Jump to content

अतिमानव (पुस्तिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतिमानव ही पुस्तिका म्हणजे श्रीअरविंद लिखित अतिमानव या संकल्पनेशी संबंधित दोन इंग्रजी लेखांचे मराठी भाषांतर आहे.[] हे छोटेखानी पुस्तक श्रीअरविंद तत्त्वज्ञानातील अतिमानव या एका महत्त्वाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकते.

पुस्तकाची मांडणी

[संपादन]

या पुस्तकामध्ये श्रीअरविंद लिखित सुपरमॅन आणि डिव्हाईन सुपरमॅन या दोन लेखांचे भाषांतर समाविष्ट करण्यात आलेले आहे.

अतिमानव
लेखक श्रीअरविंद
अनुवादक सेनापती पां.म.बापट
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार वैचारिक ग्रंथ
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम प्रेस
प्रथमावृत्ती १९६४
मालिका श्रीअरविंद-विचार-दर्शन-माला, पुष्प १२
विषय श्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान
पृष्ठसंख्या ४०
  • यातील सुपरमॅन[] हा लेख आर्य या नियतकालिकात प्रथमत: १५ एप्रिल १९१५ रोजी प्रकाशित झाला होता.
  • डिव्हाईन सुपरमॅन[] या लेखाचे मराठी भाषांतर दिव्य-अतिमानव या शीर्षकाखाली करण्यात आले आहे.

पुस्तकाचा आशय

[संपादन]

यातील पहिल्या लेखात श्रीअरविंद यांनी नित्शे या तत्त्वज्ञाने मांडलेल्या अतिमानव या संकल्पनेचा परामर्श घेतलेला आहे. त्याने मांडलेला अतिमानव आणि श्रीअरविंद यांच्या दृष्टीस दिसलेला अतिमानव यांतील भेद या मध्ये उलगडवून दाखविण्यात आला आहे. 'अतिमानव म्हणजे मानवातील सारभूत गोष्टींचे सुसंवादमय देवसदृश दिव्य पूर्णरूप होय,' असे श्रीअरविंद येथे म्हणतात[] आणि अतिमानव ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करतात.

दिव्य-अतिमानव या लेखामध्ये श्रीअरविंद यांनी मानवाचे उद्दिष्ट काय असले पाहिजे, ते स्पष्ट केले आहे.[]

मूळ इंग्रजी लेख

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Sri Aurobindo (1971). The Supramental Manifestation and other writings. SABCL - Sri Aurobindo Birth Centenary Library. 16. Pondicherry: Sri Aurobindo Ashram. pp. 275–281.
  2. ^ a b Sri Aurobindo (1971). The Hour of God and other writings. SABCL - Sri Aurobindo Birth Centenary Library. 17. Pondicherry: Sri Aurobindo Ashram. pp. 74–78.
  3. ^ अतिमानव, ले.श्रीअरविंद, अनुवाद - सेनापती बापट, १९६४