Jump to content

अयोध्या कांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अयोध्या कांड
साहित्यिक कार्य
ह्याचा भागरामायण संपादन
Form of creative workकविता संपादन
Has version, edition or translationBalmiki Ramayan (Ayodhyakanda), Ramayan (Ayodhyakanda), Ramayan (Ajodhyanda) संपादन
लेखकवाल्मीकि संपादन
वापरलेली भाषासंस्कृत भाषा संपादन

अयोध्या कांड हा हिंदू धर्मग्रंथ रामायण मधील दुसरा भाग आहे. वाल्मिकी यांनी रचलेल्या ह्या महाकाव्याचे सात भाग आहेत.

अयोध्या सोडून वनवासात निघालेले राम, सीता व लक्ष्मण.

सारांश

[संपादन]

राम आणि सीताच्या लग्नानंतर, वयोवृद्ध दशरथ रामाला राजा बनवण्याची इच्छा व्यक्त करतात, ज्यास कोसलाच्या सभागृहातील व्यक्ति आणि प्रजाजन आपले समर्थन व्यक्त केले. ह्या महान घटनेच्या पूर्वसंध्येला कैकेयी याबाबत आनंदित असते, परंतु नंतर तिला मंथरा, तिची एक दुष्ट दासी, उत्तेजित करते आणि दशरथाने तिला दिलेले दोन वर मागण्यास भाग पाडते. कैकेयी मागते की रामाला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवले जावे, आणि राज्यसिंहासन तिच्या मुलाला भरताला मिळावा.

शोकाकुल दशरथ राजा, आपल्या शब्दांच्या बंधनात असल्याने, कैकेयीच्या मागण्यांना मान्यता देतो. राम त्याच्या वडिलांच्या अनिच्छित निर्णयाला पूर्ण समर्पण आणि शांत आत्मसंयमाने स्वीकारतो. तो सीतेला अयोध्येत राहण्यास सांगतो, परंतु ती त्याला वनवासात घेऊन जाण्यास पटवते. लक्ष्मण देखील आपल्या भाऊसोबत जंगलात जाण्याचा निष्चय करतो.

रामाच्या निर्गमनानंतर, राजा दशरथ दुःख सहन करू शकत नसल्याने मोरतो. दरम्यान, भरत, जो आपल्या मामाच्या घरी भेटीला गेला आहे, अयोध्येतील घटनांची माहिती मिळवतो. त्याला धक्का बसतो आणि तो आपल्या आईच्या वाईट योजनेला नकार देतो. तो रामाला अरण्यात भेटायला जातो आणि अयोध्येत परत येऊन हक्काने त्याचे असलेले सिंहासन मिळवण्याची याचना करतो. पण राम आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी निर्वासनाच्या कालावधीपूर्वी परत येण्यास नकार देतो. भरत अयोध्येत परततो आणि आपल्या भावाच्या पादूका सिंहासनावर ठेवून त्याच्याजागी राज्य कारभार चालवतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Valmiki Ramayana - Ayodhya Kanda - Sarga 40". sanskritdocuments.org. 2025-02-09 रोजी पाहिले.