अतिशा नाईक
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अतिशा नाईक | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
अतिशा नाईक ही एक भारतीय अभिनेत्री आहे. जेव्हा त्या ८ वर्षांची होती तेव्हापासून तिने बाल कलाकार म्हणून 'गुड बाय डॉक्टर' या मराठी नाटकातून पदार्पण केले होते. महेश मांजरेकर यांच्या 'प्राण जाए पर वचन ना जाये' या हिंदी चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अलीकडेच, तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'देऊळ' चित्रपटात एका महिलेची, सरपंचाची महत्त्वाची भूमिका साकारली होती.[ संदर्भ हवा ]
तिने आभाळमाया, मधु इथे अन् चंद्र तिथे, दिल्या घरी तू सुखी राहा, 'घडलंय बिघडलंय', 'फू बाई फू' (झी मराठी), सुंदरा मनामध्ये भरली, ह्या गोजिरवाण्या घरात, घाडगे अँड सून' (कलर्स मराठी), 'बन मस्का' (झी युवा), 'मानसीचा चित्रकार तो', पुढचं पाऊल, 'स्वप्नांच्या पलिकडले' (स्टार प्रवाह), इ. यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
तिने 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'एक पॅकेट उमेद' इत्यादी हिंदी मालिकांमध्ये देखील दिसली आहे.
'मंथन: एक अमृत प्याला', 'बंदुक्या', 'सलाम' आणि देऊळ या मराठी चित्रपटातील तिचा अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही कौतुक केले. तिने 'लफंगे परिंदे' आणि 'वेक अप सिड' सारख्या हिंदी फीचर फिल्म्समध्येही काम केले आहे.