Jump to content

अमांडा अनिसिमोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमांडा के व्हिक्टोरिया अनिसिमोव्हा [] (३१ ऑगस्ट, २००१:फ्रीहोल्ड टाउनशिप, न्यू जर्सी, अमेरिका - ) ही एक अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. १४ जुलै २०२५ रोजी ती जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर होती. [] [] ती २०२५ च्या विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेत ती उपविजेती होती. याशिवाय अनिसिमोव्हा फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनमध्ये आतापर्यंत उपांत्य फेरीत पोचली आहे. अनिसिमोवाने कतार लेडीज ओपनमध्ये ती तीन वेळा जिंकली. []

अनिसिमोव्हाचा जन्म अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील फ्रीहोल्ड टाउनशिप येथे [] ओल्गा आणि कॉन्स्टँटिन अनिसिमोव्ह यांच्या घरी झाला. तिची मोठी बहीण मरिया व्हार्टन कॉलेजकडून पेनसिल्व्हेनिया विद्यापीठासाठी कॉलेज टेनिस खेळत होती. [] त्यांच्या मोठ्या मुलीला चांगले भविष्य देण्यासाठी तिच्या जन्माच्या काही वर्षांपूर्वी तिचे पालक रशियाहून अमेरिकेत स्थलांतरित झाले. [] [] [] [] त्यांनी वित्त आणि बँकिंग उद्योगात काम केले. अनिसिमोव्हाचे पालक टेनिस खेळाडू नाहीत.[१०] [११]

२०१७ फ्रेंच ओपनमध्ये अनिसिमोवा

संदर्भ

[संपादन]
  1. Women's Tennis Association (WTA). "Amanda Anisimova Player Stats & More". February 17, 2025 रोजी पाहिले.
  2. "Rankings Watch: Andreeva makes Top 5 debut, Anisimova cracks Top 10". 14 July 2025.
  3. "Amanda Anisimova Rankings history".
  4. "Champions Corner: After years of setbacks, Anisimova finds her moment". 15 February 2025.
  5. 1 2 Wall, Karen (June 6, 2019). "17-Year-Old French Open Tennis Semifinalist Has Freehold Twp Ties". Freehold, NJ Patch. 2022-07-04 रोजी पाहिले.
  6. King, Rachel (July 10, 2025). "Who Sits in Amanda Anisimova Player's Box?". New York Times. July 10, 2025 रोजी पाहिले.
  7. "Maria Egee, Amanda Anisimova's Sister: 5 Fast Facts You Need to Know". 12 July 2025.
  8. Clarey, Christopher (18 January 2020). "A Grieving Young Tennis Star Finds Solace on the Court". The New York Times. 14 July 2025 रोजी पाहिले.
  9. "Teen sensation Amanda Anisimova showing no nerves at French Open". 6 June 2019. 14 July 2025 रोजी पाहिले.
  10. Clarey, Christopher (May 25, 2017). "Amanda Anisimova, 15, Is Ready for Her Grand Slam Debut". New York Times. October 1, 2017 रोजी पाहिले.
  11. Clarey, Christopher (March 12, 2018). "Amanda Anisimova Leads Young Americans With a Deliberate Pace". New York Times. July 30, 2018 रोजी पाहिले.