अनन्या पांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनन्या पांडे
जन्म अनन्या चंकी पांडे
३० ऑक्टोबर, १९९८ (1998-10-30) (वय: २५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१९ ते आजतागायत
भाषा हिंदी
वडील चंकी पांडे
आई भावना पांडे
धर्म हिंदू

अनन्या पांडे (जन्म:३० ऑक्टोबर १९९८) या हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या भारतीय अभिनेत्री आहेत. त्या हिंदी चित्रपट अभिनेता चंकी पांडे यांच्या कन्या आहेत. त्यांनी २०१९ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर-२' मध्ये काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी 'पती पत्नी और वो' मध्ये त्यांनी एक भूमिका केली. या कामगिरीमुळे त्यांना ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.[१]

प्रारंभिक जीवन[संपादन]

अनन्या तिचे वडील चंकी पांडेसोबत

पांडे यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी[२][३] अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या घरी झाला. पांडे यांना रिसा पांडे नावाची बहीण आहे, तर त्यांचे आजोबा शरद पांडे आणि काका चिक्की पांडे आहेत. त्यांचा चुलत भाऊ मॉडेल अहान पांडे आहे. पांडे यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये २०१७ पर्यंत शिक्षण घेतले.[४] त्यांनी २०१७ मध्ये पॅरिस येथे व्हॅनिटी फेअरच्या 'Le Bal des debutantes' कार्यक्रमात भाग घेतला.[५][६]

अभिनयाची कारकीर्द[संपादन]

पांडेने इ.स. २०१९ मध्ये, आपल्या किशोरवयीन काळात 'स्टुडंट ऑफ द इयर-२' या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया सह-कलाकार होते आणि निर्मिती धर्मा प्रॉडक्शनची होती.[७] Scroll.in साठी लिहिताना, नंदिनी रामनाथ यांनी असे म्हटले की पांडे यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.[८] परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साधारण कामगिरी केली.[९] पांडेने पुढे 'पति पत्नी और वो' (२०१९) मध्ये अभिनय केला, जो १९७८ मधील त्याच नावाच्या एका चित्रपटाचा रिमेक होता. या नवीन चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांनी भूमिका केल्या होत्या. यात पांडे ने एका सेक्रेटरीची भूमिका केली जी एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध ठेवते. मूळ चित्रपटात रंजिता कौरने ही भूमिका साकारली होती.[१०] एनडीटीव्हीच्या सैबल चॅटर्जी यांनी "टपोऱ्या डोळ्यांची मुलगी जिने उत्तम प्रकारे कास्ट केले" असा उल्लेख केला.[११][१२] जागतिक स्तरावर या चित्रपटाने १.१५₹ अब्ज (१५US$ दशलक्ष) पर्यंत कमाई करून चांगले यश मिळवले.[१३][१४] 'स्टुडंट ऑफ द इयर-२' आणि 'पति पत्नी और वो' या दोन्ही चित्रपटातील अभिनयासाठी पांडेला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.[१५]

पांडे यांनी २०२० च्या ऍक्शन फिल्म 'खाली पीली' मध्ये ईशान खट्टर सोबत काम केले.[१६][१७] दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत ती शकुन बत्राच्या रोमँटिक ड्रामा, गेहराईया मध्ये दिसली होती, जो २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता.[१८] पुरी जगन्नाथ यांच्या बहुभाषिक चित्रपट 'लिगर' मध्ये पांडे विजय देवरकोंडासोबत काम करत आहे.[१९][२०]

इतर काम[संपादन]

इ.स. २०१९ मध्ये, पांडे यांनी सोशल मीडिया वरील गुंडगिरीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, नकारात्मकता रोखण्यासाठी आणि सकारात्मक समुदाय तयार करण्यासाठी So Positive नावाचा उपक्रम सुरू केला.[२१] २०१९ च्या 'इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड्स'मध्ये, या प्रकल्पाला 'इनिशिएटिव्ह ऑफ द इयर' असे नाव देण्यात आले.[२२]

मीडिया[संपादन]

पांडे यांना टाइम्स ऑफ इंडियाच्या 'द टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन'मध्ये २०१९ मध्ये ३७व्या क्रमांकावर तर २०२० मध्ये ३१व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले.[२३][२४]

वाद[संपादन]

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर २०२१ रोजी ड्रग्जच्या छाप्यात अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पांडे आणि खान यांचे ड्रग्जबद्दलचे संभाषण जप्त करण्यात आले, त्यानंतर अंमली पदार्थ जप्ती प्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने तिची चौकशी केली.[२५]

अभिनय सूची[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स संदर्भ
२०१९ स्टुडंट ऑफ द इयर - 2 श्रेया रंधवा सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्कार [२६]
पती पत्नी और वो तपस्या सिंग सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्कार [२७]
२०२० खाली पिली पूजा शर्मा [२८]
२०२२ गेहराईया टिया खन्ना [२९]
लिगर हिंदी [३०]
२०२३ रॉकी और राणी की प्रेम कहाणी - पाहुणे कलाकार [३१]
ड्रिमगर्ल २ परी श्रीवास्तव [३२]
खो गए हम कहां प्रतिक्षेत आहना निर्माणाधिन [३३]
कंट्रोल प्रतिक्षेत निर्माणाधिन [३४][३५]
२०२४ शंकरा प्रतिक्षेत - निर्माणाधिन [३६]

वेब सिरीज[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स संदर्भ
२०२१ स्टार वि फूड (सीझन 2) स्वतः भाग ३ [३७]

संगीत व्हिडिओ[संपादन]

वर्ष शीर्षक गायक संगीतकार नोट्स संदर्भ
२०२० "कुडी नू नचने दे" विशाल ददलानी , सचिन-जिगर सचिन-जिगर, तनिष्क बागची 'आंग्रेजी मेडियम' साठीचे प्रमोशनल गाणे [३८]

पुरस्कार आणि नामांकने[संपादन]

वर्ष पुरस्कार श्रेणी नामांकन परिणाम Ref.
२०१९ २६वा स्क्रीन पुरस्कार बेस्ट फिमेल डेब्युट स्टूडेंट ऑफ द इअर २ नामांकन [३९]
फ्रेश फेस ऑफ द इअर -- विजयी [४०]
२०२० ६५वा फिल्म फेर पुरस्कार बेस्ट फिमेल डेब्युट स्टूडेंट ऑफ द इअर २ & पती पत्नी और वो विजयी [१]
२०२० झी सिने अवाॅर्डस बेस्ट फिमेल डेब्युट स्टूडेंट ऑफ द इअर २ विजयी [४१]
बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस पती पत्नी और वो नामांकन
२०२० २१ वा आयफा पुरस्कार स्टार डेब्युट ऑफ द इतर - फिमेल ‌स्टूडेंट ऑफ द इअर २ विजयी [४२]
२०२१ लोकमत स्टायलिश अवाॅर्ड बेस्ट स्टायलिश ग्लॅमरस अवॉर्ड -- विजयी [४३]
२०२२ मोस्ट स्टायलिश जन झी स्टार -- विजयी [४४]
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड बेस्ट डेब्युटंट ॲक्ट्रेस ऑफ द इअर गहराईया विजयी [४५]
२०२४ बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन स्टायलिश ॲक्टर पीपल्स चॉईस (फिमेल) -- विजयी [४६]
पिंकविला स्टाईल आयकॉन अवॉर्ड मोस्ट ग्लॅमरस अवॉर्ड -- विजयी [४७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Presenting the winners of the 65th Amazon Filmfare Awards 2020". Filmfare (इंग्रजी भाषेत). 6 November 2021. Archived from the original on 16 February 2020. 6 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Maru, Vibha (30 October 2020). "Deepika Padukone wishes Baby Girl Ananya Panday a happy birthday. See post". India Today (इंग्रजी भाषेत). Mumbai.
  3. ^ "Ananya Panday: This has been the most special year. I got to live my dream of becoming an actor". India Today. Archived from the original on 5 November 2019. 8 December 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Who is Ananya Panday?'". 11 April 2018. Archived from the original on 30 April 2019. 6 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Must-see! Chunky Panday's gorgeous daughter at Le Bal". Rediff. Archived from the original on 30 April 2019. 1 May 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "Ananya Panday steals the show in a Jean Paul Gaultier gown at le Bal in Paris". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 28 November 2017. Archived from the original on 30 April 2019. 1 May 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Pictures that prove Chunky Panday's daughter Ananya Panday is Bollywood ready". The Times of India. Archived from the original on 10 May 2019. 6 December 2019 रोजी पाहिले.
  8. ^ Ramnath, Nandini (10 May 2019). "'Student of the Year 2' movie review: All games and no fun". Scroll.in. Archived from the original on 10 May 2019. 11 May 2019 रोजी पाहिले.
  9. ^ "Student Of The Year 2 Drops In Week Two". Box Office India. 24 May 2019. Archived from the original on 26 June 2019. 26 May 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Kartik Aaryan opposite Ananya Panday in 'Pati Patni Aur Woh' remake". Daily News and Analysis. Archived from the original on 8 February 2019. 14 January 2019 रोजी पाहिले.
  11. ^ Chatterjee, Saibal (6 December 2019). "Pati Patni Aur Woh Movie Review: Kartik Aaryan, Bhumi Pednekar, Ananya Panday's Film Is Its Own Beast". NDTV. Archived from the original on 8 December 2019. 19 December 2019 रोजी पाहिले.
  12. ^ Kanyal, Jyoti (6 December 2019). "Pati Patni Aur Woh movie review: Kartik Aaryan film is a patchwork for damage done by the original". India Today. 8 September 2020 रोजी पाहिले.
  13. ^ "Bollywood Top Grossers Worldwide: 2019". Bollywood Hungama. 20 December 2019 रोजी पाहिले.
  14. ^ "Pati Patni Aur Woh is a Hit". Box Office India. 14 December 2019. 19 December 2019 रोजी पाहिले.
  15. ^ "Presenting the winners of the 65th Amazon Filmfare Awards 2020". Filmfare (इंग्रजी भाषेत). 6 November 2021. 6 November 2021 रोजी पाहिले.
  16. ^ "Khaali Peeli movie review: Ishaan Khatter, Ananya Panday take you back to Bollywood's mindless masala years". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2 October 2020. 8 May 2021 रोजी पाहिले.
  17. ^ "Ishaan Khatter and Ananya Panday kick-start the shoot for 'Khaali Peeli'". The Times of India. 11 September 2019. 11 September 2019 रोजी पाहिले.
  18. ^ "Shakun Batra's Gehraiyaan starring Deepika Padukone, Siddhant Chaturvedi and Ananya Panday to release on Amazon Prime Video on January 25, 2022". Bollywood Hungama. 20 December 2021. 20 December 2021 रोजी पाहिले.
  19. ^ Raghuvanshi, Aakansha (20 February 2020). "Ananya Panday Is "Happy And Excited" To Join Vijay Deverakonda In His Bollywood Debut". NDTV. 20 February 2020 रोजी पाहिले.
  20. ^ Balach, Logesh (18 January 2021). "Vijay Deverakonda and Ananya Panday film Liger first-look out". India Today (इंग्रजी भाषेत). 22 January 2021 रोजी पाहिले.
  21. ^ "Ananya Panday launches 'So Positive', an initiative against cyberbullying, on World Social Media Day". Firstpost. 30 June 2019. 15 January 2020 रोजी पाहिले.
  22. ^ "Ananya Pandays initiative So Positive wins Initiative of the Year". The Economic Times. 24 December 2019. 15 January 2020 रोजी पाहिले.
  23. ^ "MEET THE TIMES 50 MOST DESIRABLE WOMEN 2019 - Times of India ►". The Times of India (इंग्रजी भाषेत). 7 August 2021 रोजी पाहिले.
  24. ^ "The Times Most Desirable Woman of 2020: Rhea Chakraborty - Living through a trial by fire, gracefully - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 7 August 2021 रोजी पाहिले.
  25. ^ "Ananya Pandey reaches NCB office after summons in cruise drug seizure case". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 21 October 2021. 13 February 2022 रोजी पाहिले.
  26. ^ "Student Of The Year 2 Cast List | Student Of The Year 2 Movie Star Cast | Release Date | Movie Trailer | Review- Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 16 November 2021 रोजी पाहिले.
  27. ^ "Pati Patni Aur Woh movie review: Kartik Aaryan film is a patchwork for damage done by the original". India Today (इंग्रजी भाषेत). 16 November 2021 रोजी पाहिले.
  28. ^ "Khaali Peeli Movie: Ananya Panday, Ishaan Khatter's Film Is A Soggy Affair". NDTV.com. 16 November 2021 रोजी पाहिले.
  29. ^ "Deepika Padukone, Siddhant Chaturvedi and Ananya Panday starrer Gehraiyaan to now release on February 11, 2022". Bollywood Hungama. 5 January 2022. 5 January 2022 रोजी पाहिले.
  30. ^ "Vijay Deverakonda-Ananya Panday's film titled 'Liger', Karan Johar shares 'punching' first look". DNA India. 18 January 2021.
  31. ^ "Fans spot Ananya Panday in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani trailer, call her cameo a part of 'Dharma universe'". Hindustan Times. 4 July 2023. 4 July 2023 रोजी पाहिले.
  32. ^ "Ananya Panday enjoys the beauty of Vishram Ghat on a boat ride as she films for Dream Girl 2 in Mathura; WATCH". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 31 August 2022. 31 August 2022 रोजी पाहिले.
  33. ^ "Ananya Panday, Siddhant Chaturvedi, Adarsh Gourav begin Kho Gaye Hum Kahan shoot, drop fun BTS pics from set". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 23 March 2022. 21 March 2022 रोजी पाहिले.
  34. ^ "Ananya Panday shares heartfelt note after wrapping up Vikramaditya Motwane's cyber thriller". Bollywood Hungama. Archived from the original on 28 February 2023. 28 February 2023 रोजी पाहिले.
  35. ^ "REVEALED: Ananya Panday's cyber thriller is titled Control; Vikramaditya Motwane reveals that "it is a 'computer-generated' movie, flitting between screens"". Bollywood Hungama. 27 April 2023 रोजी पाहिले.
  36. ^ "Akshay Kumar, Ananya Panday spotted shooting for new film 'Shankara' at IIT Roorkee". The Times of India. 26 May 2023. 4 September 2023 रोजी पाहिले.
  37. ^ "Ananya Panday gets 'mean treatment' in kitchen, Chunky Panday is in a complete dad mode: Star Vs Food". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 22 September 2021. 19 November 2021 रोजी पाहिले.
  38. ^ "Angrezi Medium Song Kudi Nu Nachne De: Alia Bhatt, Katrina Kaif And Anushka Sharma Will Set Your Mood For The Week". NDTV. 4 March 2020. Archived from the original on 5 March 2020. 5 March 2020 रोजी पाहिले.
  39. ^ "26th Star Screen Awards | 2019". Disney+ Hotstar (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 16 November 2021. 16 November 2021 रोजी पाहिले.
  40. ^ "Ananya Panday chosen Fresh Face of the Year award at the Star Screen Awards 2019". E24. 9 December 2019 रोजी पाहिले.
  41. ^ "Zee Cine Awards 2020 Winners: Complete list of winners". timesofindia.indiatimes.com. Archived from the original on 16 November 2021. 16 November 2021 रोजी पाहिले.
  42. ^ "IIFA Awards 2020 – Popular Award Winners". IIFA Awards. 25 November 2021. Archived from the original on 26 November 2021. 28 November 2021 रोजी पाहिले.
  43. ^ "Ananya Pandey wins the Best Stylish Glamorous Icon Award at Lokmat Most Stylish Awards 2021". Lokmat. Archived from the original on 30 October 2022. 6 December 2021 रोजी पाहिले.
  44. ^ "Ananya Panday, Rashmika Mandanna and Shraddha Kapoor steal the show in glamorous avatars at Lokmat Awards: All pics". hindustantimes. Archived from the original on 16 October 2022. September 29, 2022 रोजी पाहिले.
  45. ^ "ITA Awards 2022: Varun Dhawan wins 'Actor of the Decade'; The Kashmir Files bags Golden Laurel". The New Indian Express. Archived from the original on 14 December 2022. 2022-12-14 रोजी पाहिले.
  46. ^ "BH Style Icons 2023: Ananya Panday wins the 'Most Stylish Actor People's Choice (Female)' award; says, "It's gratifying"". Bollywood Hungama. 29 March 2023 रोजी पाहिले.
  47. ^ "Pinkvilla Style Icons Edition 2 Winners list: Kiara Advani, Janhvi to Kartik Aaryan, a look at who won what!". Pinkvilla. Archived from the original on 8 April 2023. 8 April 2023 रोजी पाहिले.