अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ
Appearance
अमरेंद्र गाडगीळ (जन्म : २५ जून १९१९; - ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
लिहिलेली /संपादन केलेली पुस्तके-ग्रंथ (बहुतेक बालसाहित्य)
[संपादन]- अज्ञाताची वचने
- ईशावास्य केनोपनिषद-६
- उक्तिविशेष (संपादित)
- किशोरमित्रांनो
- जीवनसंग्राम
- लोकसेवक चरित्रमाला -ठक्करबाप्पा (चरित्र)
- दिगंतावरी
- देवादिकांच्या गोष्टी (भाग १ ते ५)
- ताई अन् भाऊ
- प्रवासी राम
- महर्षी आइन्स्टिन (चरित्र)
- महाभारत सर्वांगीण दर्शन
- लोकसेवक चरित्रमाला -रविशंकर महाराज
- राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह)
- रामायण सम्यक् दर्शन
- राष्ट्रसेवकाची शिदोरी
- वटपत्र
- वंदे मातरम
- वीर आणि परमवीर
- शत-कुमार-कथा (भाग १ ते ४)(संकलित)
- शत-कुमार-कथा (भाग ५वा); पुरवणी पुस्तक; बालवाङ्मयाच्या साहित्यशास्त्रावरील काही लेख आणि पहिल्या चार भागांतील कथांच्या लेखकांची सूची)
- श्रीगणेश कोश (६ खंड, १९६८ पाने)
- श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड, १९८१ पाने)
- श्रीहनुमानकोश (संपादित)
- साहित्य सरिता
- सुजनहो ऐका रामकथा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |