Jump to content

अनोयारा खातून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Anoyara Khatun (es); আনোয়ারা খাতুন (শিশু অধিকার কর্মী) (bn); Anoyara Khatun (fr); అనోయారా ఖాతున్ (te); ਅਨੋਯਰਾ ਖਟੂਨ (pa); Anoyara Khatun (nl); Anoyara Khatun (pt-br); अनोयारा खातून (mr); ᱚᱱᱳᱭᱟᱨᱟ ᱠᱷᱟᱛᱩᱱ (sat); Anoyara Khatun (pt); অনয়ৰা খাতুন (as); Anoyara Khatun (en); Anoyara Khatun (de); அனோயரா கதுன் (ta) Indian children's rights activist (en); Indian children's rights activist (en); குழந்தைகள் உரிமை ஆர்வலர் (ta)
अनोयारा खातून 
Indian children's rights activist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९९६
नागरिकत्व
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अनोयारा खातून (जन्म: १९९६) ही एक भारतीय बाल हक्क कार्यकर्ती आहे. २०१७ मध्ये, वयाच्या २१ व्या वर्षी, पश्चिम बंगाल राज्यात बाल तस्करी आणि बालविवाहाविरुद्ध लढण्यात दिलेल्या योगदानाबद्दल तिला महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आयुष्य

[संपादन]

अनोयाराचा जन्म १९९६ मध्ये पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथील छोटो असगरा गावात एका दारिद्रय रेषेखालील कुटुंबात झाला.[][][] लहान वयातच तिचे वडील वारले होते. वयाच्या बाराव्या वर्षी तिला नवी दिल्लीला नेण्यात आले जिथे ती बालमजूर बनून घरकाम करू लागली.[] [] काही महिने घरकाम केल्यानंतर, एकदिवस तिथून ती पळून गेली आणि गावाकडे वापस परतली. परत आल्यावर तिला गावाकडील मुलांची अवस्था भयानक आणि विदारक दिसून आली.[][] इथे लहान मुलांना जबरदस्तीने मजुरी करायला लावली जात होती. काहींना शहरांमध्ये तर काहींना सीमेपलीकडे बांगलादेशात नेण्यात येत होते. [] बालमजुरी व्यतिरिक्त काही लेकरांचे बालविवाह लावण्यात येत होते. सभोवतालची ही परिस्थिती बदलण्याच्या उद्देशाने, ती धागगिया सोशल वेल्फेअर सोसायटी[] आणि सेव्ह द चिल्ड्रन यांच्या सोबत सामाजिक कार्य करू लागली. या संस्थांकडून तिला बाल हक्कांची संकल्पना समजली. सर्वसामान्य लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचण्यासाठी, स्वावलंबी गट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. अल्पावधीतच अनोयाराने १८० तस्करी झालेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियां पर्यंत पुन्हा पोहोचण्यास मदत केली. यातून जवळजवळ तीन डझन बालविवाह थांबवले गेले, ८५ मुलांना बालमजुरीपासून वाचवले गेले आणि ४०० मुलांना शाळेत परत पाठवणे सुरू झाले.[][]

नारी शक्ती पुरस्कार २०१६ च्या विजेत्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनोयारा खातून आणि मेनका गांधी.

२०११ मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिचा सत्कार केला. २०१२ मध्ये, आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या तीन व्यक्तींपैकी एक अनोयारा होती.[] ८ मार्च २०१७ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनी, पश्चिम बंगाल राज्यात बाल तस्करी आणि बालविवाहाविरुद्ध लढण्यात दिलेल्या योगदानाबद्दल, अनोयारा खातून यांना २०१६ सालचा महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[][] २०१५ आणि २०१६ मध्ये मुलांच्या हक्कांच्या समर्थक म्हणून अनोयारा खातून यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f "Anoyara Khatun: The Child Crusader Against Exploitation of Children". Save the Children India (इंग्रजी भाषेत). 7 July 2014. 2020-06-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b Bhattacharya, Ravik (2017-03-10). "'Nari Shakti Puraskar' winner from Bengal waiting for over a year to get a house under Pradhan Mantri Awas Yojana". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 10 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-06-01 रोजी पाहिले.
  3. ^ a b c Singh, G. (2017-06-01). "A child rights crusader". ROTARY NEWS (इंग्रजी भाषेत). 2020-06-01 रोजी पाहिले.
  4. ^ Bhalla, Nita (8 March 2017). "India honors former child maid who saved hundreds of others". Thomson Reuters Foundation. 8 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-06-01 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Indian government confers Child Champion Anoyara Khatun with 'Nari- Shakti Puraskar'". Save the Children India (इंग्रजी भाषेत). 16 March 2017. 21 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-06-01 रोजी पाहिले.
  6. ^ Chatterjee, Chandreyee (11 March 2017). "Girl champ & her fans". Telegraph India (इंग्रजी भाषेत). 2020-06-01 रोजी पाहिले.
  7. ^ "Young Indian displays girl power, fighting against trafficking". UN News (इंग्रजी भाषेत). 2016-10-11. 2020-06-01 रोजी पाहिले.