अरविंद वेगडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरविंद वेगडा (जन्म ५ ऑक्टोबर १९७४ -गुजरात, भारत ) हा एक भारतीय गुजराती लोकगायक आहे. २०१५ मध्ये बिग बॉस ९ या रिऍलिटी शोमध्ये तो एक स्पर्धक होता.[१][२][३]

मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]

वेगडा याचा जन्म १९७४ रोजी अहमदाबादमध्ये झाला. त्याचे शालेय शिक्षण विद्यानगर हायस्कूलमधून पूर्ण झाले. त्याने डिप्लोमा इन ड्रामामध्ये प्रवेश घेतला पण कॉमर्सची पदवी घेण्यासाठी त्याने ती सोडली. सुरुवातीला त्याचाकडे संगीताचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नव्हते. त्यानी नरेंद्र राव यांच्या हाताखाली हार्मोनियम शिकण्यास सुरुवात केली आणि नंतर २००२ मध्ये त्यानी एक ऑर्केस्ट्रा स्थापित केला. अहमदाबादमध्ये त्यानी नवरात्रीच्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केले. २००६ मध्ये, मणिराज बारोट यांच्या आकस्मिक निधनानंतर, त्यांना अहमदाबाद येथे नवरात्री गरबा सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते जिथे त्यांनी पहिल्यांदा "भाई भाई" हा गाणे सादर केले.[४]

कारकीर्द[संपादन]

त्यांनी नरेंद्र राव यांच्या हाताखाली हार्मोनियम शिकण्यास सुरुवात केली आणि नंतर २००२ मध्ये त्यांनी एक ऑर्केस्ट्रा स्थापन केला. त्यांनी नवरात्रीच्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केले. २००६ मध्ये, मणिराज बारोट यांच्या आकस्मिक निधनानंतर, त्यांना अहमदाबाद येथे नवरात्री गरबा सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते जिथे त्यांनी पहिल्यांदा भाई भाई हे गाणं सादर केले.भाई भाई या गाण्यासाठी त्यांना ओळख मिळाली. २०१२ च्या गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षानेही त्यांची निवड केली होती.२०१५ मध्ये, त्याने बिग बॉस ९ या रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. त्याने २०१६ च्या फॅन या हिंदी चित्रपटातील जबरो फॅन या गाण्याचे प्रमोशनल गुजराती आवृत्ती गायले.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Desk, India TV News (2015-10-11). "Bigg Boss Contestant No 14 Arvind Vegda | IndiaTV News". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Bigg Boss 9: Arvind Vegda accuses Salman Khan and Colors of rigging votes!". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-02-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Arvind Vegda Eliminated in Big Boss 9 Double Eviction". The New Indian Express. 2022-02-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Arvind Vegda in Bigg Boss 9 Double Trouble". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2015-10-13. 2022-02-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Arvind Vegda evicted from Bigg Boss house, who'll be next?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2015-11-01. 2022-02-17 रोजी पाहिले.