अदलाबदल स्थानक
Appearance
अदलाबदल स्थानक किंवा इंटरचेंज स्थानक हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एकापेक्षा जास्त रेल्वे मार्गांसाठी असलेले रेल्वे स्थानक असते जिथे बहुतेकदा स्थानकातून बाहेर न पडता किंवा अतिरिक्त भाडे न भरता, प्रवाशांना एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर सोयीस्कर बदल करता येतो.
हा अदलाबदल एकाच वाहतूक माध्यमात, किंवा वेगवेगळ्या रेल्वे माध्यमांमध्ये किंवा बसमध्ये होऊ शकते. अशा स्थानकांवर सदारांपणे एकाच मार्गाच्या स्थानकांपेक्षा जास्त फलाट असतात. ही स्थानके व्यावसायिक केंद्रांमध्ये किंवा शहराच्या बाहेरील भागात निवासी भागात असू शकतात. शहरे सामान्यतः विकासासाठी अदलाबदल स्थानकाभोवती जमिनीचा वापर करण्याची योजना आखतात. [१] जर प्रवाशांनीस्थानकाची सशुल्क क्षेत्र सोडले तर त्यांना अदलाबदल करायला अतिरिक्त भाडे द्यावे लागू शकते.
संदर्भ
[संपादन]- ^ Ng, Charles W. W.; Huang, H. W.; Liu, G. B. (2008-12-03). Geotechnical Aspects of Underground Construction in Soft Ground: Proceedings of the 6th International Symposium (IS-Shanghai 2008) (इंग्रजी भाषेत). CRC Press. p. 270. ISBN 9780203879986.