अनंत यशवंत खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अनंत यशवंत खरे
Nanda khare.jpg
जन्म नाव अनंत यशवंत खरे
टोपणनाव नंदा खरे
जन्म इ.स. १९४६
महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभियांत्रिकी, उद्योग, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
वडील यशवंत खरे
स्वाक्षरी अनंत यशवंत खरे ह्यांची स्वाक्षरी

अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे (जन्म : इ.स. १९४६ - हयात) हे मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक आहेत.

पुरस्कार[संपादन]

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. परंतु खरे यांनी कुठलाही पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. नंदा खरे यांच्या सांगण्यानुसार चार वर्षांपूर्वीच त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मग पुरस्कारासाठी त्यांचे नाव अंतिम करताना त्यांची ही भूमिका विचारात का घेण्यात आली नाही, ही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.

खरे यांनी टोकाच्या अस्वस्थेतून वर्तमानाचा वेध घेत ‘उद्या’ या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट उलगडला. त्यामुळे या कादंबरीचे साहित्य विश्वाने स्वागत केले. साहित्य अकादमीलाही या कादंबरीची दखल घ्यावी लागली. परंतु आता नंदा खरे यांनी हा पुरस्कारच नाकारल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. साहित्य अकादमीच्या कार्यपद्धतीनुसार, पुरस्कारासाठीच्या पुस्तकांची निवड किमान दोन ते तीन वर्षांआधीच केली जाते. त्यानंतर ती भाषागणिक त्या त्या परीक्षक मंडळाकडे पाठवली जातात. सर्व परीक्षकांच्या एकमताने पुरस्कार दिल्या जाणाऱ्या पुस्तकाची निवड केली जाते. याचा अर्थ नंदा खरे यांची कादंबरी साहित्य अकादमीने बऱ्याच पूर्वी पुरस्कारासाठी विचारार्थ घेतलेली असेल. मग ही बाब नंदा खरे यांना कळली नाही का? कळली असेल तर त्यांनी स्वत:च त्यांच्या पुरस्कार न स्वीकारण्याच्या भूमिकेबाबत साहित्य अकादमीला आधी का कळवले नाही? याशिवाय नंदा खरे यांच्या सांगण्यानुसार, चार वर्षांपूर्वीच जर त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर मग याबाबत साहित्य अकादमीला किंवा परीक्षक मंडळाला काहीच कसे माहीत नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

साहित्य अकादमी आधीच पुस्तकांची निवड करून ती परीक्षकांकडे पाठवत असते. परीक्षक ती पुस्तके वाचून आपला अभिप्राय देतात. सर्व परीक्षकांचा अभिप्राय लक्षात घेऊन एकमताने कुठल्या तरी एका पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. नंदा खरे यांच्या पुरस्कार न स्वीकारण्याच्या निणर्याबाबत मी पहिल्यांदाच ऐकत आहे. आधी याबाबत कुठलीच माहिती नव्हती, असे साहित्य अकादमीचे परीक्षक डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी म्हटले आहे.

कारकीर्द[संपादन]

नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

साहित्यकृतीचे नाव प्रकाशन वर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशन
अंताजीची बखर[१] १९९७ कादंबरी ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
इंडिका : (भारतीय उपखंडाचा नैसर्गिक इतिहास) ऐतिहासिक अनुवादित, मूळ लेखक - प्रणय लाल मधुश्री प्रकाशन
उद्या २०१५ कादंबरी मनोविकास प्रकाशन, पुणे
ऐवजी २०१८ आत्मचरित्र मनोविकास प्रकाशन, पुणे
कहाणी मानवप्राण्याची[२] २०१० विज्ञान मनोविकास प्रकाशन, पुणे
कापूसकोड्याची गोष्ट २०१८ अनुवादित शेतीविषयक, मूळ लेखक डाॅ' लक्ष्मण सत्या मनोविकास प्रकाशन, पुणे
जीवोत्पत्ती... आणि नंतर १९९९ विज्ञान ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य सहलेखक - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ विज्ञान मनोविकास प्रकाशन
दगडावर दगड विटेवर वीट[३] २००२ आत्मचरित्र ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
नांगरल्याविण भुई[४] २००५ कादंबरी ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
बखर अंतकाळाची[५] २०१० कादंबरी मनोविकास प्रकाशन, पुणे
वाचताना पाहताना जगताना २०१४ ललित लोकवाङ्मय गृह, मुंबई
वारूळपुराण २०१४ भाषांतर मनोविकास प्रकाशन, पुणे
वीसशे पन्नास[६] १९९३ कादंबरी ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
संप्रति[७] १९९८ कादंबरी ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
ज्ञाताच्या कुंपणावरून[८] १९९० विज्ञानविषयक ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

संदर्भ[संपादन]

  1. ^ खरे, नंदा. अंताजीची बखर.
  2. ^ खरे, नंदा. कहाणी मानवप्राण्याची.
  3. ^ खरे, नंदा. दगडावर दगड विटेवर वीट.
  4. ^ खरे, नंदा. नांगरल्याविण भुई.
  5. ^ खरे, नंदा. बखर अंतकाळाची.
  6. ^ खरे, नंदा. वीसशे पन्नास.
  7. ^ खरे, नंदा. संप्रति.
  8. ^ खरे, नंदा. ज्ञाताच्या कुंपणावरून.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.