అవార్డు విజేతల పరంపర (1964–2008)" [A series of Nandi Award Winners (1964–2008)] (PDF) (Telugu भाषेत). Information & Public Relations of Andhra Pradesh. 23 February 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 August 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. "Indian Cinema 1988". Directorate of Film Festivals. p. 76. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 19 April 2015 रोजी पाहिले.
  5. "Award-winning B. Narasinga Rao brings quality to Telugu cinema". India Today.
  6. "36th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 3 March 2012 रोजी पाहिले.
  7. "Pawan Malhotra: Buddhadeb Dasgupta's Bagh Bahadur enriched the repertoire I have today". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-03-30 रोजी पाहिले.
  8. "Vidhata 1991 Telugu Movie Cast Crew, Actors, Director, Vidhata Producer, Banner, Music Director, Singers & Lyricists". MovieGQ (इंग्रजी भाषेत). 2023-10-23 रोजी पाहिले.
  9. "Sri Ranjani joins TV show 'Meenakshi Ponnunga'; here's what the actress has to say". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-06-05. ISSN 0971-8257. 2023-06-11 रोजी पाहिले.
  10. "Rajini, Kamal win best actor awards". द हिंदू. Chennai, India. 29 September 2009. 8 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 September 2009 रोजी पाहिले.