अनु पुराणी
Appearance
अनु पुराणी - (जन्म - ५ जानेवारी १९२०, सुरत, गुजराथ) नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक, लेखिका आणि ऑरोशिखा उडावी व्हिलेज स्कूलमधील शिक्षिका. अंबुलाल पुराणी यांची ही कन्या. [१]
शिक्षण
[संपादन]दहा वर्षाच्या असताना अनु पुराणी आपल्या आईवडिलांसमवेत श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या. श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर मद्रास येथील कलाक्षेत्र स्कूल ऑफ डान्स येथे नृत्यकलेचे शिक्षण घेतले. भरतनाट्य नृत्यप्रकारचे हे शिक्षण होते. पुढे अल्मोरा येथे श्री.उदय शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यकलेचे प्रगत शिक्षण घेतले.
कार्य
[संपादन]- श्रीअरविंद आश्रमात त्यांनी छात्रावासाच्या प्रमुख या नात्याने जबाबदारी सांभाळली.अनु १९७८ साली उडावी (तमिळ शब्द, अर्थ - मदत) स्कूलमध्ये रुजू झाल्या. [२]आणि १९८३-८४ मध्ये मुख्य अधीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. पुढे त्यांची या शाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. [३]
- अनु बेन पुराणी यांनी श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये नृत्यविभाग प्रमुख पदावर काम केले.[४]
प्रकाशित लेखन
[संपादन]- बच्चों के श्रीअरविन्द - SABDA प्रकाशन, ISBN: 978-81-7060-083-1
- हमारी माँ - SABDA प्रकाशन, ISBN: 978-81-7060-060-2
संदर्भ
[संपादन]- ^ "Interview with Anu Purani by Anie Nunnally". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-26 रोजी पाहिले.
- ^ "Introduction". udavi school (इंग्रजी भाषेत). 2025-02-26 रोजी पाहिले.
- ^ AZ (2021-01-21). "The Golden Path: Anu Purani". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-02-26 रोजी पाहिले.
- ^ "'Anuben' by Jharna Ghosh : article". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-26 रोजी पाहिले.