अदिति अशोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Aditi Ashok.jpg

अदिती अशोक (२९ मार्च, १९९८ -) ही भारतीय गोल्फ खेळाडू आहे. तिने २०१६च्या उन्हाळी ऑलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती सर्वात लहान खेळाडू होती. या स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्यात ती पहिल्या १० मध्ये होती. दुसऱ्या टप्प्यात ती एकदा पहिल्या स्थानावर होती. पण तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात तिने चांगली कामगिरी केली नाही आणि २९१ गुणांसह ४१ व्या स्थानावर पोहोचली.

कामगिरी[संपादन]

२०११:- उन्हाळी कर्नाटक ज्युनिअर, दक्षिण इंडिया ज्युनियर, फाल्डो मालिका आशिया - भारत, ईस्ट इंडिया टॉली लेडीज, ऑल इंडिया चॅम्पियनशिप २०१२:- यूएचएचए दिल्ली लेडीज, यूएसएचए आर्मी चॅम्पियनशिप, ऑल इंडिया ज्युनियर २०१३:- आशिया पॅसिफिक ज्युनियर चॅम्पियनशिप २०१३:- ईस्टर्न इंडिया लेडीज ॲमेच्यूर, यूएसएचए इगू ऑल इंडिया लेडीज ॲंड गर्ल्स चॅम्पियनशिप २०१४:- सेना लेडीज आणि कनिष्ठ चॅम्पियनशिप, सेंट रुल ट्रॉफी, साउथर्न इंडिया लेडीज आणि ज्युनियर गर्ल्स चॅम्पियनशिप, महिलांमध्ये ब्रिटीश ओपन एएमयू स्ट्रोक प्ले चॅम्पियनशिप, थायलंड एमेच्योर ओपन