अभ्यास संदेश प्रणाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


'यात काय काय आहे'
Wikipedia-logo-mr.pngArrowrotation.gif Wikibooks-logo.svg

एखादी गोष्ट कशी करावी हे मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पाच्या परिघात मोडते, म्हणून या लेख/विभागाच्या काही किंवा सर्व मजकुर मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात स्थानांतरीत करण्याची गरज प्रतिपादीत केली गेली आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. एखादी गोष्ट कशी असते ते ज्ञानकोशाच्या परिघात येऊ शकते पण एखादी गोष्ट कशी करावी हे विकिपीडिया परिघात बसत नाही.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा/करा.


मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘अभ्यास’ संदेश प्रणाली


शिक्षण क्षेत्रात इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचा वापर करून माहिती आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण

म्हणजेच ई-अध्ययन. या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात, कमी वेळात माहिती मिळवणे,

तसेच माहिती देणे शक्‍य झालेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेणे किंवा देणे, तसेच

प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करणे शक्‍य झाले आहे. इंटरनेटचा वापर करून मोठ्या प्रमाणात माहितीचे

अध्ययन करणे शक्‍य होत आहे. जगातील कानाकोपऱ्यातील माहिती जशी झटपट मिळणे शक्‍य होते.

त्यासाठी ई-अध्ययन महत्त्वाचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात ते अत्यंत गरजेचे झाले आहे. त्याचे पायाभूत आणि

सखोल शिक्षण असणे ही 21 व्या शतकातील गरज आहे.

याच तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे सहज शक्य आहे. गुणवत्ता वाढीसाठी

अडथळा ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करून त्यावर तंत्रज्ञानाच्या वापराने उपाय करता येतो. दररोज दिला

जाणारा गृहपाठ वेळेवर न आणल्याने विद्यार्थ्यांची गैरहजेरी आणि त्यातून गुणवत्ता विकासात होणारा

अडसर दूर करण्यासाठी या समस्येवर उपाय काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या साधनांचा शिक्षणावर कितपत आणि कसा प्रभाव पडतो हे ती साधने कशी व

कशासाठी वापरली जातात यावर अवलंबून असते. या साधनांचा सर्वांनाच सारख्याच प्रमाणात फायदा

होईल असे ही नाही. मात्र ही साधने योग्य पद्धतीने वापरली गेल्‍यास त्यांचा फायदा नक्की होतो.

तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक दर्जा उंचाविता येऊ शकतो यात शंका नाही. माहिती व

संप्रेषणाच्‍या साधनांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होतो. अनुभवावरून हे स्पष्ट झालेले

आहे की, माहिती व संप्रेषणाच्‍या साधनांमुळे शिक्षणपध्दतीवर निश्चितच चांगला परिणाम होतो.

तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने शिक्षणाचा दर्जावर उत्तम परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच विद्यार्थ्यांच्या

गुणांत व उपस्थितीत ही सुधारणा झाल्याचे आढळले. शिक्षकांना तंत्रज्ञानाची साधने हाताळण्याचे योग्य ते

प्रशिक्षण दिल्यास शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण

मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करू शकतो हे खरे.

दैनंदिन अध्यापन झाल्यावर त्याचा सराव होणे आवश्यक असते परंतु बरीच मुले गृहपाठ सोडवून

आणत नाहीत. या गृहपाठ पूर्णता होत नसल्याने अनेक समस्या तयार होतात आणि त्याचा परिणाम

गुणवत्तेवर होताना दिसतो.

याच समस्यांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी मी ‘अभ्यास’ ही संदेश प्रणाली सुरु केली.

मुलांनी गृहपाठ वेळेवर करावा आणि त्याची गुणवत्ता वाढावी हा या मागचा हेतू आहे.

अभ्यास प्रणालीची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे सांगता येतील.

 मुलांना स्वयं अध्ययनाची गोडी लावणे.

 तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्ता विकास करणे

 मुलांनी रोज गृहपाठ सोडवून आणला पाहिजे त्यासाठी उपाय योजना करणे.

 पालकांचा शैक्षणिक कार्यात सहभाग वाढविणे.

 आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.

 उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.

 मुलांसाठी आनंददायी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

माहिती व संप्रेषण साधने (ICTs) योग्यरीत्या वापरल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी

आवड निर्माण करता येते व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. माहिती व संप्रेषणांच्या (ICTs)

साधनांमुळे, विशेषतः संगणक व इंटरनेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी कवाडे उघडी झाली

आहेत. संगणक व इंटरनेट वापरून शिक्षक व विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन त्यांच्या

विषयाशी तसेच इतर विषयांशी संबंधित नवनवी माहिती मिळवू शकतात व आपल्या ज्ञानात भर घालू

शकतात. यामुळे आतापर्यंत शिक्षककेंद्रित असणार्‍या शिक्षणपद्धतीत नवा बदल घडून आला आहे. आता

विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात,

दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात.

आजच्या घडीला तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे याबाबत शंकाच

नाही. संगणक तंत्रज्ञानाने व माहिती तंत्रज्ञानाने चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्याच्या संधी अनेक पटीने

वाढल्या आहेत हे खरे आहे निश्चित उद्देश समोर असल्यास योग्य वेबसाईटसचा शोध घेऊन आपल्याला

आवश्यक ती माहिती मिळविणे, यूट्यूबवरून आपल्या गरजेनुरूप दृक्श्राव्य कार्यक्रमाद्वारे स्वशिक्षण

करणे, ब्लॉग्स वरून इतरांचे लेखन- चिंतन वाचता येणे यासारख्या अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड

वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे.

गरज आहे ती आज तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत

वापरण्याची काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे तंत्रज्ञानाचा शिक्षणक्षेत्रात ट्यूटर, साधन म्हणून

वापर करता येतो.

मुलांच्या गुणवत्तेवर मोठया प्रमाणात परिणाम करणारा घटक जर कोणता असेल तर स्वयंअध्ययन

हा आहे. हे स्वयंअध्ययन करण्याचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गृहपाठ होय. मुले गृहपाठ करण्यासाठी

स्वतःच्या अध्यायाचा उपयोग तर करतातच तसेच त्याच्या सभोवतालच्या अनेक घटकांची मदत देखील

घेत असतात. जर मुलांनी वेळेवर गृहपाठ केला तर शाळेत शिकविलेल्या घटकाची पुनरावृत्ती होतो आणि

त्यातून ती संकल्पना दृढ होण्यास मदत होते.

शाळेत रोज गृहपाठ दिला जातो. परंतु मुले तो पूर्ण करून आणत नाहीत. या समस्येचा अभ्यास

केला असता असे दिसून आले की,

1) मुले दिलेला गृहपाठ विसरतात.

2) आज गृहपाठ दिला नाही असे पालकांना सांगतात.

3) शिक्षक गृहपाठ देत नाहीत म्हणून पालकांत शाळेबद्दल नकारात्मक मत तयार होते.

4) मुलांनी गृहपाठ केला नाही म्हणून ते दुसऱ्या दिवशी शाळेत येत नाहीत.

या सर्व बाबींचा विचार करता यावर उपाय म्हणून ‘अभ्यास’ ही संदेश प्रणाली सुरु करण्याचा

निर्णय घेण्यात आला. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. शाळेत डिजिटल स्कूल आणि ई-लर्निंग च्या

मदतीने पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.

आजच्या युगात जवळजवळ सर्वच पालक मोबाईलचा वापर करताना दिसतात. मुले देखील

मोबाईल हाताळत आहेत. याचीच जमेची बाजू घेऊन सर्वप्रथम या मोबाईलचा वापर मुलांच्या

स्वयंअध्ययनासाठी करण्याचा निश्चय केला.

अभ्यास या संदेश प्रणालीची सुरुवात -

 बाजारात Bulk sms पुरवठादार आहेत. त्यांच्याशी संपर्क करून शाळेसाठी ‘अभ्यास’ या Sender

ID ने Transactional SMS घेण्यात आले. त्यासाठी नाव नोंदणी केली.

 त्यानंतर त्या संस्थेकडून Username आणि Password प्राप्त झाले. त्याचा वापर करून Login

होऊन त्यात पालकांचे Contacts नंबर घेऊन त्यांचा इयत्ता निहाय Group तयार केले.

 दररोज संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळी या गृपवरून पालकांच्या मोबाईलवर गृहपाठ पाठविला

जाऊ लागला.

 तसेच शाळेत जे काही कार्यक्रम असतात त्यांचीही माहिती अशाचप्रकारे पाठविण्यात येते.

प्रत्येक पालकाला त्याच्या मोबाईलवर रोजचा गृहपाठ दिसायला लागला. मुले गृहपाठ करून येऊ

लागली. त्याचा शिक्षण प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम दिसून आला.

‘अभ्यास’ प्रणाली वापरानंतर मिळालेले निष्कर्ष पुढीलप्रमाणे –

 गृहपाठ पूर्ण नसल्याचा ताण मुलांना असत नाही. त्यामुळे मुले सकाळी शाळेच्या वेळेअगोदर

आनंदाने उपस्थित असल्याचे दिसून आले..

 गृहपाठ केला नाही म्हणून घरी राहणारी मुले शाळेत येऊ लागली. उपस्थिती वाढल्याचे दिसून

आले.

 पालकांचा शाळेत सुरु असलेल्या घडामोडी माहित होऊ लागल्या त्यामुळे त्यांचा सहभाग वाढला.

 मुलांची गुणवत्ता वाढ झाल्याचे दिसून आले.