Jump to content

अपूर्वी चंदेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अपुर्वी चंदेला या पानावरून पुनर्निर्देशित)
अपूर्वी सिंह चंदेला
अपूर्वी चंदेला
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ४ जानेवारी १९९३ (वय २५ वर्षे),
जन्मस्थान जयपूर
उंची १.५६ मीटर
वजन ५४ किलो.
खेळ
देश भारत
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर भारत


अपूर्वी सिंह चंदेला ( ४ जानेवारी १९९३) ही एक भारतीय नेमबाज आहे.[][]

कुटुंब

[संपादन]

अपूर्वीचा जन्म जयपूरमधील चंदेल राजपूत कुटुंबात झाला.तिच्या वडिलांचे नाव कुलदीप सिंग चंदेला व आईचे नाव बिंदू राठोड. त्यांचे एक हॉटेल आहे.[][]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

अपूर्वी चंदेलाने अजमेरच्या मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल व जयराम गायत्री देवी गर्ल्स स्कूल येथून शालेय शिक्षण व दिल्ली विद्यापीठातील येशू आणि मरीया काॅलेजात समाजशास्त्राचा अभ्यास केला.[]

कारकीर्द

[संपादन]

२०१२ मध्ये चंदेलाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. वरिष्ठ गटात तिने मिळवलेले हे पहिलेच पदक होते. २०१४ मध्ये हेग येथे इनशूट चॅम्पियनशिपमध्ये तिने चार पदके जिंकली होती. त्यात दोन वैयक्तिक आणि दोन सांघिक पदकांचा समावेश होता.

२०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

[संपादन]

तिने दहा मीटर एर रायफल स्पर्धेत भाग घेऊन ग्लासगो येथे २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिने २०६.७ गुणांची कमाई करून स्पर्धेत नवीन विक्रम केला.

महिला १० मीटर रायफल स्पर्धेत २००९ च्या रियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या चंदेलाने ५१ स्पर्धांमध्ये पात्रता फेरीत ३४ व्या स्थानावर झेप घेतली.

२०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

[संपादन]

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपूर्वीने १० मीटर एर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले.[]

२०१८ आशियाई खेळ

[संपादन]

इंडोनेशियात २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एर रायफलच्या मिश्र दुहेरीत अपूर्वीने रवी कुमारच्या साथीत कांस्य पदक मिळवले.[]

२०१८ आयएसएसएफ स्पर्धा

[संपादन]

सप्टेंबर २०१८ मध्ये दक्षिण कोरियातील चांग्वोन येथे झालेल्या स्पर्धेत १० मीटर एर रायफलच्या स्पर्धेत चौथे स्थान मिळवून अपूर्वीने २०२० साली टोकियोमध्ये भरणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा मिळवला.[]

२०१९ आयएसएसएफ स्पर्धा

[संपादन]

फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली यथील डॉ.कर्णी सिंग शूटींग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत १० मीटर एर रायफलच्या स्पर्धेत अपूर्वीने विश्व विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. तिने २५२.९ गुण मिळवले.[][१०]

अ.क्र. कार्यक्रम स्पर्धा वर्ष स्थळ पदक
१० मी एर रायफल ISSF वर्ल्ड कप २०१५ चांग्वोन
१० मी एर रायफल ISSF वर्ल्ड कप फायनल २०१५ म्यूनिच
१० मी एर रायफल मिश्र संघ २०१८ आशियाई खेळ २०१८ इंडोनेशिया कांस्य
१० मी एर रायफल आयएसएसएफ विश्वचषक २०१९ २०१९ भारत सुवर्ण

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Glasgow 2014 - 10m Air Rifle Women's Finals". results.glasgow2014.com (स्पॅनिश भाषेत). 2014-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Rediff Labs: Breaking News | Local News | News Today | Live News". localnews.rediff.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-25 रोजी पाहिले.
  3. ^ "Rio Olympics 2016: Jitu Rai finishes 8th in 10m Air Pistol; Apurvi Chandela, Ayonika Paul out in qualifiers - Firstpost". www.firstpost.com. 2018-07-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Jaipur girl realises dream of shooting alongside Bindra, wins two gold". Rediff. 2018-07-26 रोजी पाहिले.
  5. ^ Srinivasan, Kamesh (2012-12-25). "Apurvi Chandela takes air rifle gold". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-07-26 रोजी पाहिले.
  6. ^ Webdunia. "राष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक" (इंग्रजी भाषेत). 2018-09-04 रोजी पाहिले.
  7. ^ "Asian games 2018 : अपूर्वी-रवीकडून पदक लक्ष्याचा प्रारंभ". www.esakal.com. 2018-09-04 रोजी पाहिले.
  8. ^ "महिला निशानेबाज अंजुम और अपूर्वी ने हासिल किया ओलिंपिक कोटा-Navbharat Times". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2018-09-04 रोजी पाहिले.
  9. ^ "India's Chandela rocks New Delhi's final hall: gold and world record". ISSF (इंग्रजी भाषेत). 2019-02-23 रोजी पाहिले.
  10. ^ "शूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध". News18 Lokmat. 2019-02-23 रोजी पाहिले.