Jump to content

अपर्णा यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अपर्णा यादव
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख५ फेब्रुवारी 1990 संपादन
जन्मस्थानउत्तराखंड संपादन
वैवाहिक जोडीदारPrateek Yadav संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Manchester संपादन
निवासस्थानउत्तराखंड संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

अपर्णा बिष्ट यादव (जन्म: ५ फेब्रुवारी, १९९०) या एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.[] भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असलेल्या अपर्णा, समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांच्या सून म्हणून ओळखल्या जातात.[][]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

अपर्णा यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या कुटुंबाच्या वारसा असलेल्या समाजवादी पक्षातून सुरू झाली, परंतु कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.[][]

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतून त्यांनी निवडणूक राजकारणात पदार्पण केले. लखनौ कँटोन्मेंट मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जानेवारी २०२२ मध्ये, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[][]

सप्टेंबर २०२४ मध्ये योगी आदित्यनाथ सरकारने त्यांची उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. सध्या त्या या पदावर कार्यरत आहेत.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

यादव या उत्तर प्रदेशचे माजी पत्रकार आणि राज्य माहिती आयुक्त अरविंद सिंह बिष्ट आणि लखनौ महानगरपालिकेतील अधिकारी अंबी बिष्ट यांच्या कन्या आहेत. अपर्णा यांचा जन्म अरविंद सिंह बिष्ट आणि अंबी बिष्ट यांच्या पोटी ५ फेब्रुवारी १९९० रोजी झाला. त्यांचे वडील माजी पत्रकार आणि उत्तर प्रदेशचे राज्य माहिती आयुक्त होते. अपर्णा यांनी लखनौ येथील लोरेटो कॉन्व्हेंट इंटरमीडिएट कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी युनायटेड किंग्डमला गेल्या. त्यांनी मँचेस्टर विद्यापीठातून 'आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण' या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमीसोबतच, त्या एक प्रशिक्षित शास्त्रीय आणि उप-शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी लखनौच्या भातखंडे संगीत संस्थेतून संगीताचे शिक्षण घेतले आहे.[][][]

त्यांचा विवाह मुलायमसिंह यादव यांचे धाकटे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्याशी झाला होता. यादव कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे प्रतीक सक्रिय राजकारणात नव्हते; त्यांनी आपला रिअल इस्टेट व्यवसाय आणि फिटनेस क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते.[][] प्रतीक यादव यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी १३ मे २०२६ रोजी लखनौ येथे निधन झाले. वैद्यकीय अहवालानुसार, हृदयविकाराचा झटका येऊन (मॅसिव्ह पल्मोनरी थ्रॉम्बोइम्बोलिझम) मुळे त्यांचा मृत्यू झाला. अपर्णा आणि प्रतीक यांना एक मुलगी आहे.[][१०]

सामाजिक कार्य

[संपादन]

अपर्णा यादव बी-अवेर (इंग्लिश:'bAware') नावाची एक संस्था चालवतात, जी प्रामुख्याने महिला सुरक्षा, हक्क तसेच महिलांचे प्रश्न, प्राण्यांचे कल्याण आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर काम करते.[११]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Aparna Yadav, Akhilesh Yadav's sister-in-law, appointed vice-chairperson of women's panel by Yogi Adityanath govt". LiveMint. 4 September 2024. 15 September 2025 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 The Hans India (11 March 2017). "Aparna Yadav loses to BJP's Rita Bahuguna Joshi" (इंग्रजी भाषेत). 19 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2022 रोजी पाहिले.
  3. 1 2 3 Deccan Chronicle (11 March 2017). "Aparna Yadav loses to BJP's Rita Bahuguna Joshi" (इंग्रजी भाषेत). 19 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2022 रोजी पाहिले.
  4. "Aparna Yadav joins BJP: All you need to know". Jagran Josh. 19 January 2022. 15 September 2025 रोजी पाहिले.
  5. "Social activist Aparna: The younger bahu who admires Mulayam and praises Modi". The Indian Express. 24 February 2016. 15 September 2025 रोजी पाहिले.
  6. "प्रतीक यादव की पत्नी अपर्णा यादव कौन हैं? बीजेपी की दिग्गज नेता, अभी संभाल रहीं ये बड़ी जिम्मेदारी". १४ मे २०२६ रोजी पाहिले.
  7. "UP elections 2022: Mulayam Singh Yadav's daughter-in-law Aparna Yadav joins BJP". The Times of India. 19 January 2022. 15 September 2025 रोजी पाहिले.
  8. "Aparna Yadav joins BJP ahead of UP Assembly elections". India Today. 19 January 2022. 15 September 2025 रोजी पाहिले.
  9. "पति प्रतीक यादव को नमन करते हुए फूट-फूट कर रोईं अपर्णा, बेटियों ने अर्पित की श्रद्धांजलि". एनडीटीवी. 2026-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ मे २०२६ रोजी पाहिले.
  10. "फेफड़े में खून का थक्का जमने से कार्डिएक अरेस्ट आया; आज लखनऊ में अंतिम संस्कार". bhaskar.com. १४ मे २०२६ रोजी पाहिले.
  11. "Who is Aparna Yadav: Prateek Yadav's wife and 'chhoti bahu'". टाइम्स ऑफ इंडिया. १४ मे २०२६ रोजी पाहिले.