Jump to content

अयोध्या विवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अयोध्या विवाद
controversy
देशभारत संपादन
अयोध्या वादग्रस्त जागेचा नकाशा

अयोध्या वाद हा भारतातील राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक-धार्मिक वादविवाद आहे, जो उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरातील जमिनीच्या भूखंडावर केंद्रित होता.हिंदूं धर्मामध्ये पारंपारिकपणे रामाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या जागेच्या नियंत्रणाभोवती हा वाद आहे. पूर्वीचे हिंदू मंदिर पाडून येथे बाबरी मशीद उभारण्यात आली होती. नंतर ही मशीद १९९२ मध्ये पाडण्यात आली होती.

६ डिसेंबर १९९२ रोजी एका राजकीय रॅलीत बाबरी मशीद पाडण्यात आली आणि संपूर्ण भारतीय उपखंडात दंगली भडकल्या.[१][२][३] यापूर्वी असे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले होते, त्यापैकी एक १९९० मध्ये होता ज्यात गोळीबाराची घटना घडली.[४]त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयत जमीन हक्काचा खटला दाखल करण्यात आला, ज्याचा निकाल ३० सप्टेंबर २०१० रोजी देण्यात आला. निकालात, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींनी असा निर्णय दिला की अयोध्याचा हा भूखंड तीन भागांमध्ये विभागला जावा, एक तृतीयांश राम लल्ला किंवा बाल राम यांच्याकडे जाईल ज्याचे प्रतिनिधित्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे,[५] एक तृतीयांश भाग उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे जाईल आणि उर्वरित तिसरा निर्मोही आखाडा या हिंदू धार्मिक संप्रदायाकडे जाईल. वादग्रस्त मशीद ही जुने मंदिर पाडल्यानंतर बांधण्यात आली आहे की नाही ह्यावर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे एकमत नव्हते, परंतु त्याच जागेवर मशिदीच्या आधी मंदिराची रचना होती हे मान्य केले गेले.[६][७]

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान मालकी हक्काच्या विवाद प्रकरणांची सुनावणी केली.[६][८]नोव्हेंबर २०१९ रोजी, त्तकालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल जाहीर केला; त्याने मागील निर्णय रद्द केला आणि कर नोंदींच्या आधारे जमीन सरकारची असल्याचा निर्णय दिला.[९]हिंदू मंदिर बांधण्यासाठी ही जमीन ट्रस्टला देण्याचे आदेश दिले व मशीद बांधण्यासाठी उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला पर्यायी २.० हेक्टर (५ एकर) जमीन देण्याचे आदेशही सरकारला दिले.[१०]

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला या जागेच्या उत्खननादरम्यान मंदिराचे अवशेष सापडले होते जे नंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पुरावा म्हणून वापरले गेले.[११][१२]

५ फेब्रुवारी २०२० रोजी, भारत सरकारने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाच्या ट्रस्टद्वारे तेथे राम मंदिराची पुनर्रचना करण्याची घोषणा केली.[१३]तसेच १९९२ मध्ये पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या एवजी मशीद बांधण्यासाठी अयोध्येतील धन्नीपूर येथे पर्यायी जागेचे वाटप केले गेली.[१०][१४][१५]

धार्मिक पार्श्वभूमी

[संपादन]

ज्या भूमीवर मध्ययुगीन मशीद, बाबरी मशीद उभी होती, ती हिंदू देवता रामाची जन्मभूमी मानली जाते आणि ती अयोध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.[१६]

रामजन्मभूमी

[संपादन]

राम हे सर्वात मोठ्या प्रमाणावर पूजा केले जाणारे हिंदू देवतांपैकी एक आहे आणि देव विष्णूचा सातवा अवतार मानले जातात.[१७] रामायणानुसार, राम हे त्रेतायुगातील आई-वडील कौशल्या आणि दशरथ यांच्या पोटी अयोध्येत जन्मलेले एक राजकुमार होते.[१८] हिंदू परंपरेनुसार इ.स.पू. ३१०२ मध्ये सुरू झालेल्या कलियुगाच्या हजारो वर्षांपूर्वीचे हे आहे.[१९]

अयोध्या महात्म्य, ज्याचे वर्णन अयोध्येच्या तीर्थयात्रेचा वाटाड्या म्हणून केले गेले आहे, हे अयोध्याची माहिती देते.[२०][२१] ह्या ११व्या आणि १४व्या शतकादरम्यानच्या काळातील मजकुरानुसार जन्मस्थानाचा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख होतो आहे.[२२] नंतरच्या मजकुरानुसार अयोध्येतील आणखी अनेक ठिकाणे आणि संपूर्ण तटबंदी असलेल्या शहराला रामदुर्ग ("रामाचा किल्ला") असे संबोधित केले आहे.[२२]

बाबरी मशीद

[संपादन]

बाबर हा भारताचा पहिला मुघल सम्राट आणि मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. असे मानले जाते की त्याचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद १५२८ मध्ये त्याच्या आदेशानुसार बांधली.[२३] ईस्ट इंडिया कंपनीचे सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन यांनी १८१३-१४ मध्ये नोंदवले की त्यांना मशिदीच्या भिंतींवर एक शिलालेख सापडला जो या बांधकामाची पुष्टी करतो. त्याने हे दिखील नमुद केले की स्थानिक लोकांच्यामते औरंगजेबाने रामाला समर्पित असलेले तेथील मंदिर पाडून मशीद बांधली.[२४]

मशिदीचा सर्वात जुना ऐतिहासिक उल्लेख मुघल दरबारातील राजपूत कुलीन जयसिंग दुसरा यांच्याकडून मिळतो, ज्याने १७१७ मध्ये मशिदीची जमीन आणि आजूबाजूचा परिसर खरेदी केला होता. त्याच्या कागदपत्रांमध्ये मशिदीसारखी तीन घुमट असलेली रचना दिसून येते, पण ज्याला "जन्मस्थान" (छठी ) असे संबोधले आहे. अंगणात एक व्यासपीठ (चबुतरा ) दिसतो ज्यावर हिंदू भाविक प्रदक्षिणा घालताना आणि पूजा करताना दाखवले आहेत.[२५] या सर्व तपशीलांना अर्ध्या शतकानंतर जेसुइट पुजारी जोसेफ टिफेन्थलर यांनी पुष्टी दिली.[२६] टिफेन्थलर असेही म्हणाले की, "याचे कारण असे आहे की एकेकाळी येथे एक घर होते जिथे विष्णू रामाच्या रूपात जन्माला आले होते."[२७]

बाबरनामा , ऐन-ए-अकबरी, किंवा रामचरितमानस यातही मस्जिग किंवा मंदिराचा उल्लेख आढळत नाही.[२८][२९]

हिंदू आणि मुस्लिम दोघेही "मस्जिद-मंदिरात" पूजा करत होते, मुस्लिम मशिदीच्या आत आणि हिंदू मशिदीच्या बाहेर पण त्याच आवारात होते असे म्हणले जाते. १८५७ मध्ये एका ब्रिटिश प्रशासकाने वाद टाळण्यासाठी दोन्ही भागांमध्ये रेलिंग उभारले.[३०][३१][१०] १९४९ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर, मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यात आली, ज्यामुळे वाद निर्माण झाला.[३१]

ऐतिहासिक पार्श्वभूमी

[संपादन]

गुप्ता काळ

[संपादन]

बुद्धाच्या काळात (इ.स.पू. ६००) सध्याच्या अयोध्येला साकेता असे म्हणतात जे उत्तर भारतातील सहा मोठ्या शहरांपैकी एक होते. गुप्तकाळात, कुमारगुप्त किंवा स्कंदगुप्त, या दोघांनी ही आपली राजधानी बनवली, त्यानंतर तिला अयोध्या असे नाव पडले. कालिदासाने येथे रघुवंश लिहिले आणि गोप्रतारा तीर्थ (गुप्तार घाट) चा उल्लेख केला, जिथे रामाने स्वर्गात चढताना सरयूच्या पाण्यात प्रवेश केला असे मानले जाते. फ्रान्सिस बुकानन आणि अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी नोंदवलेल्या स्थानिक परंपरेनुसार, रामाच्या स्वर्गारोहणानंतर अयोध्या उजाड झाली आणि "विक्रमादित्य" ने तिचे पुनरुज्जीवन केले. ( रघुवंशामध्ये, रामाचा मुलगा कुस याने त्याचे पुनरुज्जीवन केले.) प्रभावतीगुप्त, चंद्रगुप्त II ची कन्या, ही रामभक्त होती. तिचा मुलगा, प्रवरसेन II याने सेतुबंध लिहिला, ज्यामध्ये रामाला विष्णूसारखेच मानले जाते. सुमारे ४५० मध्ये प्रवरपुरा ( रामटेकजवळील पौनार) येथे त्यांनी रामाचे मंदिरही बांधले. [३२]

वादाची सुरुवात

[संपादन]

बाबरी मशीद पाडली

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Guha, Ramachandra (2007). India After Gandhi. MacMillan. pp. 582–598.
  2. ↑ Khalid, Haroon (14 November 2019). "How the Babri Masjid Demolition Upended Tenuous Inter-Religious Ties in Pakistan". The Wire (India). 15 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2020 रोजी पाहिले.
  3. ↑ "As a reaction to Babri Masjid demolition, What had happened in Pakistan and Bangladesh on 6 December, 1992". The Morning Chronicle (India). 6 December 2018. 3 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2020 रोजी पाहिले.
  4. ↑ "Ayodhya, the Battle for India's Soul: The Complete Story – India Real Time – WSJ". Blogs.wsj.com. 10 December 2012. 24 May 2017 रोजी पाहिले.
  5. ↑ "Meet Triloki Nath Pandey – Ram Lalla's 'best friend'". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 16 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
  6. 1 2 "Ayodhya dispute: The complex legal history of India's holy site". BBC News. 16 October 2019. 17 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 October 2019 रोजी पाहिले.
  7. ↑ Khan, Sibghat Ullah; Agarwal, Sudhir; Sharma, Dharam Veer (30 September 2010). "Decision of the hon'ble special full bench hearing Ayodhya matters". Allahabad High Court. 27 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ↑ "Supreme Court hearing ends in Ayodhya dispute; orders reserved". The Hindu Business Line. Press Trust of India. 16 October 2019. 23 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2019 रोजी पाहिले.
  9. ↑ "Ayodhya verdict: Supreme Court dismisses Shia Waqf Board's appeal, says land belongs to govt". India Today. 9 November 2019. 9 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 November 2019 रोजी पाहिले.
  10. 1 2 3 "Ram Mandir verdict: Supreme Court verdict on Ram Janmabhoomi-Babri Masjid case". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 November 2019. 9 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 November 2019 रोजी पाहिले.
  11. ↑ "Did you know seven evidences unearthed by ASI proved a temple existed at Ayodhya? Details here". टाइम्स नाऊ. 4 August 2020. 9 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 August 2020 रोजी पाहिले.
  12. ↑ Shekhar, Kumar Shakti (1 October 2019). "Ram temple existed before Babri mosque in Ayodhya: Archaeologist KK Muhammed". द टाइम्स ऑफ इंडिया. 18 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 August 2020 रोजी पाहिले.
  13. ↑ Saha New, Poulomi (5 February 2020). "Sri Ram Janmabhoomi Teerth Kshetra: PM Modi announces formation of Ayodhya temple trust". India Today. 6 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 August 2020 रोजी पाहिले.
  14. ↑ "अयोध्या: मस्जिद के लिए धन्नीपुर में दी जाएगी जमीन, देखिए मैप" [Ayodhya: Land will be given for mosque in Dhanipur about 25 km from Ramjanmabhoomi]. Aaj Tak. 5 February 2020. 27 August 2020 रोजी पाहिले.
  15. ↑ Khan, Arshad Afzaal (7 February 2020). "Uttar Pradesh: Obscure Dhannipur village basks in its mosque glory". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 August 2020 रोजी पाहिले.
  16. ↑ "Timeline: Ayodhya holy site crisis". BBC News. 6 December 2012. 10 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 June 2018 रोजी पाहिले.
  17. ↑ "Rama | Hindu deity". Encyclopædia Britannica (इंग्रजी भाषेत). 2 February 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2019 रोजी पाहिले.
  18. ↑ "King Dasaratha's four sons". bl.uk. 7 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 February 2019 रोजी पाहिले.
  19. ↑ Gopal, Sarvepalli; Thapar, Romila; Chandra, Bipan; Bhattacharya, Sabyasachi; Jaiswal, Suvira; Mukhia, Harbans; Panikkar, K. N.; Champakalakshmi, R.; Saberwal, Satish (Feb 1990). "The Political Abuse of History: Babri Masjid-Rama Janmabhumi Dispute". Social Scientist. 18 (1/2): 76–81. doi:10.2307/3517330. JSTOR 3517330. 7 August 2020 रोजी पाहिले.
  20. ↑ van der Veer, Religious Nationalism (1994).
  21. ↑ Bakker, Ayodhya, Part I (1984).
  22. 1 2 Bakker, The rise of Ayodhya as a place of pilgrimage (1982).
  23. ↑ Flint, Colin (2004). The Geography of War and Peace: From Death Camps to Diplomats. Oxford University Press. ISBN 978-0-19-534751-7. 14 April 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 January 2019 रोजी पाहिले.
  24. ↑ Layton & Thomas, Destruction and Conservation (2003), pp. 8–9.
  25. ↑ Jain, Rama and Ayodhya (2013).
  26. ↑ Jain, Rama and Ayodhya (2013), p. 116.
  27. ↑ Kunal, Ayodhya Revisited (2016).
  28. ↑ Venkatesh, Karthik (6 December 2018). "Babur, The Baburnama & The Masjid That Bore His Name". Madras Courier. 29 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 January 2019 रोजी पाहिले.
  29. ↑ Otajonov, Ne'matilla (16 January 2023). "The Problem Of Filling Up Blanks (Gaps; Lacuna) In Z.M.Babar's "Babur-Nama (Memoirs". Cite journal requires |journal= (सहाय्य)
  30. ↑ van der Veer, Ayodhya and Somnath (1992).
  31. 1 2 "बाबरी मशिदीचा इतिहास शोधणे". Outlook. 1 December 2017. 2 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 February 2019 रोजी पाहिले."Tracing The History Of Babri Masjid". Outlook. 1 December 2017. Archived from the original on 2 February 2019. Retrieved 2 February 2019.

    Note that this gives the date of the erection of the railing (which it calls a fence) as 1859, not 1857.
  32. ↑ Jain, Rama and Ayodhya (2013), pp. 3–5, 94–95.