अजित वाच्छानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजित वाच्छानी (१९५१ - २५ ऑगस्ट २००३) हे एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते होते. मिस्टर इंडिया (1987) ("तेजा" म्हणून), मैने प्यार किया (1989), कभी हा कभी ना (1993), हम आपके है कौन, (1994) तसेच हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले होते. (1994) आणि हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ हैं' हे त्याचे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि कमाई करणारे चित्रपट आहेत. त्यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट 'एक पेक्षा एक' याशिवाय तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 'हसरते', 'दाने अनार के' आणि 'एक महाल हो सपनो का' आदी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांत देखील काम केले होते.[१][२]

वैयक्तिक जीवन[संपादन]

राकेश चौधरी निर्मित संवाद व्हिडिओच्या 'बनते बिगडते' (१९८५) मधून अजितने आपल्या दूरचित्रवाणी वरील अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली आणि लवकरच ते टेलिव्हिजनवर एक लोकप्रिय अभिनेते बनले. त्यानंतर लवकरच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. वाच्छानी यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, एक मराठी चित्रपट आणि तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ते गुजराती आणि मराठी नाटकांमध्ये ते नियमित काम करत होते.

२५ ऑगस्ट २००३ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले आणि त्यांच्या पश्चात पत्नी मराठी अभिनेत्री चारुशीला साबळे आणि दोन मुली असा परिवार आहे.[३]

अभिनयाची सूची[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका नोंद
२००३ राजा भैया प्रेम साहनी
२००२ आँखें
२००१ जोडी नंबर वन
२००० हर दिल जो प्यार करेगा
१९९९ हु तू तू
१९९९ बीवी नं॰ १
१९९९ सिर्फ तुम
१९९९ हम साथ साथ हैं मामाजी (वकील)
१९९८ फूल बने पत्थर
१९९८ धूँढते रह जाओगे
१९९७ आर या पार
१९९७ नसीब दीनदयाल
१९९७ उफ़ ! ये मोहब्बत
१९९७ मृत्युदंड
१९९६ दुनिया झुकती है
१९९५ अहंकार
१९९५ टक्कर
१९९४ हम आपके हैं कौन मामाजी (प्रोफेसर)
१९९४ बेटा हो तो ऐसा इंस्पेक्टर राम सिंह
१९९४ इंसानियत
१९९४ छोटी बहू आदर्श
१९९३ गीतांजली
१९९३ लुटेरे
१९९३ कन्या दान अमृत सिन्हा
१९९३ रूप की रानी चोरों का राजा
१९९३ दिल की बाज़ी वकील वाच्छानी
१९९२ इंसानियत के देवता रंजीत
१९९२ सूर्यवंशी
१९९२ अनाम इंस्पेक्टर के.के दीवान
१९९२ राजू बन गया जेंटलमन मल्होत्रा
१९९२ दीदार मेजर विवेक शर्मा
१९९२ महबूब मेरे महबूब
१९९१ भाभी
१९९१ १०० डेज
१९९० तुम मेरे हो
१९९० लेकिन
१९९० पुलिस पब्लिक
१९९० अव्वल नम्बर पुलिस इंस्पेक्टर
१९८९ मैंने प्यार किया विक्रम
१९८९ शिवा
१९८९ मैं आज़ाद हूँ
१९८७ ये वो मंज़िल तो नहीं पुलिस सुपरिटेन्डेन्ट
१९८७ मिस्टर इण्डिया तेजा
१९८५ खामोश

दूरचित्रवाणी[संपादन]

वर्ष मालिका भूमिका चॅनल
१९८७ चुनौती डीडी नॅशनल
१९८७ मुजरिम हाजीर
१९८७ मिट्टी के रंग
१९९४ दाणे अनार के
१९९४ जुनून केकेचे वडील
१९९६ आम्ही हिंदुस्थानी अडवाणी साहेब
१९९० हसरतें गोविंद सहाय झी टीव्ही
१९९७ जंजिरें
१९९८ गुदगुदी मोहन शुक्ला
१९९९ एक महल हो सपना का पुरुषोत्तम नानावटी सोनी टीव्ही
२००० बाबुल की दुवाए लेती जा गोविंद झी टिव्ही

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Actor dies". The Telegraph. 26 August 2003.
  2. ^ "I will be your father figure". Indian Express. 1 December 1998.
  3. ^ "Actor Ajit Vachhani dead". Rediff Movies. 25 August 2003.