अमोल खताळ
अमोल धोंडीबा खताळ (जन्म १९८३) [१] हे महाराष्ट्रातील एक युवा राजकारणी आहेत. ते अहिल्यानगर जिल्हा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली.[२]
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]अमोल खताळ महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हातील संगमनेरचे रहिवासी आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. त्याआधीत्यांचे शालेय शिक्षण नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजापूर येथे झाले.[१]
राजकीय कारकीर्द
[संपादन]अमोल खताळ यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी ११२,३८६ मते घेतली आणि त्यांनी माजी मंत्री आणि आठ वेळा आमदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांचा १०,५६० मतांच्या फरकाने पराभव केला.[३][४][५] प्रथमच आमदार झालेले खताळ हे युवासेनेचे नेते असून हा मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जात होता.[६]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Amol Dhondiba Khatal(Shiv Sena):Constituency- SANGMNER(AHMEDNAGAR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-12-02 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ "Sangamner (Maharashtra) Assembly Election Results 2024 Live: Winner, Runner-up, Candidates List". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ "Amol Dhondiba Khatal, SS Candidate from Sangamner Assembly Election 2024 Seat: Electoral History & Political Journey, Winning or Losing - News18 Assembly Election 2024 Result News". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ "Maharashtra Election Results 2024 | Shiv Sena's Amol Dhondiba Defeats Balasaheb Thorat In Sangamner". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ "Sangamner election results 2024: 8-time MLA Thorat loses to Mahayuti's Khatal by over 10,000 vote margin - CNBC TV18". CNBCTV18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ "Congress veteran Balasaheb Thorat loses Maharashtra's Sangamner seat". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 23 November 2024. 2 December 2024 रोजी पाहिले.