Jump to content

अनुराधा कृष्णमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Anuradha Krishnamoorthy (it); অনুরাধা কৃষ্ণমূর্তি (bn); Anuradha Krishnamoorthy (fr); Anuradha Krishnamoorthy (da); Anuradha Krishnamoorthy (hr); Anuradha Krishnamoorthy (es); Anuradha Krishnamoorthy (ast); Anuradha Krishnamoorthy (nl); Anuradha Krishnamoorthy (en); अनुराधा कृष्णमूर्ती (mr); ᱟᱱᱩᱨᱟᱫᱷᱟ ᱠᱨᱤᱥᱱᱟᱢᱩᱨᱛᱷᱤ (sat); ਅਨੁਰਾਧਾ ਕ੍ਰਿਸ਼ਣਾਮੂਰਤੀ (pa); অনুৰাধা কৃষ্ণমূৰ্তি (as); Anuradha Krishnamoorthy (de); అనురాధ కృష్ణమూర్తి (te); அனுராதா கிருஷ்ணமூர்த்தி (ta) Indian cheesemaker (en); Indian cheesemaker (en); అనురాధ కృష్ణమూర్తి ఒక భారతీయ సామాజిక పారిశ్రామికవేత్త, చీజ్ మేకర్. (te); Indiaas sociaal ondernemer (nl)
अनुराधा कृष्णमूर्ती 
Indian cheesemaker
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीख20 century
नागरिकत्व
व्यवसाय
  • social entrepreneur
  • cheesemaker
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

अनुराधा कृष्णमूर्ती या एक भारतीय सामाजिक उद्योजिका आणि चीजमेकर आहेत. त्या आणि त्यांची सहकारी नम्रता सुंदरेसन यांना त्यांच्या या कामासाठी भारत सरकारने नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

कारकिर्द

[संपादन]

कृष्णमूर्ती यांनी अपंग लोकांसाठी काम करणारी एक संस्था स्थापन केली. ज्यामुळे त्यांना रोजगाराची संधी सहज उपलब्ध झाली.[] २०१६ मध्ये, कृष्णमूर्ती यांनी शेफ नम्रता सुंदरेसन यांच्यासोबत चेन्नईमध्ये केसे चीज स्टुडिओची स्थापना केली.[] या दोघींची मैत्री सुमारे दहा वर्षांपासूनची होती. त्यांच्या चीजचा पहिला प्रकार क्वार्क नावाचा होता.[] या दोघी पारंपारिक पद्धतीने विविध प्रकारचे नैसर्गिक चीज बनवत असत. यात मुख्यतः स्थानिक घटकांचा वापर केला जात असे. कृष्णमूर्ती यांच्या सामाजिक उद्योजकतेच्या पार्श्वभूमीमुळे त्यांनी अपंग महिलांना रोजगार आणि प्रशिक्षण दिले. २०२० पर्यंत, केसे चीज स्टुडिओ ३० हून अधिक प्रकारच्या चीजचे उत्पादन करत होते.[]

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना अनुराधा कृष्णमूर्ती

कृष्णमूर्ती आणि सुंदरेसन या दोघींनाही त्यांच्या उद्योजकतेसाठी २०१७ चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[] २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने[] तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sharma, Ankit Sharma (10 April 2018). "Meet The Nari Shakti Puruskar Who Are Empowering Disabled Women". The Logical Indian (इंग्रजी भाषेत). 10 February 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b S, Yogitha (6 January 2020). "Cheese with a cause". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Anna (2017-03-15). "The Käse Of Making Cheese In Chennai: An Interview With The Founders Of Käse Cheese". HungryForever Food Blog (इंग्रजी भाषेत). 2021-02-14 रोजी पाहिले.
  4. ^ "A 'cheesy' effort to give women wings". The New Indian Express. 19 March 2018. 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-16 रोजी पाहिले.
  6. ^ Kuttoor, Radhakrishnan (2018-03-07). "Charity 'home maker' gets her due on women's day". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-19 रोजी पाहिले.