Jump to content

अनिता भारद्वाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
অনিতা ভারাদওয়াজ; അനിത ഭരദ്വാജ്; Anita Bharadwa; Anita Bharadwaj; अनिता भारद्वाज; అనితా భరద్వాజ్; ਅਨੀਤਾ ਭਾਰਦਵਾਜ; অনিতা ভৰদ্বাজ; Anita Bharadwaj; ᱚᱱᱤᱛᱟ ᱵᱷᱟᱨᱫᱽᱣᱟᱡᱽ; அனிதா பரத்வாஜ்; Indian high altitude rescue doctor; భారతీయ వైద్యురాలు; Indian high altitude rescue doctor; Indiaas arts; médica india
अनिता भारद्वाज 
Indian high altitude rescue doctor
माध्यमे अपभारण करा
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

अनिता भारद्वाज या एक भारतीय डॉक्टर आहेत. त्या सिक्स सिग्मा हाय अल्टिट्यूड मेडिकल रेस्क्यू सर्व्हिसेसच्या संयुक्त वैद्यकीय संचालिका आहेत. या कामासाठी त्यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे.

जीवन

[संपादन]

भारद्वाज ह्या सिक्स सिग्मा हेल्थकेअर हाय अल्टिट्यूड मेडिकल रेस्क्यू सर्व्हिसेस, इंडिया च्या वैद्यकीय संचालिका आहेत. या सेवेद्वारे त्यांनी मार्च २०१८ पर्यंत, उंचावर असलेल्या ५०,००० हून अधिक लोकांना मदत केली होती आणि २४,००० फूट उंचीवर काम करणाऱ्या ५,००० हून अधिक महिला आणि मुलांचे प्राण वाचवले होते.[]

२०१४ मध्ये त्यांना त्यांच्या या कामासाठी कल्पना चावला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .[] या पुरस्काराचे बक्षीस ५०,००० रुपये होते.[]

२०१७ च्या नारी शक्ती पुरस्काराच्या सादरीकरणात (२०१८ मध्ये) मेनका संजय गांधी मार्गदर्शन करताना.

भारद्वाज ह्या बचावकार्यात करता पर्वतांना भेट देण्यासाठी ओळखले जातात.[] उत्तराखंड पूर, नेपाळ भूकंप आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याच्या ठिकाणी देखील त्यांनी इतर सहकार्यासोबत सेवा दिली होती.[] आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

जुलै २०१९ मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी रुद्रप्रयाग येथे एका पर्वतीय संस्थेला निधी देण्यास सहमती दर्शवली. या निधीमुळे १,२०० नोकऱ्या निर्माण होतील आणि ते सिक्स सिग्मा हाय अल्टिट्यूड मेडिकल रेस्क्यू सर्व्हिसेसद्वारे चालवले जाईल. हे नवीन केंद्र शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच वैद्यकीय सेवा पुरवेल. त्यांनी डॉ. प्रदीप भारद्वाज, सीईओ आणि वैद्यकीय संचालक, डॉ. अरविंद कुमार, डॉ. परवेझ अहमद, भीम बहादूर, देबजीत नायक आणि भारद्वाज यांच्यासह सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

अनिता यांचे लग्न डॉ. प्रदीप भारद्वाज यांच्याशी झाले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. India #StayHome #StaySafe, P. I. B. (2018-03-07). "Meet Dr. Anita Bhardwaj, #NariShakti Puraskar 2017 awardee. She is a medical practitioner who has dedicated her career to ensuring health services in the most difficult situationspic.twitter.com/OkkEkP466M". @PIB_India (इंग्रजी भाषेत). 2020-05-15 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 "Nari Shakti of 30 women to be honoured at Rashtrapati Bhavan". The New Indian Express. 2020-05-15 रोजी पाहिले.
  3. 1 2 Chawla, Kalpana (2016-03-09). "Anita Bhardwaj (34)". Nepal: Hindustan Timers (Jalandhar). 2020-05-15 रोजी पाहिले PressReader द्वारे.
  4. "दूसरी बार झज्जर की 'बहू' को मिलेगा 'नारी शक्ति सम्मान', पहाड़ों में लोगों को दे रहीं 'संजीवनी'". Amar Ujala. ७ मार्च २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-15 रोजी पाहिले.
  5. ANI (2019-07-06). "U'khand CM accepts proposal to establish Six Sigma Institute of Mountain Medicines & High Altitude Rescue". Business Standard India. 2020-05-15 रोजी पाहिले.