अनुराधा चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
अनुराधा अतुल चव्हाण

जिल्हा प्रभारी, भाजपा महिला मोर्चा

जन्म १५ सप्टेंबर १९७२
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
पती अतुल चव्हाण
धर्म हिंदू
संकेतस्थळ www.anuradhachavan.in

सौ. अनुराधा अतुल चव्हाण, या भाजपा महिला आघाडी संभाजीनगरच्या जिल्हा प्रभारी असून संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिनेट सदस्या आहेत.

अनुराधा चव्हाण यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७२ रोजी शेलू येथील सेंदूरसणी ता.आर्णी जि.यवतमाळ येथे झाला. त्या सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील, फुलंब्री तालुक्यातील सक्रिय राजकारणी असून भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा जिल्हा प्रभारी आहेत.

भूषवित असलेली पदे[संपादन]

  • जिल्हा प्रभारी,भाजपा महिला मोर्चा
  • सदस्या जि.प. औरंगाबाद
  • सिनेट सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
  • अध्यक्ष शांती प्रतिष्ठान किनगाव

शैक्षणिक पात्रता[संपादन]

  • बी.ए. इंग्रजी

सामाजिक योगदान आणि कार्य आढावा[संपादन]

फुलंब्री तालुक्यातील किनगाव या गावाला विकसित करण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यांचे पती श्री.अतुल चव्हाण (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ) यांच्यासमवेत त्यांनी गाव विकासासाठी शांती प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली आहे. डिसेंबर २००९ मध्ये लोकसहभागातून पंधरा लक्ष रुपये खर्च करून गावालगतच्या टिटवी नदीवर सिमेंट बंधाऱ्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. या बंधाऱ्याची जल क्षमता तीन कोटी लिटर इतकी आहे. दहा वर्षांनंतरही हा बांध गावाच्या पाण्याच्या मागणीची पूर्तता करीत आहे. लोकसहभागातून केलेल्या या कार्यामुळे ग्रामीण भागात एकजुटीची भावना निर्माण झाली आहे.

रस्ते विकास[संपादन]

ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते हे महत्त्वाची भूमिका बजावतात याच उद्देशाने रस्ते विकासाला प्राधान्य दिले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विठ्ठलवाडी ते किनगाव रस्ता डांबरीकरण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून पूर्णत्वास नेला. पाणंदमुक्त शेतरस्ते किनगाव येथील लालू पाटील पाणंद शेतरस्ता अरुंद आणि पावसाळ्यात वाहतुकीस योग्य करून या रस्त्याची सुधारणा करण्यात आली. किनगावात राबविण्यात आलेली बंदिस्त गटार योजना यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आणि स्वच्छता गावात नांदू लागली. त्यांच्या योगदानातून शिरोली बु येथील दलित वस्ती येथे सुंदर असा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे.

ग्रामसंसदांचे निर्माण[संपादन]

प्रत्येक गावाचा कारभार पाहण्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा ग्रामसंस्थांची उभारणी करण्यात आली. विविध योजनांच्या माध्यमातून २५ लक्ष रु. खर्च करून ग्रामसंसद किनगाव इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, यामुळे गावातील युवकांना रोजगारासाठी १२ व्यापारी गाळे आणि ग्रामस्तरावरील विविध कार्यालयांसाठी एकाच छताखाली जागा उपलब्ध झाली. ग्रामसंसद वारेगाव इमारतीचे बांधकाम देखील पूर्ण करण्यात आले.

महिला सक्षमीकरण[संपादन]

माता-भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात त्यांनी केले आहेत. यात पुढील गोष्टी राबविण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी शिलाई मशीन व ड्रेस मेकिंग प्रशिक्षण, संगणक परीक्षण तसेच ब्युटी पार्लर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यात आले. महिला व बालकल्याण अंतर्गत गणोरी गटातील महिलांना मोफत शिवण क्लास प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्या गेले. डाटा एन्ट्री संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान केलेत, एम.एस.सी.आय.टी.चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वाहेगाव येथील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

रोजगार व स्वयंरोजगार[संपादन]

ग्रामीण भागातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे व भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी फुलंब्री व करमाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून निमंत्रित ४५ कंपन्यांच्या माध्यमातून युवकांना थेट रोजगार मिळवून दिला. पोलीस भरती व आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवक-युवतींना मोफत पोलीस भरती व आर्मी भरती प्रशिक्षण फुलंब्री येथे उपलब्ध करून देण्यात आले.

परंपरा व प्रबोधन[संपादन]

संस्कृतीचा महत्त्व जपण्यासाठी अनेक समाज प्रबोधनात्मक उपक्रम घेतले. त्यामध्ये महिला रांगोळी स्पर्धेचे आयोजन, वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना व तरुणांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून प्रबोधन करण्यात आले मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.

रुग्णसेवा[संपादन]

ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला. वारेगाव येथील सुखदेव थोरात या तरुणाचा अपघातात पाय निकामी झाला होता, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच कुमारी संजना रामनाथ कटिंग हिच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिका व मुख्यमंत्री निधीतून मदत गरीब रुग्णांची मोफत तपासणी मोफत औषध उपचार करून गोर-गरीब जनतेची सेवा केली, मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून श्री.नरसिंग हरसिंग राजपुत ता. फुलंब्री यांना हृदयविकाराच्या उपचारासाठी दोन लक्ष रुपयांची मदत करण्यात आली, श्री.ज्ञानेश्वर मिसाळ तालुका फुलंब्री यांना उपचारासाठी एक लक्ष रुपयांची मदत करण्यात आली, श्री.रोकडे यांच्या मुलांसाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली, या व्यतिरिक्त असंख्य रुग्णांची ससून रुग्णालय पुणे व जे.जे.रुग्णालय मुंबई येथे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

इतर विकास कामे[संपादन]

मंदीर परिसरातील विकास, सार्वजनिक सभागृहे, स्मशानभूमी व दफनभूमी यांच्यासाठी संरक्षक भिंत यासारखी कामे मार्गी लावली, डोंगरगाव शिव येथील महादेव मंदिरासाठी संरक्षण भिंत (5 लक्ष ), वारेगाव येथील बालाजी मंदिर सभागृह (5 लक्ष) दलित वस्ती बांधकाम व दफनभूमी संरक्षक भिंत बांधण्यात आली, बिल्डा कब्रस्थान संरक्षण भिंत (5 लक्ष), शाळाखोल्या व सामाजिक सभागृहे बांधण्यात आली. मुर्शिदाबाद वाडी येथील सहा शाळा खोल्यांचे बांधकाम (रु.16 लक्ष), किनगाव येथील सामाजिक सभागृह बांधकाम रु.25 लक्ष, 2000 आसनक्षमता असलेले सामाजिक सभागृह बांधण्यात आले.

संदर्भ[संपादन]