अटॅलस, मॅसेडोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अटॅलस हा अलेक्झांडर द ग्रेट याचे वडिल फिलिप दुसरा याची मॅसेडोनियाची पत्नी क्लिओपात्राचा काका होता. फिलिप आणि क्लिओपात्रा यांची संततीच मॅसेडोनिया राज्याची खरी उत्तराधिकारी असावी असे याने जाहीर उद्गार काढल्याने अलेक्झांडरचा रोष ओढवून घेतला.

पुढे सत्ता ग्रहण केल्यावर अलेक्झांडरने अटॅलसची हत्या घडवून आणून आपल्या मार्गातील काटा दूर केला.