Jump to content

अनुराधा नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुराधा नाईक
प्रशिक्षणसंस्था गोवा विद्यापीठ
पेशा
प्रसिद्ध कामे खोला मिरची वरील संशोधन
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार


अनुराधा नाईक या गोव्यातील केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) येथे काम करणाऱ्या भारतीय संशोधक आहेत. खोला मिरची लागवडीत आदिवासी महिलांना पाठिंबा देण्याच्या कामाबद्दल त्यांना २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

अनुराधा नाईक गोव्याहून आल्या आहेत आणि त्यांनी गोवा विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागात शिक्षण घेतले आहे. [] []

कारकिर्द

[संपादन]

नाईक यांनी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था (NIO) येथे संशोधक म्हणून काम केले आणि नंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेत (CCARI) काम केले.[][] सीसीएआरआयमध्ये असताना, काबो दे रामा येथे भेट देताना तिला लाल खोला मिरच्या उन्हात सुकवण्यासाठी अंथरलेल्या दिसल्या.[] मिरच्यांना त्यांचे नाव खोलाच्या गावावरून पडले आहे. हे पिक फक्त पावसाळ्यात कानाकोना प्रदेशातील डोंगराळ भागात घेतले जाते.[]

या मिरचीची लागवड करणाऱ्या आदिवासी महिला सुरुवातीला त्यांच्या लागवडीच्या तंत्रांबद्दल नाईकशी चर्चा करण्यास कचरल्या, परंतु नाईक यांनी त्यांना वैज्ञानिक संशोधनाचे मूल्य पटवून दिले.[] त्यांनी महिलांना खोला कानाकोना मिरची कल्टीव्हेटर्स ग्रुप नावाची एक सामुदायिक संघटना स्थापन करण्यास मदत केली. ही संघटना मिरच्यांचे पॅकेजिंग करते आणि बाजारात विकते. [] या गटाला प्लांट जीनोम सेव्हिअर कम्युनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि नाईक यांना २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[][] हा भारतातील फक्त महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून नाईक ह्या पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या गोवा निवासी महिला ठरल्या.[]

जानेवारी २०२० मध्ये, खोला मिरचीला भौगोलिक संकेत दर्जा देण्यात आला आणि त्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने चाचण्या जाहीर करण्यात आल्या. नाईक यांनी सपाट जमिनीवर हे पिक वाढवण्याबद्दल शिफारस केली.[] याशिवाय त्यांनी आपले क्ष इतर स्थानिक पिकांकडे वळवले होते जसे की आगाकाईम आणि तलेइगाओ येथील हर्मल मिरची आणि सेंट एस्टेवाव्ह बेटावरील भेंडी.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "Goan botanist helps tribals conserve, promote Khola chilli, gets nat'l award". The Times of India (इंग्रजी भाषेत). TNN. 13 March 2019. 11 December 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Congratulations" (PDF). unigoa.ac.in. University of Goa. 11 December 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e Pawaskar, Bharati. "The spicy side of Goan heritage". The Goan (इंग्रजी भाषेत). 11 December 2020 रोजी पाहिले.
  4. ^ a b c Sayed, Nida (6 July 2020). "Agri dept to try growing Khola chillies on flat land". The Times of India (इंग्रजी भाषेत). TNN. 11 December 2020 रोजी पाहिले.