अरण्य कांड
| ह्याचा भाग | रामायण |
|---|---|
| Form of creative work | कविता |
| Has version, edition or translation | Ramayan (Aranyakanda) |
| लेखक | वाल्मीकि |
| वापरलेली भाषा | संस्कृत भाषा |
अरण्य कांड हा हिंदू धर्मग्रंथ रामायण मधील तिसरा भाग आहे. वाल्मिकी यांनी रचलेल्या ह्या महाकाव्याचे सात भाग आहेत.

सारांश
[संपादन]वनवासात राम, सीता आणि लक्ष्मण गोदावरी नदीच्या काठावर दक्षिणेकडे प्रवास करतात. तिथे ते एक कुटी बांधतात आणि वावरु लागतात. एक दिवस, पंचावटी वनात त्यांच्याकडे रावणाची बहीण राक्षसी शूर्पणखा येते. ती राम-लक्ष्मण या भावांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करते आणि असफल झाल्यानंतर, ईर्ष्याने सीतेला मारण्याचा प्रयत्न करते. लक्ष्मण तिचे नाक आणि कान कापून तिला थांबवतो. हे ऐकून तिचे भाऊ खर आणि दुशण राजकुमारांविरुद्ध हल्ला आयोजित करतात. राम, खर आणि त्याच्या राक्षसांवर विजय मिळवतो.
हे सर्व घडल्याचे रावणाला कळल्यावर, तो रामाचा संहार करण्याचा निर्णय घेतो आणि राक्षस मरीचिच्या साह्याने सीतेला पकडण्याचा कट रचतो. मरीचि एक सोन्याच्या हरणाचे रूपांतर करून सीतेचे लक्ष वेधतो. हरणाच्या सुंदरतेने मंत्रमुग्ध झालेली सीता रामाला ते हरण पकडण्याची विनंती करते. रामाला माहीत असते की ही राक्षसांची माया आहे, परंतु तो सीतेला तिच्या इच्छेपासून दूर करू शकत नाही आणि हरणाचा पाठपुरावा करतो. तो सीतेला लक्ष्मणाच्या देखरेखीखाली सोडतो.
काही वेळाने, सीता ऐकते की रामाने तिला हाक मारली आहे. ती लक्ष्मणाला रामाच्या मदतीस धावून जाण्याचे आग्रह करते. लक्ष्मण तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो की रामाला सहजपणे हानी पोहोचू शकत नाही आणि तिचे रक्षण करण्यासाठी रामाचे आदेश पाळणे सर्वोत्तम आहे. पण ह्या संकटकाळा जवळ सीता ठाम राहते की मदतीची गरज तिला नाही तर रामाला आहे. लक्ष्मण तिची इच्छा पाळतो पण अट ठेवतो की तीने कुटी सोडू नये किंवा कोणत्याही अनोळखीला आत आणू नये. त्यानंतर तो लक्ष्मणरेखा काढतो की कोणताही राक्षस त्याला पार करू शकणार नाही, आणि रामाला मदत करण्यासाठी निघतो. जेव्हा सीता एकटी असते तेव्हा रावण एका साधूच्या रूपात प्रकट होतो आणि सीतेच्या आदरातिथ्याची विनंती करतो. इथे सीता फसते आणि नंतर रावणाद्वारे बळजबरीने तिचे हरण होते.[१]
जटायू पक्षी, सीताला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण गंभीर जखमी होतो. लंका येथे सीताला राक्षसींच्या ताब्यात ठेवले जाते. रावण सीतेला त्याच्याशी लग्न करण्यास सांगतो, पण ती रामावर पूर्ण श्रद्धा ठेवत असल्यामुळे नकार देते. दरम्यान, राम आणि लक्ष्मण जटायूकडून सीतेच्या अपहरणाची माहिती मिळवतात आणि तिला वाचवण्यासाठी त्वरित निघतात. शोधदरम्यान, त्यांना संन्यासी शबरी भेटते जी त्यांना सुग्रीव आणि हनुमानकडे मार्गदर्शन करतात.
ह्या पुढील भाग हा किष्किंधा कांड आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ Rajarajan, R. K. K. (2001). "Sītāpaharaṇam: Changing thematic Idioms in Sanskrit and Tamil". In Lonne, Dirk W. (ed.). Tofha-e-Dil: Festschrift Helmut Nespital. Reinbeck. pp. 783–97. ISBN 3-88587-033-9. 4 May 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
