Jump to content

अपर्णा बालमुरली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Aparna Balamurali (es); অপর্ণা বালামুরলী (bn); Aparna Balamurali (ast); अपर्णा बालमुरली (mr); Aparna Balamurali (sq); آپارنا بالامورالی (fa); 阿帕娜·巴拉穆拉里 (zh); アパルナー・バーラムラリ (ja); అపర్ణ బాలమురళి (te); ਅਪਰਨਾ ਬਾਲਾਮੁਰਾਲੀ (pa); അപർണ ബാലമുരളി (ml); Aparna Balamurali (nl); 阿帕娜·巴拉木拉里 (zh-hant); अपर्णा बालामुरली (hi); ᱚᱯᱚᱨᱱᱟ ᱵᱟᱞᱚᱢᱩᱨᱟᱞᱤ (sat); Aparna Balamurali (uz); Aparna Balamurali (en); أبارنا بالامورالي (ar); اپرنا بالامورالی (ur); அபர்ணா பாலமுரளி (ta) ভারতীয় চলচ্চিত্র অভিনেত্রী ও প্লেব্যাক গায়িকা (bn); acteur (nl); 印度女演員 (zh-hant); Indian Film Actress & Playback Singer (en); భారతీయ సినిమా నటి (te); Indian Film Actress & Playback Singer (en); actores a aned yn 1995 (cy); भारतीय अभिनेत्री (जन्म: 1995) (hi); இந்திய திரைப்பட நடிகை மற்றும் பின்னணி பாடகி (ta)
अपर्णा बालमुरली 
Indian Film Actress & Playback Singer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर ११, इ.स. १९९५
तृशुर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०१५
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अपर्णा बालमुरली (जन्म: ११ सप्टेंबर १९९५)[] ही एक भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे, जी प्रामुख्याने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करते. तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दक्षिणेकडील फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे.

अपर्णा ही महेशिन्ते प्रथाकारम (२०१६), संडे हॉलिडे (२०१७), सूरराय पोत्रू (२०२०), रायन (२०२४) आणि किष्किंधा कांडम (२०२४) मधील भूमिकांसाठी ओळखली जाते. सूरराय पोत्रु मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

अपर्णाचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे संगीत दिग्दर्शक केपी बालमुरली मेनन आणि शोभा बालमुरली यांच्या घरी झाला.[] तिने देवमथा सीएमआय पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले.[]

कारकीर्द

[संपादन]

२०१५ मध्ये, अपर्णाचा पहिला चित्रपट ओरू सेकंड क्लास यात्रा प्रदर्शित झाला जो मल्याळम भाषेत होता. पुढील वर्षी २०१६ मध्ये हास्य-नाट्यपट महेशिन्ते प्रथिकारम मुळे ती प्रसिद्ध झाली. ह्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार (मल्याळम) चे नामांकन मिळाले.[][] तिने कॉमेडी ओरु मुथास्सी गाडा (२०१६) मध्ये देखील काम केले.[] तिने ८ थोट्टक्कल (२०१७) मधून तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिने संडे हॉलिडे (२०१७) आणि थ्रिसिवापेरूर क्लिप्थम (२०१७) मध्ये भूमिका केल्या. दोन्ही चित्रपटांमध्ये ती अभिनेता आसिफ अलीसोबत आहे.[] तिचे २०१८ मध्ये रिलीज झालेले चित्रपट म्हणजे कामुकी आणि बी. टेक हे होते.[] जी.व्ही. प्रकाशकुमार अभिनीत सर्वम थाला मायाम (२०१९) मध्ये तिला तमिळ चित्रपटात काम दिले गेले.[१०] तिचे त्यानंतरचे मल्याळम चित्रपट म्हणजे मिस्टर अँड मिस राउडी (२०१९) आणि जीम बूम भा (२०१९) होते.[११]

सूर्या सिवकुमार अभिनीतसूरराय पोत्रू (२०२०) मध्ये ती बोम्मी म्हणून दिसली. हा चित्रपट जी.आर. गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारीत आहे ज्यात अपर्णाने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ह्या चित्रपटाला ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले ज्यात अपर्णासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री देखील होता. सोबतच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेर समीक्षक पुरस्कार (तमिळ) देखील मिळाला.[१२] चित्रपट २०२४ सिरफिरा म्हणून हिंदीमध्ये बनवला गेला आणि राधिका मदनने ही भूमिका साकारली. अपर्णाचा पुढचा तमिळ चित्रपट थीथम नंद्रम (२०२१) होता.[१३]

पुरस्कार

[संपादन]
वर्ष चित्रपट पुरस्कार श्रेणी निकाल संदर्भ
२०२० सूरराय पोत्रु राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी [१४]
२०२२ फिल्मफेअर अवॉर्ड्स साउथ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी समीक्षक पुरस्कार - तमिळ विजयी [१५]
२०२० SIIMA पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी SIIMA समीक्षक पुरस्कार - तमिळ विजयी [१६]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Happy Birthday Aparna Balamurali!Fans send out heartfelt wishes for the Kollywood actress". zoomtventertainment.com (इंग्रजी भाषेत). 21 September 2020.
  2. ^ "National Film Awards 2022 highlights: Soorarai Pottru and Tanhaji The Unsung Warrior win big". Hindustan Times. 22 July 2022. 22 July 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Actress Aparna Balamurali Family Photos with Father, Mother & Biography | Latest Tamil News". Latest Tamil News. 15 November 2020.[permanent dead link]
  4. ^ അജിത് (12 January 2018). "ഇത് നിങ്ങളറിയാത്ത അപർണ ബാലമുരളി!". Malayala Manorama (मल्याळम भाषेत). 26 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 August 2018 रोजी पाहिले.
  5. ^ James, Anu (9 जून 2017). "64th Filmfare South Awards 2017: Here's Malayalam, Tamil, Telugu, Tamil nomination lists". International Business Times. 11 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Maheshinte Prathikaram review: Finally, an intelligent comedy". Sify. 6 February 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "Oru Muthassi Gadha Review |". 15 September 2016.
  8. ^ "Aparna Balamurali is a scribe in her Tamil debut". 5 April 2017.
  9. ^ "'B Tech' releases today (May 5)". Sify. 5 May 2018. 5 May 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 February 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "Aparna Balamurali signs Sarvam Thaala Mayam". The New Indian Express. 30 November 2017. 6 August 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Mr & Ms Rowdy review:Predictable, but ends up as an average watch". Sify. 23 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  12. ^ "Aparna Balamurali is paired alongside Suriya in her next". The Times of India. 7 April 2019. 17 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 September 2020 रोजी पाहिले.
  13. ^ Chandar, Bhuvanesh (12 March 2021). "Theethum Nandrum Movie Review: A simple, neatly bound tale about depravity". Cinema Express. 13 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 August 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "68th National Film Awards | Soorarai Pottru wins Best Film award". The Hindu. 22 July 2022.
  15. ^ "Winners List : 67th Parle Filmfare Awards South 2022 with Kamar Film Factory". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 27 May 2023 रोजी पाहिले.
  16. ^ "Manju Warrier, Suriya, others win at SIIMA Awards: Full list of winners". The News Minute. 21 September 2021. 21 September 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित.