अनन्या खरे
Indian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | मार्च १६, इ.स. १९६८ रतलाम | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
अनन्या खरे ही एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे जी देवदास आणि चांदनी बार सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. चांदनी बार या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.[१]
वैयक्तिक जीवन
[संपादन]अनन्या खरे यांचे वडील विष्णू खरे हे एक लेखक होते आणि ते लखनौमध्ये राहत होते. तिचे वडील मूळचे भोपाळचे होते. शालेय जीवनात ती नाटकाशी संबंधित होती. तिचे उच्च शिक्षण दिल्लीत झाले, जिथे तिने नागरी सेवा परीक्षा देखील दिली.[२] निर्मला या टेलिव्हिजन शोमध्ये दिसल्यानंतर, ती जया बच्चन यांना भेटली आणि तिच्या पुढील अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत जाण्यास तिला राजी करण्यात आले.[३]
कारकीर्द
[संपादन]खरेने मोठ्या पडद्यावर यश मिळवण्यापूर्वी जवळजवळ दोन दशके १९८७ च्या निर्मला या मालिकेसह टेलिव्हिजनवर पहिल्यांदा आपली छाप पाडली.[४] तिने हम लोग, देख भाई देख, किरदार, यह शादी नही हो शक्ती, यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
१९९४ आणि १९९७ मध्ये ती झालिम आणि शूल या चित्रपटांमध्ये दिसली. २००१ मध्ये तिने चांदनी बार या मधुर भांडारकर यांच्या चित्रपटात बारबालाचा अभिनय केला होता. तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा भारतीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सोबतच तिला स्क्रीन पुरस्कार आणि झी सिने पुरस्कार मध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले. पुढच्या वर्षी, संजय लीला भन्साळी यांच्या देवदास चित्रपटात तिने देवदासच्या वहिनीची नकारात्मक भूमिकाच्या साकारली. त्यातिल भूमिकेमुळे तिला नंतर अनेक नकारात्मक भूमिका मिळाल्या. रंगमंच, दूरदर्शन आणि मोठ्या पडद्यावरील तिच्या भूमिकांसाठी तिला पुरस्कार मिळाले आहेत.[५]
२००५ मध्ये पती डेव्हिडला भेटल्यानंतर खरे यांनी विश्रांती घेतली आणि अमेरिकेत स्थलांतरित झाली. १० वर्षांनी मुंबईत परतण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ती एका शाळेत इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करत होती.[६]
भारतात आल्यवर तिने अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले जसे पुनर विवाह (२०१२), अमृत मंथन (२०१३), ये है आशिकी (२०१३), रंगरसिया (२०१३-१४).[७]
२०२० मध्ये, अनन्याने अल्ट बालाजीवरील मालिकेतील बेबाकी मध्ये बेनझीर अब्दुल्ला ही भूमिका साकारली.[८][९] २०२१ मध्ये, तिने स्टार भारत वाहिनीवरील लक्ष्मी घर आयी या दूरचित्रवाणी मालिकेत दुष्ट सासूची भूमिका साकारली. एका मुलाखतीत तिने सांगितले की तिने अभिनेत्री बिंदूने साकारलेल्या विविध नकारात्मक भूमिकांपासून प्रेरणा घेतली.[१०]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ananya Khare". 8 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "लखनऊ पहुंची एक्ट्रेस बोलीं, अगर पेपर लीक न होता तो कलाकार नहीं अफसर होती". अमर उजाला. 7 मार्च 2025 रोजी पाहिले.
- ^ "Ananya Khare recounts her life changing meeting with Jaya Bachchan". Times of India. 7 मार्च 2025 रोजी पाहिले.
- ^ "Ananya Khare Reveals Jaya Bachchan Is The Reason She Moved To Mumbai & Got Into Acting". 15 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Today, TV is a brave, new world: Ananya Khare". 29 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "'Not many know that I was a teacher in LA for the last 10 years'". 18 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "After 'Devdas' most roles offered were negative: Ananya Khare". The Indian Express. 9 June 2015.
- ^ "Ananya Khare joins the cast of ALTBalaji's Bebaakee". 6 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "ALTBalaji's Bebaakee Review: The Love Triangle In This Romantic Drama Will Keep You Hooked". 27 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Ananya Khare seeks inspiration from Bindu". tribune india. ७ मार्च २०२५ रोजी पाहिले.