अभिनय मास्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साचा:संभाव्य प्रताधिकार भंग अथवा

Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


पुस्तक परिचय[संपादन]

मास्टर दत्ताराम (जन्म १० जून १९१३) यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने, १ मे २०१३ रोजी, वसईमध्ये डिम्पल पब्लिकेशनचे ’अभिनय मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकातील लेखांचे संपादन अरुण धाडीगावकर यांनी केले आहे. त्या पुस्तकातील प्रकरणाचा हा काही भाग…

"मास्टर दत्ताराम म्हटले की ’गोवा हिंदू असोसिएशन’च्या कलाविभागाने २५ ऑक्टोबर १९६२ रोजी भारतीय विद्या भवनात सादर केलेल्या ’रायगडाला जेव्हा जाग येते’मधला `’शिवाजी’ विसरताच येत नाही. संगीत ’मत्स्यगंधा’मधील ’भीष्मा’, ’ययाति देवयानी’मधला ’ययाती’… या हुकमी एक्क्याच्या या नाट्यकृती रसिकजन पसंतीच्या जल्लोषात भर घालणाऱ्याच! अभिनय, दिग्दर्शन, सहकलाकारांना अचूक मार्गदर्शन आणि नाटकाच्या प्रत्येक विचाराची प्रतिबिंबपूर्ण कलात्मकता हा बापूंचा विशेष! लालबागची गणेशगल्ली हौशी म्हणता म्हणता मुरब्बी नाट्यकलावंत व नाट्यप्रयोगांच्या जोडीनेच व्यायामशाळांचेही कूळ आणि मूळच! राजा मयेकरांच्या फोटो स्टुडिओ मागच्या इमारतीत १९४३-४४ दरम्यान रहायला आलेले आणि अर्थात मराठी रंगभूमीसाठी सारे जीवन वाहिलेले-सजवलेले मास्टर दत्ताराम खऱ्या अर्थाने रंगभूमीसाठी कुठलाही मानापमान-अहंकार न जोपासणारे अजातशत्रू हुकमी कलाकार!

"नटवर्य नानासाहेब फाटक ’पुण्यप्रभाव’मध्ये वृंदावनाच्या भूमिकेत असले, आणि काही प्रयोगातील बापूंचा वृंदावन दाद घेणारा ठरला असला तरी नानासाहेब फाटक वृंदावन तर बापू कंकण किंवा केशवराव दाते वृंदावन तर बापू नूपुर या भूमिकेत. दत्तारामबापू सर्वच भूमिकांत एकरूप झालेले पाहायला मिळत. नाटकातील दुय्यम भूमिकाही तितक्याच तद्‌रूपतेने करणारे दत्ताराम, नाटकाचे यश आणि रसिकांची दाद महत्त्वाची याच एका उत्स्फूर्ततेने त्या करीत.

"राऊळ पेंटरांकडून पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक वा भावनोत्कट नाटकांचे पडदे रंगवण्याची कला आत्मसात केलेले दत्तारामबापू रात्री रंगमंचावर राजेशाही भूमिकेत प्रेक्षकांकडून दाद घेताना जसे नाट्यप्रेमींनी पाहिलेत, अनुभवलेत तसेच प्रसंगी ऑर्गन वाजवणारे, तबल्याची साथ करणारे, स्त्रीभूमिकाच काय पण गावागावातून नाटक उभे करताना गाणारे रंगमंचीय कुशल जसे जाणवत तसेच आवश्यकता असली तर इतर कलाकारांसाठीही दिग्दर्शकच नव्हे तर रंगभूषाकरसुद्धा असत!

"मखमली पडदा लेखक टेंब्यांनी ठेकेदार पद्धतीमध्येही रंगमंचीय कलाकार म्हणून सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या यादीत दत्तारामबापूंना उल्लेखिलेले होते. असे असले तरी, व्यावसायिक निर्माते रुजण्याच्या आधीच्या काळात मराठी उत्तमोत्तम नाट्यकृती गावांगावांतून यशस्वीपणे पोहचवणाऱ्या, तत्कालीन रंगभूमीशी सर्वतोपरी एकात्म झालेल्या अभिजात नाट्यकलावंतांत, दिग्दर्शकांत, अणि नटांत, नाट्यकृतीचा पुरेपूर अभ्यास करणारा, मेहनत घेणारा आणि रसिकमनाची तृप्ती हेच इप्सित ध्येय असलेला, सदैव निरीक्षण आणि निर्भीडपणे चांगले तेच स्वीकारणारा आणि पटणार नाही ते मोकळेपणाने सकारण सांगणारा हा कलाकार, बुद्धी, शिक्षण, रूप, अनुभव आणि ख्यातनामता पावलेल्यांनाही आदरणीयच राहिला.

"वसंत कानेटकरांच्या ‘रायगड’चे दिग्दर्शन करताना नाटककाराशी इतिहासाबद्दल वा संवादाबद्दल किंवा वाक्यरचनेबद्दल कसलीही चर्चा न करणाऱ्या दत्तारामबापूंनी ते बसवीत असलेल्या – दिग्दर्शित करीत असलेल्या त्या नाटकातील भूमिकांबद्दलच्या कल्पना नाटककाराला बोलून दाखविल्या आणि चक्क कानेटकरांना त्यांच्या या नाटकातील सेनापती हंबीरराव वेष पालटून येतो व फितूर झाल्याचा बहाणा करतो तो प्रवेश बसविण्यास नकार दिला. केवळ त्यांना तो पटत नाही हे बजावीत आणि त्याऐवजी पुन्हा दुसरा प्रवेश लिहून मागितला आणि दत्तारामबापूंच्या सांगण्याप्रमाणे नाटककार कानेटकरांनी हंबीरराव-संभाजी यांच्यामधला प्रवेश नव्याने लिहून दिला होता. हे दत्तारामबापूंचे यश. हंबीरराव सेनापती असला तरी त्याच्या तोंडची सर्व वाक्ये एखाद्या कुटुंबप्रमुखाने सर्वांना सांभाळून घेत दुसऱ्याची समजूत घाली आणि सर्वांना संभाळून घ्यावे – प्रत्येकाच्या जवळ असल्यानं तो सर्वांवर प्रेम करणारा, एकनिष्ठ सेवक आहे हे दाखवताना या अत्यंत कौटुंबिक, भावनोत्कट, संघर्ष उभा करताना महापुरुषाच्या जीवनावर पण मानसिक संघर्षावर आधारित अत्यंत नाजूक भावनांचे प्रगटीकरण करण्यात ‘रायगड’च्या नाटककार, सहभागी कलाकार यांच्या जोडीने दत्तारामबापूंची केवळ शिवाजी ही भूमिकाच नव्हे, तर दिग्दर्शक दत्तारामबापूंचेही हे निर्विवाद यश मान्य करायला हवे.

"गोव्यातील वळवई गावात १० जून १९१३ रोजी जन्मलेल्या मास्टर दत्तारामबापूंचा यंदा वयाचा शतकमहोत्सव! वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपासून नाटक-रंगभूमीच्या नादानं नादावलेल्या बापूंनी ललितप्रभा संगीत मंडळीनिर्मित ‘कुंजविहारी’ नाटकात कधी पेंद्या तर कधी कृष्ण या भूमिकेत बालनट म्हणून नाटय़प्रवास सुरू केला. ती कंपनी बंद पडल्यावर शारदा संगीत मंडळी, रंगबोधेच्छु नाटय़समाजमधून गरजेनुसार स्त्रीभूमिकाही केल्या. मग ते आले मोहन संगीत मंडळीत 1931च्या सुमारास! चार-पाच महिन्यात ती कंपनीही आटोपल्यावर मग त्याच वर्षी प्रभात संगीत मंडळीत ते आले व दत्ताराम वळवईकरांचे मास्टर दत्ताराम आणि त्यानंतर दत्तारामबापू झाले.’`सावकारी पाश’, `’पंतांची सून’ अशा विविध नाटकांत विविध भूमिका! बापूंचा विशेष म्हणजे प्रॉम्प्टरवर ते अवलंबून नसायचे. नाटक दोनदा तीनदा खड्या आवाजात सुस्पष्टपणे वाचायचे आणि चक्क आपल्या हस्ताक्षरात लिहून काढायचे. लिहून झालं की ती संपूर्ण लिखित नक्कल तोंडपाठ करायची. संवाद विसरायचा प्रश्नच नाही. कुठलीही भूमिका करायची हुकमी तय्यारी! या भूमिकांच्या जोडीने कलाकारांच्या जेवणाची जय्यत व्यवस्था. स्वतःच नाटकाचे बोर्ड लिहून जाहिरात, रंगमंचावर पडदे लावण्यापासून तिकीटविक्रीसाठी सुद्धा बापू चटपटीतपणे बसणारे. बुकिंगचा हिशेब चोख ठेवणारे!

"दत्तारामबापू हाताने लिहून काढलेले नाटक आपल्या दीड तासाच्या आंधोळीच्या वेळी चक्क मोकळेपणाने आठवत. त्यातल्या भूमिकांचा सांगोपांग विचार करीत. आंघोळ झाली की कुटुंबवत्सल बापू भाजी-मासे अशा बाजारासाठी जात आणि बायकोला भाजी नीट करून दिल्यावर गॅलरीत बसून पुन्हा नक्कल पाठ करण्यात गुंतत. मुलांचा अभ्यासही घेत. गणेशगल्लीच्या गणेशोत्सवासाठी चांगल्या नटसंचाचे नाटक मिळवून देत. विनामूल्य नाटय़स्पर्धा एवढाच त्या विभागातील लोकांसाठी असा बापूंचा सहभाग!

"ललितकलादर्श, पणशीकरांची नाट्यसंपदा यांच्या ’`इथे ओशाळला मृत्यू’साठी बापूंनी सरकत्या रंगमंचावर यथार्थ संभाजीही रसिकांपुढे उभा केला. बापूंची बायको आठवले. नाटकात भूमिका करणारी प्रतिभा, नाटक मंडळीची कलाकार. मास्टर दत्ताराम एकपत्‍नीव्रत जपणारे आणि अखेरच्या क्षणापर्यंत कुटुंबाला जपणारे! नाइटचे पाकीटसुद्धा न उघडता बायकोच्या हाती ठेवणारे! नाटकात तमुक भूमिका देणार्‍याला किती दिले, एवढेच का? असले प्रश्न न विचारणारे! साहित्य संघाचे डॉ. भालेराव बापूंचे दैवतच!

" ’रायगड’मधील प्रयोगाच्या दरम्यानची एक हकीकत! बापूंचा धाकटा मुलगा संतोष ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात! बापू म्हणत स्वतःच्या पायावर उभा राहा. मग लग्नाची गोष्ट. त्यात मुलीच्या घरून विरोध. बापू कमालीचे मानसिकदृष्ट्या हललेले! ’रायगड’मध्ये त्यावेळी कृष्णकांत दळवी संभाजीची भूमिका करायचा. शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या प्रवेशात शिवाजी महाराज भावोत्कटतेने संभाजीला युवराज शंभू म्हणून हाक मारीत – तो प्रवेश – बापू तळमळत बोलले, युवराज – शंभू – बाळ! प्रेक्षकांच्या लक्षात आले नाही-बापूंच्या भावोत्कटतेत उच्चारलेले संहितेत नसलेले बाळ! संतोषचा प्रेमविवाह झाला. आज संतोषच्या दोन मुली अमेरिकेत स्थायिक आहेत. धुतल्या चारित्र्याचे कुटुंबवत्सल आणि रंगभूमी इतकेच कलाविष्कारासाठी कसलाही अहम् मानापमान न बाळगणारे खऱ्या अर्थाने ’`शो मस्ट गो ऑन’ जपणारे ` या सम हाच’ असे मास्टर दत्तारामबापू! ’रायगड’, ’मत्स्यगंधा’सारख्या अविस्मरणीय नाट्यकृतींचे दिग्दर्शक आणि जमाना गाजवणारे अभिनेता म्हणून अनेक शतकोत्तर शतकेही रसिकमनांमध्ये अविस्मरणीय असतील."


पहा : मास्टर दत्ताराम