Jump to content

अबाबील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अबाबील - (अरबीत ابابیل) हा मध्यम आकाराच्या चिमणीसारख्या एका पक्षाचा प्रकार असतो, हा पक्षी अनेक दिवस सतत आकाशात उडू शकतो. या पक्ष्याशी निगडीत अरबस्तानात सहाव्या शतकात घडलेली एक ऐतिहासिक घटनादेखील आहे. प्रेषित मुहम्मद सलअम यांच्या जन्माच्या पन्नास दिवस अगोदर ही घटना घडली होती. मक्का शहराच्या शेजारील येमेन देशाचा एक 'अबराह' नावाचा ख्रिस्ती निग्रो शासक मक्केतील काबागृहावर लष्करासहीत आक्रमण करण्यासाठी आला होता. या लष्करात हत्तीदेखील होते. ते लष्कर मक्का शहरापासून थोड्या अंतरावर असतांना तेव्हा समुद्राकडून पक्ष्यांचे थवे आपल्या चोचीत व पंजात खडे घेऊन आले व त्या सैन्यावर आणलेल्या खड्यांचा वर्षाव केला. ज्या ज्या कुणावर तो खडा पडत असे त्याचे मांस गळून पडणे सुरू होत असे. अशा प्रकारे हे सर्व सैन्य नष्ट झाले होते. या घटनेचा उल्लेख क़ुरआनाच्या 'फिल (हत्ती)' नावाच्या अध्याय क्र. १०५ मध्येही आला आहे. (संदर्भ: तळटीप: क़ुरआनाचे भाषांतर 'दिव्य क़ुरआन', मूळ उर्दू भाषांतरकार : अबुल आला मौदुदी, मराठी भाषांतर: अब्दुल जब्बार क़ुरैशी, पान नं. 1004-1005

एक पक्षी
अबाबील

) [१]

  1. ↑ मौदुदी, अबुल आला (06/20/2016). दिव्य कुरआन. Mumbai: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, 4, हमीद बिल्डिंग , मुंबई - 400011. pp. Pages 1004 - 1005. ISBN 81-87-634-01 Check |isbn= value: length (सहाय्य). |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)