अन्नपूर्णा गवत
Appearance
अन्नपूर्णा गवत | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||
Pandanus amaryllifolius |
अन्नपूर्णा गवत हे पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया खंडात उगवणारे सुगंधित गवत आहे. याचे जीवशास्त्रीय नाव Pandanus amaryllifolius असून, यात असणाऱ्या 2-acetyl-1-pyrroline या रासायनिक द्रव्यामुळे याला सुगंध येतो. श्रीलंका, मालदीव, भारत, पाकिस्तान, बांगलादेश सहित अनेक देशात याचा वापर खाद्यपदार्थात होतो. साध्या तांदळाचा भात शिजताना त्यात याचे एक पान टाकले असता, बासमती तांदळा सारखा सुगंध येतो. याचा दैनंदिन जीवनात तसेच विशेषतः बिर्याणी पुलाव करताना वापर केल्या जातो
याचे बोलीभाषेतील इतर नावे - बासमती गवत, पुलाव पत्ती, आंबेमोहोर गवत इत्यादी.