अमेय रमेश परुळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेय रमेश परुळेकर (2018) जन्म : २४ एप्रिल (वय ३६) - मुंबई, महाराष्ट्र, भारत व्यवसाय : चित्रपट दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि प्रोड्युसर कार्यकाळ : २०१६ - सक्रिय पत्नी : योगिता अमेय परुळेकर  

अमेय रमेश परुळेकर हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते व लेखक आहेत. आपला कट्टा हे त्यांचं युट्युब चॅनेल आहे. त्यांना जानेवारी २०१६ मध्ये ओडिसा येथील कटक नृत्य व नाट्य महोत्सवात सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. परुळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या "अनिव्हर्सरी" ह्या लघु चित्रपटाला ऑस्कर च्या संग्रहात ठेवण्यात आले आहे.

परुळेकर यांनी प्यारी-यारी वेबसीरीज चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्यारी-यारी ही मराठीतील गोष्ट रूपाने सादर करण्यात आलेली पहिली वेबसिरीज आहे. [ संदर्भ हवा ]
प्यारी-यारी नंतर त्यांनी मुंबई मेट्रो साठी जॉय इन अ मेट्रो हा हिंदी लघु चित्रपट बनवला आहे ज्यात मुंबई मेट्रो फलाटावर अचानक भेटलेल्या जोडप्याची कथा आहे.

जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या शहीद भाई कोतवाल या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी देखील त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.[१]  

व्यावसायिक कारकीर्द आणि कुटुंब[संपादन]

परुळेकर यांचा जन्म मालाड मुंबई येथे झाला असून आणि त्यांचे सध्याचे वास्तव्य देखील मुंबईतच आहे.

परुळेकर हे शिक्षणाने एम.बी.ए. असून त्यांनी अंधेरी मुंबई  येथील एस पी जैन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रीसर्च या नामांकित कॉलेज मधून त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी  पुढील १० वर्ष अनेक आयटी कंपन्यांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी विभागात मोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे.

कला क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमांमध्ये पुढे २०१८ मध्ये परुळेकर यांनी नॅशनल फिल्म अँड टेलिव्हीजन स्कूल लंडन येथून फिल्म मेकिंग - स्क्रिप्ट-टू-स्क्रीन हा कोर्स पूर्ण केला आहे.   

चित्रपटांची यादी[संपादन]

वर्ष नाव दिग्दर्शक अभिनेता लेखक प्रदर्शक विभाग
२०२० द एम्पटी स्पेस होय नाही होय होय हिंदी लघु चित्रपट
२०२० शहीद भाई कोतवाल होय नाही नाही होय मराठी चित्रपट
२०१८ अनिव्हर्सरी - अनस्पोकन लव्ह   होय नाही नाही होय हिंदी लघु चित्रपट
२०१७ जॉय इन मेट्रो होय नाही होय होय हिंदी लघु चित्रपट
२०१६ प्यारी-यारी वेबसीरीज होय होय होय होय मराठी वेब सिरीज

बाह्य दुवे [संपादन]

  1. महाराष्ट्र टाइम्स [permanent dead link]
  2. टाइम्स ऑफ इंडिया[permanent dead link]
  3. महाराष्ट्र टाइम्स[permanent dead link]
  4. आयएमडीबी
  5. टाइम्स ऑफ इंडिया[permanent dead link]
  6. झी २४तास बातमी [१]
  7. Prahaar (newspaper) [२]
  1. ^ "परुळेकर यांचा जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित करण्यात आलेला सिनेमा या लेखात समाविष्ट करण्यात आला आहे". IMDB.