Jump to content

अघोष कण्ठ्य ऊष्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अघोष कण्ठ्य ऊष्मन् हा काही बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जाणारा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे. मराठीत हे ध्वनी नाही आहे, परंतु हिंदीमधले काही शब्दांमध्ये असतो, विशेषतः फारशी भाषापासून प्रदत्त शब्दांमध्ये, उदा. ख़ुशी 'आनंद'.

आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेमध्ये या ध्वनीचे चिन्ह [x] आहे.

काही भाषांमध्ये अघोष पश्चकण्ठ्य ऊष्मन् असतो, ज्याचे लिप्यंतरण [x̠] असे केले जाते.

वैशिष्ट्ये

[संपादन]
अघोष कण्ठ्य ऊष्मनाचा अग्रपश्च छेद

अघोष कण्ठ्य ऊष्मनाची वैशिष्ट्ये:

  • याची उच्चारण पद्धत ऊष्मानिक आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवेचा प्रवाह थोडेसे आंकुचन पावून छोटेसे वाहिनी तयार करून याचे उच्चारण होते.
  • याचे उच्चारस्थान कण्ठ्य आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे मृदू टाळूवर जिभेच्या मागील भागाच्या साहाय्याने उच्चारले जाते.
  • याची ध्वनी निर्मिती अघोष आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे स्वरतंतूंच्या कंपनांशिवाय निर्माण केले जाते. काही भाषांमध्ये स्वरतंतू जाणीवपूर्वक वेगळे ठेवले जातात, ज्यामुळे ते नेहमी अघोष राहते; तर इतर भाषांमध्ये ते सैल असतात, ज्यामुळे शेजारील ध्वनींमुळे ते सघोष होऊ शकते.
  • हे एक मौखिक व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवा नाकातून बाहेर पडू दिली जात नाही.
  • हे एक मध्य व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवेचा प्रवाह जिभेच्या बाजूने न जाता, जिभेच्या मध्यभागावरून पुढे निर्देशित करून निर्माण केला जातो.
  • याची वायुप्रवाह प्रणाली फुफ्फुसीय आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, बहुतेक ध्वनींप्रमाणेच, केवळ बरगड्यांमधील स्नायू आणि पोटाच्या स्नायूंच्या साहाय्याने हवा बाहेर ढकलून याचे उच्चारण केले जाते.

कोणत्या भाषेत असते?

[संपादन]

जर्मेनिक भाषांची पूर्वज असलेल्या आद्य-जर्मेनिकमध्ये, आद्य-हिंद-युरोपी अघोष तालव्य आणि कण्ठ्य स्पर्श आणि ओष्ठ्यीकृत अघोष कण्ठ्य स्पर्श यांचे प्रतिरूप म्हणून एक अघोष कण्ठ्य ऊष्मन् आणि त्याचे ओष्ठ्यीकृत रूप अस्तित्वात आले, असे मानले जाते. अशाप्रकारे आद्य-हिंद-युरोपी r̥nom "शिंग" आणि ód "काय" हे आद्य-जर्मेनिक * hurnan आणि * hwat बनले, जिथे *h आणि *hw हे बहुधा [x] होते आणि [ xʷ ]. हा ध्वनी बदल ग्रिमच्या नियमाचा भाग आहे.

आधुनिक ग्रीकमध्ये, एक अघोष कण्ठ्य ऊष्मन् प्राचीन ग्रीक अघोष महाप्राण स्पर्श /kʰ/ (जसे मराठीचे ख) पासून उगम पावले आहे. एका ध्वनी बदलामध्ये ज्याने सर्व ग्रीक महाप्राण स्पर्श व्यंजनांना मृदू करून ऊष्मनांमध्ये रूपांतरित केले.

भाषा शब्द आयपीए अर्थ नोंदी
अबजी хьзы / ख्झ [xʲzə] 'नाव'
आदगब्जी хы / ख [xəː]ⓘ 'सहा'
आफ्रिकान्स groot / ख्रुअत [xrʊət] 'मोठे' अधिक वेळा [χ ~ ʀ̥] असे उच्चारतात.
आल्बेनी gjuha / जुखा [ɟuxɑ] 'भाषा' /h/ चे उपध्वनी.
अल्यूट अतखाखी बोली alax / आलाख [ɑlɑx] 'दोन'
अरबी आधुनिक प्रामाणिक خ‍‍ض‍راء / खाद्रा [xɑdˤˈrɑːʔ] 'हिरवे' (स्त्रीलिंग) बोलीभाषा आधारित, कण्ठ्य, पश्चकण्ठ्य, किंवा अलिजिह्वीय असू शकते.[]
आसामी মীয়া / असमीया(ऑखॉमिया) [ɔxɔmia] 'आसामी'
सुरिथी ܚܡܫܐ / खेम्शा [xεmʃa] 'पाच'
आवारी чeхь / चेख [tʃex] 'पोट'
अझरबैजानी x / хош / ﻮش / खोश [xoʃ] 'आनंददायी'
बास्क काही भाषिक[] jan / खान [xän] 'खाणे' कण्ठ्य किंवा पश्चकण्ठ्य.[] दुसऱ्या भाषिकांसाठी [j ~ ʝ ~ ɟ] असते.[]
सिक्सिकी[] ᖻᖳᐦᓱᖽᐧ / नाआख्सिक्सी [naːáxsik͡si̥] 'माझे आजी-आजोबा' शब्दांच्या सुरुवातीला कधी /x/ त्याचे उपध्वनी /h/ होते, उदा. "hánnia!" 'खरंच!'. ते त्याचे उपध्वनी /ç/ i/ii जसे ihkitsika 'सात' च्या नंतरही बनू शकते.
ब्राहुई[] ‍ﻦ / खान [xan] 'डोळा'
ब्रेतॉन hor c'hi / होर खी [hor xiː] 'आमचा कुत्रा'
बुल्गेरी тихо / तीखो [ˈt̪ixo]ⓘ 'शांतपणे'
बंगाली খ়ারিজ / खारिज [xɐɹidʒ] 'रद्द' फक्त प्रदत्त शब्दांमध्ये.
कातालानी kharja / खार्ज [ˈxɑɾ(d)ʑə] 'खार्जा' केवलप्रयोगी अव्यय आणि प्रदत्त शब्दांमध्ये आढळते.
चेचन хан / खान [xɑːn] 'वेळ'
चिनी मॅंडरिन / ख [xɤ˧˥] 'नदी'
चेक Čech / चेख [t͡ʃɛx]ⓘ 'चेक (व्यक्ति)'
डॅनिश दक्षिण युटलांडी kage / खाख [ˈkʰaːx] 'केक'
डच प्रामाणिक व्लाम्स[][] loochen / लोखन [ˈloː.xən]ⓘ 'नाकार(णे)'
दक्षिण डच बोली[][]
इंग्रजी स्कॉटिश loch / लॉख [ɫɔx] 'लोख'
आयरिश lough / लाख [lɑx] 'लोख'
स्काउस[] book / बुख [bʉːx] 'पुस्तक'
एस्पेरांतो monaĥo / मोनाखो [moˈnaxo] 'साधू'
एस्तोनी jah / याख [jɑx] 'हो' /h/ चे उपध्वनी.
फिनी kahvi / कख्वी [ˈkɑxʋi] 'कॉफी' /h/ चे उपध्वनी.
फ्रांसी jota / कोता [xɔta] 'खोता' फक्त प्रदत्त शब्दांमध्ये.
जॉर्जियन[] ჯო / जॉखी [ˈdʒɔxi] 'काठी'
जर्मन Buch / बूख [buːx]ⓘ 'पुस्तक'
ग्रीक τέχνη / तेख्नी [ˈte̞xni] 'कला'
हिब्रू बायबली מִיכָאֵל / मीखाएल [mixaˈʔel] 'मायकल'
सेफारदी
हिंदुस्तानी हिंदी ख़ुशी [xʊʃiː] 'आनंद' फक्त प्रदत्त शब्दांमध्ये. हिंदीत /kʰ/ सोबत प्रतिस्थापित होऊ शकते. मागे सरकलेले असू शकते.
उर्दू ‍وشی / खु़शी
हंगेरियन sahhal / शाखाल [ʃɒxːɒl] 'शाहासोबत'
इस्लेन्स्का október / ऑख्तोउपेर [ˈɔxtoːupɛr̥] 'ऑक्टोबर'
भाषा इंदोनेसी khas / खास [xas] 'नमुनेदार' अरबीपासून प्रदत्त शब्दांमध्येच. अधिक वेळा [h] किंवा [k] असे उच्चारले जाते.
आयरिश deoch / दॉख [dʲɔ̝̈x] 'पिणे'
जपानी マッハ / माखा [maxːa] 'माख' /h/ चे उपध्वनी.[१०]
कबरदेब्जी хы / ख [xəː]ⓘ 'समुद्र'
कझाक ханзада / खांजादा [xanzada] 'राजकुमार'
हांगुली 흥정 / खङ्जङ [xɯŋd͡ʑʌ̹ŋ] 'सौदेबाजी' /ɯ/ च्या आधी /h/ चे उपध्वनी.
कुर्दी xanî / खानी [xɑːˈniː] 'घर'
कुडुख[] कुँड़ुख़ [kũɽux] 'कुडुख'
लिंबुर्खी[११][१२] loch / लॉख [lɔx] 'हवा'
लिथुएनी choras / खॉरस [ˈxɔrɐs̪] 'गायक'
मासेदोनी Охрид / ऑख्रित [ˈɔxrit]ⓘ 'ऑख्रित'
मलाय ا‍ير / आखिर [axir] 'शेवटचे', 'अंत'
khidmat / खिद्मा [xid̪maʔ] 'सेवा' /kʰ/ चे उपध्वनी.
मांक्स aashagh / एजाख [ˈɛːʒax] 'सोप्पे'
हुलुनीख्सुवाकान naxk / नख्क [nəxk] 'हात'
नेपाळी आँखा [ä̃xä] 'डोळा' /kʰ/ चे उपध्वनी.
नॉर्वेजियन Urban East[१३] hat / खात [xɑːt] 'द्वेष'
पश्तो اخ‍‍ته / अख्ता [ax.t̪a] 'व्यापलेले'
फारशी دُخ‍‍تَر / दोख्तॅर [doxˈtær] 'मुलगी'
पोलिश[१४] chleb / ख्लेप [xlɛp] 'ब्रेड'
पोर्तुगी Fluminense arte / आख्ची [ˈaxtɕi] 'कला'
General Brazilian[१५] rosa / खॉज [ˈxɔzɐ] 'गुलाब' काही बोलीभाषा. /ʁ/ चे उपध्वनी.
पंजाबी Gurmukhi ਖ਼ਬਰ / ख़बर [xəbəɾ] 'बातम्या'
Shahmukhi خ‍‍بر / ख़बर
रोमानी hram / ख़्राम [xräm] 'चर्चचा संरक्षक सण' /h/ चे उपध्वनी.
रूसी[१६] хороший / ख र्वोषिय [xɐˈr̠ʷo̞ʂɨ̞j]ⓘ 'चांगले'
स्कॉटिश गेलिक drochaid / त्रॉखित [ˈt̪ɾɔxɪtʲ] 'पूल'
सर्बो-क्रोएशियन храст / ख्रास्त [xrâːst] 'ओकचे झाड'
स्लोव्हाक chlap / ख्लाप [xɫäp] 'यार'
स्लोव्हेन प्रामाणिक pohlep / पोख्लेप [poˈxlɛ̂p] 'स्वार्थ' किंवा 'लोभ'
काही बोली bog / बोख [ˈbôːx] 'देव'
सोमाली khad / खाद [xad] 'शाई'
स्पॅनिश[१७] लॅटिन अमेरिकी[१८] ojo / ओखो [ˈo̞xo̞] 'डोळा'
दक्षिण स्पेन[१८]
स्वीडिश दक्षिण बोलीभाषा sjö / खो [xøː] 'तळ'
सिलहटी ꠛꠞ / खबर [xɔ́bɔɾ] 'बातम्या'
ताश्लीती ixf / इख्फ [ixf] 'डोके'
तगालोग bakit / बाखीत [baxit] 'कशाला'
तमिळ ब्राह्मणी तमिळ, लंकी तमिळ (अप्रामाणिक) கை / पकै [pɐxɛ(i̯)] 'द्वेष' मध्यस्वरी एकवचन /k/ ब्राह्मणी आणि लंकी बोलीभाषा सोडून जास्तीतर बोलीभाषेत काकलीकृत झाले आहे. सर्व धरून [kʰ x ɡ ɣ ɣʰ h] हे सगळे असू शकते.[१९]
तोडा[] pax / पाख [pax] 'धूर'
तुर्की[२०] ıhlamur / इख्लामुर [ɯxlämuɾ] 'धामण' /h/ चे उपध्वनी.[२०]
तुर्कमेनी hile / खीले [xiːle] 'धूर्तता'
त्यापी kham / खाम [xam] १. 'दुधी (भोपळा)'; २.

'वेश्या'

कौसा rhoxisa / खॉकिसा [xɔkǁiːsa] 'रद्द करणे'
उक्रेनी хлопець / ख्लॉपेत्स [ˈxɫɔ̝pɛt͡sʲ]ⓘ 'मुलगा'
उझबेक[२१] oxirgi / ऑखिर्गी [ɒxirgi] 'शेवटी' पश्चकण्ठ्य.
व्हियेतनामी[२२] không / खवङ्म [xəwŋ͡m˧] 'नाही', 'शून्य'
यी / ख [xɤ˧] 'चांगले'
झापोटेक तिल्कीयापान[२३] mejor / मेखोर [mɘxoɾ] 'बरे' स्पॅनिशपासून प्रदत्त शब्दांमध्ये.

नोंदी

[संपादन]
  1. Watson (2002).
  2. 1 2 3 Hualde & Ortiz de Urbina (2003).
  3. "Blackfoot Pronunciation and Spelling Guide". Native-Languages.org. 2007-04-10 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 Bhadriraju Krishnamurti (2003).
  5. Verhoeven (2005)
  6. 1 2 Collins & Mees (2003)
  7. Gussenhoven (1999)
  8. Wells (1982)
  9. Shosted & Chikovani (2006).
  10. Okada, Hideo (December 1991). "Japanese". Journal of the International Phonetic Association. 21 (2): 94–96. doi:10.1017/S002510030000445X. 14 July 2022 रोजी पाहिले.
  11. Gussenhoven & Aarts (1999)
  12. Peters (2006)
  13. Vanvik (1979).
  14. Jassem (2003).
  15. Barbosa & Albano (2004).
  16. Padgett (2003).
  17. Martínez-Celdrán, Fernández-Planas & Carrera-Sabaté (2003).
  18. 1 2 Chen (2007).
  19. Zvelebil, Kamil (1965). Some features of Ceylon Tamil. Indo-Iranian Journal. 9. JSTOR. pp. 113–138. JSTOR 24650188.
  20. 1 2 Göksel & Kerslake (2005)
  21. Sjoberg (1963).
  22. Thompson (1959).
  23. Merrill (2008).

संदर्भ

[संपादन]