Jump to content

अपरा मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Apara Mehta; અપરા મહેતા; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; अपरा मेहता; اپارا مہتا; Apara Mehta; اپارا ميهتا; Apara Mehta; अपरा मेहता; ᱟᱯᱟᱨᱟ ᱢᱮᱦᱛᱟ; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; অপরা মেহতা; Apara Mehta; Apara Mehta; अपरा मेहता; Apara Mehta; Apara Mehta; अपरा मेहता; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Апара Мехта; Apara Mehta; अपरा मेहता; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; Apara Mehta; ਅਪਾਰਾ ਜਰੀਵਾਲਾ; అపారా మెహతా; actriz india; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; actriz india; actriu índia; actores a aned yn 1960; ban-aisteoir; بازیگر هندی; 印度女演員; indisk skuespiller; भारतीय अभिनेत्री; indisk skådespelare; שחקנית הודית; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेत्री; இந்திய நடிகை; attrice; ভারতীয় অভিনেত্রী; actrice indienne; indijska glumica; އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް; Indian actress; pemeran asal India; indisk skodespelar; indisk skuespiller; Indiaas actrice; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി; actriz india; indische Schauspielerin; aktore; Indian actress; ممثلة هندية; actriță indiană; акторка; Apara Jariwala; অপরা জারীওয়ালা
अपरा मेहता 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑगस्ट १३, इ.स. १९६०
भावनगर
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q4779112
आय.एम.डी.बी. दुवा: nm0962574
विकिडाटावर माहिती संपादित करा

अपरा मेहता ही एक भारतीय टेलिव्हिजन आणि बॉलीवूड अभिनेत्री आहे ज्याला क्यूंकी सास भी कभी बहू थी या प्रसिद्ध शोमध्ये तुलसीच्या सासू सविता मनसुख-विराणीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

गुजरातच्या भावनगरमध्ये जन्मलेली अपरा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असून, एक कलावंत म्हणून ती नवीन नाही. तिने लहान वयापासूनच शास्त्रीय संगीत आणि कथक शिकायला सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी, तिने अहमदाबाद दूरदर्शनसाठी मुलांच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

१९८० मध्ये तिने भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट व्यक्तिमत्व दर्शन जरीवाला यांच्याशी लग्न केले, ज्यांच्यासोबत तिला एक मुलगी आहे. ते दोघे परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत, परंतु त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या माँ एक्सचेंज या रिॲलिटी शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे काही अंश दाखवण्यात आले होते.

कारकीर्द

[संपादन]

नाट्यक्षेत्रातील कुटुंबात लग्न झाल्यामुळे तिची कारकीर्द स्वाभाविकपणे नाट्यक्षेत्राकडे वळली. मेहता १९८१ पासून रंगमंचावर कार्यरत आहेत. त्यांनी १५० हून अधिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटकांमध्येच त्यांना एक स्थिर कारकीर्द मिळाली आहे.

अपराने वयाच्या १५ व्या वर्षी मुंबई दूरदर्शनसाठी संतकुडी नावाच्या लहान मुलांच्या कार्यक्रमाचे अँकरिंग करून टेलिव्हिजन कारकीर्दीची सुरुवात केली. तिचा पहिला मोठा ब्रेक होता एक महल हो सपनो का (१९९९), ज्यामध्ये तिने पारोची भूमिका केली. तिला मोठे यश एकता कपूरच्या ब्लॉकबस्टर क्यूंकी सास भी कभी बहू थी (२०००-०६) मध्ये मिळाले, ज्यामध्ये तिने स्टार प्लस वर सविता मनसुख विराणी (मुख्य पात्र तुलसीची सासू) ची भूमिका केली. त्यानंतर ती सात फेरे (२००६) मध्ये कुक्की काकी आणि परीवार (२००७), धक धक इन दुबई (२००७), दिल्लगी, अल्पविराम, हम हैं अनारी, लव्ह मॅरेज आणि चंदन का पालन यांसारख्या इतर कार्यक्रमांमध्ये नकारात्मक भूमिकेत देखिल दिसली. तिने सजन रे झुट मत बोलो (२००९-१२) मध्ये दामिनी देवी दिवाण, गोलमाल है भाई सब गोलमाल है (२०१२) मध्ये परी म्हणून सब टीव्हीवर आणि कलर्स टीव्हीवरील हमारी सास लीला (२०११) मध्ये लीला म्हणून विनोदी भूमिका केल्या.

तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकाही साकारल्या आहेत. कलर्स टीव्हीवरील फिरंगी बहूमध्ये तिने भूमिका साकारली होती. ती सब टीव्हीवरील तू मेरे अगल बगल है मध्ये बासुंदीच्या भूमिकेत दिसायची. ती २०१८ मध्ये स्टार प्लसवरील कयामत की रात या वीकेंडच्या हॉरर-थ्रिलर शोमध्ये होती. ती ये रिश्ता क्या कहलाता है (२०२१), भाबीजी घर पर हैं! (२०१८) आणि साई-श्रद्धा आणि सबुरी मध्ये तिने काम केले. छोटी सरदारनी (२०२१) मध्ये तिने मनमिता चड्ढाची भूमिका केली आणि नंतर मॅडम सर (२०२२) मध्ये ती होती.

कामांची सूची

[संपादन]

दूरचित्रवाणी

[संपादन]
वर्षमालिकापात्र
१९९८अल्पविराम
१९९९एक महल हो सपनों का
२०००-०६क्यूंकी सास भी कभी बहू थीसविता मनसुख विराणी
२००१चंदन का पालन रेशम की डोरीकुसुम
२००४खिचडी
२००६सात फेरेकुक्की काकी
२००६करम अपना अपना
२००७परिवार
२००७धक धक इन दुबई
२००९राजा की आयेगी बारात
२००९-१२सजन रे झुट मत बोलोदामिनीदेवी दिवाण
२०११हमारी सास लीलालीला
२०१२-१३क्या हुआ तेरा वादासुहासी आलोक सिंग
२०१२गोलमाल है भाई सब गोलमाल हैपरी
२०१३-१४फिरंगी बहू
२०१४-१६जमई राजानानी[]
२०१४तू मेरे आगल बगल हैबासुंदी
२०१६वो तेरी भाभी है पगलेमिसेस दिलवाले
नया महिसागर
२०१६ब्रह्मराक्षसजसमित/जस्सी/दादी बुवा
२०१७बकुला बुवा का भूतरेखा
कयामत की रातमाधुरी ठाकूर (गौरीची आजी)
२०१८भाबीजी घर पर हैं!अल्पा
२०२१ये रिश्ता क्या कहलाता है
२०२१इंडियावाली माँकेसर मासी
२०२१छोटी सरदारनीमनमिता चड्ढा
२०२२मॅडम सरसरिता सिंग
२०२२जय हनुमान - संकट मोचन नाम तिहारो[]
२०२३अनुपमागुरुमा मालती देवी
२०२४युनायटेड स्टेट ऑफ गुजरात ॲज इंदिरागुजराती शो
२०२५क्यूंकी सास भी कभी बहू थी २सविता मनसुख विराणी
(संग्रहित फुटेज, चित्र आणि आत्मा ह्या रुपात)

चित्रपट

[संपादन]
वर्षचित्रपटपात्र
२००१ये तेरा घर ये मेरा घरदयाशंकरची मोठी बहीण
२००१चोरी चोरी चुपके चुपकेवेश्या
२००२देवदासबडी आपा
२००७जस्ट मॅरिड
२०१०तीस मार खानतबरेझ मिर्झा खानची आई
२०२३बच्चूभाईगुजराती चित्रपट[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi had a lot of soul, says Apara Mehta". India TV. 8 July 2023 रोजी पाहिले.
  2. "Apara Mehta in Jamai Raja". MyTrendyZone. 12 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. "Apara Mehta: It was difficult to work in a 'gaon' for Jai Hanuman | TV - Times of India Videos". The Times of India.
  4. "Bachubhai Movie: Showtimes, Review, Songs, Trailer, Posters, News & Videos". The Times of India. 8 July 2023 रोजी पाहिले.