अमृता पाटील
अमृता पाटील | |
---|---|
![]() अमृता पाटील फ्रान्स मध्ये | |
जन्म |
१९ एप्रिल, १९७९ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखिका |
भाषा | इंग्रजी |
साहित्य प्रकार | ग्राफिक कादंबरीकार |
कार्यकाळ | २००८ ते आजतागायत |
विषय | पौराणिक कथा |
अमृता पाटील (जन्म: १९ एप्रिल, १९७९ - हयात) ही एक भारतीय 'सचित्र कादंबरी' (graphic novel) लेखिका आणि चित्रकार आहे. हा एक असा प्रकार आहे की ज्यात शब्द आणि चित्रांच्या मिश्रणाद्वारे कथानक मांडले जाते.[१]
पाटीलचे बालपण गोव्यात गेले, जिथे तिचे वडील भारतीय नौदलात सेवारत होते.[२][१] तिने 'गोवा कॉलेज ऑफ आर्ट'मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवी (१९९९) आणि बोस्टनमधील 'टफ्ट्स विद्यापीठाच्या स्कूल ऑफ द म्युझियमऑफ फाइन आर्ट्स'मधून मास्टर ऑफ फाइन आर्ट्स पदवी (२००४) मिळवली.[३]
सुरुवातीची कारकीर्द
[संपादन]पाटील यांनी १९९९-२००० मध्ये एंटरप्राइज नेक्सस (मुंबई) येथे कॉपीरायटर म्हणून काम केले.[१] ती 'माइंडफिल्ड्स' या त्रैमासिक मासिकाची सह-संस्थापक आणि संपादक होती (२००७-२०१२).[४] २००९ मध्ये तिला TED फेलोशिप देण्यात आली.[५]
ग्राफिक कादंबऱ्या
[संपादन]अमृता पाटीलची पहिली सचित्र कादंबरी, 'कारी', जी व्ही.के. कार्तिका यांनी हार्परकॉलिन्स इंडिया येथे प्रकाशित केली होती. यात तिने लैंगिकता, मैत्री आणि मृत्यू या विषयांवर प्रकाश टाकला होता. याच कादंबरीने पाटील यांना भारताच्या पहिल्या महिला सचित्र कादंबरीकार म्हणून ओळख निर्माण करून दिली.[६][७] चित्रकथा (कॉमिक्स) संस्कृतीचा फारसा अनुभव नसलेल्या एका छोट्या शहरात वाढलेल्या स्वतःला "विचित्र" म्हणवणाऱ्या पाटीलने तिच्या ऑटोडिडॅक्टिक प्रक्रियेबद्दल आणि विकसित होत असलेल्या शैलीबद्दल सांगितले आहे.[८]'कारी' हे विविध शैक्षणिक प्रबंधांसाठीचे (पीएचडीचे) विषय राहिले आहेत.[९][१०]
तिच्या नंतरच्या दोन सचित्र कादंबऱ्या 'आदि पर्व: मंथन ऑफ द ओशन' आणि 'सौप्तिक: ब्लड अँड फ्लॉवर्स'[११] या पर्व द्वैतशास्त्राच्या रचनेची मांडणी करतात. आदि पर्व: मंथन द ओशन (२०१२) या कादंबरीमध्ये गंगेच्या पात्राचा वापर सूत्रधार (कथाकार) म्हणून करण्यात आला होता, ज्याने महाभारताच्या विनाशकारी घटनांपर्यंत नेणाऱ्या वैश्विक आणि पार्थिव अशा दोन्ही प्रकारच्या मूळ कथा सांगितल्या होत्या. सौप्तिकमध्ये, जखमी अमर अश्वत्थामा द्वारे ही कथा पूर्ण केली आहे.[१२][१३]

तिची चौथी सचित्र कादंबरी 'आरण्यक' [१४] ही पौराणिक कथाशास्त्रज्ञ देवदत्त पट्टनायक यांच्याशी चर्चा केल्यानंतर आली. 'आरण्यक' हे पुस्तक प्रथम २०१९ मध्ये वेस्टलँडने प्रकाशित केले आणि नंतर २०२३ मध्ये हार्परकॉलिन्स इंडियाने पुनर्प्रकाशित केले.[१५]
"कॉमिक बुक कॅपिटल" अँगोलेम (फ्रान्स) आणि ला मैसन डेस ऑटर्स,[१६] या कॉमिक बुक लेखकांसाठी ज्युरीड रेसिडेन्सी असलेल्या संस्थेशी दशकभराच्या सहवासानंतर, पाटील २०१९ मध्ये भारतात स्थलांतरित झाली.
सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल २०१९ मध्ये अमृता पाटीलचा 'अल्टर'[१७][१८] नावाचा एकल कार्यक्रम होता. तिने २०२० मध्ये भव्य स्वरूपातील अॅक्रेलिक झांकी रंगवण्यास सुरुवात केली. पाटील यांच्याकडे एक स्वतंत्र दृश्य शैली आहे ज्यामध्ये अॅक्रेलिक पेंटिंग, कोलाज, वॉटरकलर आणि कोळशाचा समावेश आहे. त्यांच्या कामातील वारंवार येणारे विषय म्हणजे मेमेंटो मोरी, लैंगिकता, मिथक, शाश्वत जीवन आणि युगानुयुगे कथाकाराकडून कथाकाराकडे हस्तांतरित होणाऱ्या कथांचा अखंड धागा.
मार्च २०१७ मध्ये, अमृता पाटील यांना कला आणि साहित्यातील "सीमा तोडणाऱ्या असामान्य कार्यासाठी" भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[१९]
ती जगातील पहिल्या नॉन-फिक्शन "क्वॉमिक्स" नावाच्या चित्रकथा ॲपची सह-संस्थापक आहे.
सार्वजनिक कार्यक्रम
[संपादन]२०१७ मध्ये झी जयपूर साहित्य महोत्सवात अमृता पाटील या वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.[२०]
२०१८ मध्ये, ती शिकागो विद्यापीठातील स्कूल ऑफ डिव्हिनिटी येथे निवासस्थानी वक्ता आणि कलाकार या नात्याने हजर होती.[२१]
संदर्भग्रंथ
[संपादन]- कारी (२००८)[६][२२]
- आदिपर्व: चर्निंग ऑफ द ओशियन (२०१२)[२३][२४]
- सौप्तिक: ब्लड अँड फ्लॉवर्स (२०१६)[२३][२५]
- अरण्यक (२०१९)[१५][२६]
पुरस्कार
[संपादन]मार्च २०१७ मध्ये भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अमृता पाटील यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१९][२७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Das, Soma (2016-10-06). "Visual artist and author Amruta Patil breaks new ground with her graphic retelling of the Mahabharata". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-06-21 रोजी पाहिले.
- ^ "Amruta Patil | PAUL GRAVETT".
- ^ "Amruta Patil". The Hindu. 26 January 2013. 24 September 2018 रोजी पाहिले.
- ^ Bell, Melissa A. (2008-08-09). "Amruta Patil / Writer and illustrator". LiveMint (इंग्रजी भाषेत). 2019-06-21 रोजी पाहिले.
- ^ "Amruta Patil - TED Fellow - TED". www.ted.com.
- ^ a b "Amruta Patil | PAUL GRAVETT". www.paulgravett.com. 2017-06-27 रोजी पाहिले.
- ^ Menezes, Vivek (26 July 2021). "India's first female graphic novelist Amruta Patil is graphing the future". GQ India (इंग्रजी भाषेत). 8 May 2022 रोजी पाहिले.
- ^ Empty citation (सहाय्य)
- ^ "'Can You See Her the Way I Do?': (Feminist) Ways of Seeing in Amruta Patil's Kari (2008)".
- ^ "Exploring Gender, Identity, and Mythology in Kari by Amruta Patil".
- ^ Anasuya, Shreya Ila (2016-09-30). "Amruta Patil's Mahabharat". LiveMint (इंग्रजी भाषेत). 2019-06-21 रोजी पाहिले.
- ^ Harper Broadcast (10 December 2016). "Amruta Patil in conversation with Amrita Tripathi" – YouTube द्वारे.
- ^ Goel, Mayanka; Aranha, Jovita (2016-09-03). "Reaching for the fire in her heart". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-06-21 रोजी पाहिले.
- ^ Amruta Patil (14 July 2017). "Aranyaka: Making of a Graphic Novel - Visual-Textual Notes" – YouTube द्वारे.
- ^ a b Das, Ranjabati (2018-12-27). "Making Waves: Amruta Patil". Verve Magazine (इंग्रजी भाषेत). 2019-06-23 रोजी पाहिले.
- ^ "La Maison des Auteurs". la Cité internationale de la bande dessinée et de l'image. 2017. 3 July 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "A graphic description | the Navhind Times". 22 December 2019.
- ^ "Fine arts and the creative role of serendipity". 20 December 2019.
- ^ a b "Nari Shakti Awardees - Ms. Amruta Patil, Goa". wcd.nic.in. 2017-06-18 रोजी पाहिले.
- ^ ZEE Jaipur Literature Festival (10 February 2017). "#ZeeJLF2017: Blood and Flowers" – YouTube द्वारे.
- ^ Gurevitch, Eric Moses. "Forests of Learning & Kari, Adi Parva, and Sauptik: Conversations with Amruta Patil".
- ^ Patil, Amruta (2018). Kari. HarperCollins Publishers India. ISBN 978-81-7223-710-3. OCLC 1122761847.
- ^ a b Amruta Patil (10 September 2016). Sauptik: Blood and Flowers. HarperCollins Publishers India. ISBN 978-93-5264-065-2.
- ^ Patil, Amruta (2021). Adi Parva: Churning of the Ocean (English भाषेत). S.l.: HarperCollins India. ISBN 978-93-5422-761-5. OCLC 1252961473.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Patil, Amruta (2021). Sauptik: Blood and Flowers (English भाषेत). S.l.: HarperCollins India. ISBN 978-93-5422-936-7. OCLC 1252962687.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Patil, Amruta (2020). Aranyaka: Book of the Forest (English भाषेत). OCLC 1140353467.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Nari Shakti Awardees - Ms. Amruta Patil, Goa | Ministry of Women & Child Development|IN|odwqu".