Jump to content

अप्पासाहेब बाळासाहेब पंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अप्पासाहेब बाळासाहेब पंत
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावParshuram संपादन
आडनावPant संपादन
जन्म तारीख११ सप्टेंबर 1912 संपादन
जन्मस्थानऔंध संस्थान संपादन
मृत्यू तारीख५ ऑक्टोबर 1992 संपादन
मृत्यूस्थानपुणे संपादन
वडीलभवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी संपादन
व्यवसायराजदूत, वकील, राजकारणी, लेखक संपादन
पदशिक्षण मंत्री संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाऑक्सफर्ड विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ संपादन
पुरस्कारनागरी सेवेतील पद्मश्री पुरस्कार संपादन

अप्पासाहेब पंत (१९१२-१९९२), ज्यांना आपा पंत,[] अप्पा पंत, अप्पा साहेब पंत, अप्पासाहेब बाळासाहेब पंत तसेच परशुराम-राव पंत (परशुराम हे त्यांचे प्रथम नाव) म्हणूनही ओळखले जाते, हे एक भारतीय मुत्सद्दी, औंध संस्थानचे राजकुमार, गांधीवादी, लेखक आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.[][][] स्वभावाने तत्त्वज्ञ आणि अंतःकरणाने गूढवादी असलेल्या पंत यांनी भारत सरकारसाठी चाळीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक मुत्सद्दी म्हणून सेवा बजावली. त्यांनी केन्या, युगांडा, टांगानिका, झांझिबार, उत्तर ऱ्होडेशिया, दक्षिण ऱ्होडेशिया, न्यासालँड आणि बेल्जियन वसाहत असलेल्या काँगो यांसारख्या विविध आफ्रिकन देशांमध्ये भारतीय आयुक्त म्हणून काम केले आणि त्यानंतर इंडोनेशिया, नॉर्वे, इजिप्त, युनायटेड किंगडम आणि इटली यांसारख्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांनी सिक्कीम राज्यामध्ये भारताचे राजकीय अधिकारी (पॉलिटिकल ऑफिसर) म्हणूनही काम केले.[] भारत सरकारने १९५४ मध्ये, समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले,[] ज्यामुळे ते या पुरस्काराच्या पहिल्या मानकरींपैकी एक ठरले.

जीवनचरित्र

[संपादन]

पंत यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१२ रोजी[] ब्रिटीश भारतातील औंध संस्थानाची राजधानी असलेल्या औंध येथे झाला. ते संस्थानाचे शासक भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी[] यांचे दुसरे पुत्र होते.[] स्थानिक संस्थांमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेतील पदवी पूर्ण केली. त्या नंतर त्यांनी ब्रेसनोज कॉलेज, ऑक्सफर्ड येथे तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र विषयांचा अभ्यास केला.[][] लंडन येथील लिंकन इन मधून बॅरिस्टर ॲट लॉ पूर्ण करून १९३७ मध्ये ते भारतात परतले. याकाळात भारतीय स्वातंत्र्य चळवळीने मोठा वेग घेतला होता.[] पंत यांनी १९४२ मध्ये नलिनी देवी[] यांच्याशी विवाह केला. नलिनी देवी या एक वैद्यकीय डॉक्टर आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या फेलो होत्या. या दांपत्याला अदिती पंत, अनिकेत आणि अवलोकिता अशी तीन मुले झाली.[] वयाच्या ८० व्या वर्षी, ५ ऑक्टोबर १९९२ रोजी,[] वृद्धापकाळातील आजाराने त्यांचे निधन झाले.[]

राजकीय आणि मुत्सद्दी कारकीर्द

[संपादन]

पंत यांनी त्यांच्या राजकीय आणि मुत्सद्दी कारकीर्दीची सुरुवात १९४४ मध्ये औंध संस्थानाचे शिक्षण मंत्री म्हणून केली. याकाळात त्यांचे वडील या संस्थानाचे शासक होते.[] त्यांचा हा कार्यकाळ एक वर्षाचा होता आणि या काळात तसेच त्यानंतरही, ते संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यासंदर्भातील चर्चेत सहभागी होते.[] भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला, त्यांची नियुक्ती आफ्रिकेत करण्यात आली. त्यांनी केन्या, युगांडा, टांगानिका, झांझिबार, उत्तर ऱ्होडेशिया, दक्षिण ऱ्होडेशिया, न्यासालँड आणि बेल्जियन वसाहत असलेल्या काँगोमध्ये काम केले.[] १९५४ मध्ये, जेव्हा भारताचे चीनसोबतचे संबंध ताणलेले होते, तेव्हा त्यांची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.[] १९५६ मध्ये अलिप्ततावादी चळवळीच्या स्थापनेसाठी झालेल्या बांडुंग परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी तिबेट, भूतान आणि सिक्कीम मधील मोहिमांचे प्रभारी अधिकारी म्हणूनही काम केले,[१०] तसेच इंडोनेशिया (१९६१–६४), नॉर्वे (१९६४–६६), इजिप्त (१९६६–६९),[११] युनायटेड किंगडम (१९६९–७२) आणि इटली (१९७२–७५) मध्ये राजदूत म्हणून कार्य केले.[][]

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

अप्पासाहेब पंत हे 'एन्ट्रप्रेन्योरशिप ऑफ स्पिरिट'चा गौरव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेम्पलटन पुरस्काराचे माजी परीक्षक होते.[१२][१३] त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आठ पुस्तके प्रकाशित केली.[][]

  • सूर्य नमस्कार, अ‍ॅन एन्शंट इंडियन एक्सरसाइज* (१९७०)[१४]
  • टुवर्ड्स सोशालिस्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी (१९७३)[१५]
  • अ मोमेंट इन टाईम (१९७४)[१६]
  • मंडला: अ‍ॅन अवेकनिंग (१९७६)[१७]
  • सर्व्हायव्हल ऑफ द इंडिव्हिज्युअल (१९८३)[१८]
  • अनडिप्लोमॅटिक इन्सिडेंट्सb(१९८७)[१९]
  • अ‍ॅन अनयुज्युअल राजा – महात्मा गांधी अँड द औंध एक्सपेरिमेंट (१९८९)[२०]
  • अ‍ॅन एक्सटेंडेड फॅमिली ऑफ फेलो पिल्ग्रिम्स (१९९०)[२१]

पुरस्कार

[संपादन]

१९५४ मध्ये, समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे ते या पुरस्काराच्या पहिल्या मानकरींपैकी एक ठरले.

संदर्भ

[संपादन]
  1. see for instance declassified file no. 7(4)-P, 1955 at the National Archives of India, available on line via https://www.abhilekh-patal.in/
  2. Guyot-Réchard, Bérénice (2022). "Stirring Africa towards India: Apa Pant and the Making of Post-Colonial Diplomacy, 1948–54" (PDF). The International History Review. 44 (4): 892–913. doi:10.1080/07075332.2022.2093941. ISSN 0707-5332. S2CID 250598023 Check |s2cid= value (सहाय्य).
  3. 1 2 3 4 5 6 7 8 "Benegal". Benegal. 2015. 30 March 2015 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 4 5 6 7 "Apa Pant in East Africa". Awaaz Magazine. 1 November 2011. 2 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 March 2015 रोजी पाहिले.
  5. "Padma Shri" (PDF). Padma Shri. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 11 November 2014 रोजी पाहिले.
  6. 1 2 3 "WMF Labs". WMF Labs. 2015. 30 March 2015 रोजी पाहिले.साचा:User-generated source
  7. "Free Library". Free Library. 2015. 30 March 2015 रोजी पाहिले.
  8. Bowers, John (2021-02-16). "Principal's Blog: 16th February 2021". Brasenose College, Oxford. 2022-02-02 रोजी पाहिले.
  9. Gaurav Desai, Commerce with the Universe: Africa, India, and the Afrasian Imagination, p. 75
  10. "TH Library" (PDF). TH Library. 2015. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 March 2015 रोजी पाहिले.
  11. "Middle East Institute". Middle East Institute. 2015. 30 March 2015 रोजी पाहिले.
  12. "The Templeton Prize – Judges. Previous Judges". Templeton Foundation. 2015. 30 March 2015 रोजी पाहिले.
  13. "Templeton About". Templeton Foundation. 2015. 30 March 2015 रोजी पाहिले.
  14. Apa Pant (1970). Surya Namaskar, an Ancient Indian Exercise. Sangam Books. ISBN 9788125013877.
  15. Bhuleshkar, Ashok V.; Pant, Apa B. (1973). Towards Socialist Transformation of Indian Economy. Humanities Press.
  16. Pant, Apa B. (1974). A Moment in Time. United Kingdom: Hodder & Stoughton Ltd. ISBN 9780340147900.
  17. Apa B. Pant (1976). Mandala: An Awakening. Sangam Books. p. 218. ISBN 978-0861310630.
  18. Apa Pant (1983). Survival of the Individual. Sangam Books. ISBN 9780861314003. OCLC 13215863.
  19. Pant Apa B. (1987). Undiplomatic Incidents. Majestic Books. ISBN 9780861316908.
  20. Apa Pant (1989). An Unusual Raja Mahatma Gandhi and the Aundh Experiment. Oscar Publications. ISBN 9780861317523.
  21. Apa Pant (1990). An Extended Family or Fellow Pilgrims. Oscar Publications. ISBN 9780863111099.