अघोष कण्ठ्य अनुनासिक
Appearance
अघोष कण्ठ्य अनुनासिक हा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे, जो काही बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जातो. आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेमध्ये (आयपीए) या ध्वनीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह [ŋ̊] आहे, जे घोष कंठ्य अनुनासिक अक्षर आणि अघोषता दर्शवणाऱ्या चिन्हाचे संयोजन आहे. (वाचनीयतेच्या कारणास्तव, साधे [ŋ̥] अशा चिन्हाऐवजी, सामान्यतः गोल अक्षराच्या वर ठेवले जाते.)
वैशिष्ट्ये
[संपादन]
अघोष कण्ठ्य अनुनासिची वैशिष्ट्ये:
- याची उच्चारण पद्धत अवरोधक आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे स्वरयंत्रात हवेचा प्रवाह रोखून निर्माण केले जाते. हा व्यंजन अनुनासिक देखील असल्याने, रोखलेला हवेचा प्रवाह नाकावाटे वळवला जातो.
- याचे उच्चारस्थान कण्ठ्य आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे मऊ टाळूवर जिभेच्या मागील भागाच्या साहाय्याने उच्चारले जाते.
- याची ध्वनी निर्मिती अघोष आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे स्वरतंतूंच्या कंपनांशिवाय निर्माण केले जाते.
- हे एक अनुनासिक व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की अनुनासिक स्पर्श ध्वनींसाठी हवा केवळ नाकातून बाहेर पडू दिली जाते; अन्यथा, नाकासोबतच तोंडातूनही बाहेर पडते.
- हे एक मध्य व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवेचा प्रवाह जिभेच्या बाजूने न जाता, जिभेच्या मध्यभागावरून पुढे निर्देशित करून निर्माण केला जातो.
- याची वायुप्रवाह प्रणाली फुफ्फुसीय आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, बहुतेक ध्वनींप्रमाणेच, केवळ बरगड्यांमधील स्नायू आणि पोटाच्या स्नायूंच्या साहाय्याने हवा बाहेर ढकलून याचे उच्चारण केले जाते.
कोणत्या भाषेत असते?
[संपादन]| भाषा | शब्द | आयपीए | अर्थ | नोंदी | |
|---|---|---|---|---|---|
| सुग्प्याक़ | eqeshngarluni/अक़स्ङाख़्लुनी | [əqəsŋ̊aχluni] | 'एकदा शिंकणे' | सुग्प्याक़ भाषा पहा. | |
| बर्मी[१] | ငှါး / ङा: | [ŋ̊á] | 'कर्ज घेणे' | ||
| मध्य अलास्का यूपिक[२] | calisteńguciquq/चालीस्टेङुचिक़ुक़ | [tʃaˈlistəˈŋ̊utʃɪquq] | 'तो कामगार बनेल' | ||
| मध्य सायबेरी यूपिक[३] | aaptengnga/आप्टङा | [aːptəŋ̊a] | 'मला उत्तर द्या!' | ||
| तॅमीन | *ngi/*ङी | [ŋ̊i] | 'तंबाखू' | ||
| फेरोई[४][५] | onkur/ओङ्खुर् | [ˈɔŋ̊kʰʊɹ] | 'कोणीही' | घोष कण्ठ्याच्या आधी /n/ चे उपध्वनी.फेरोई ध्वनीशास्त्र पहा | |
| इस्लेन्स्का[४] | einkalíf/एङ्कालीफ | [ˈe(i̯)ŋ̊ˑkäˌliˑf]ⓘ | 'खाजगी आयुष्य' | घोष कण्ठ्याच्या आधी /n/ चे उपध्वनी.इस्लेन्स्का ध्वनीशास्त्र पहा. | |
| पा ना[६] | [ma˧˩.ŋ̊ŋ̍˧˩˧] | 'जळू' | |||
| स्कॉटी गेली[७] | banca/बाङ्क | [ˈb̥ɑŋ̊kə] | 'बँक/अधिकोष' | घोष कण्ठ्याच्या आधी /n/ चे उपध्वनी. | |
| वाशिव इत्लु[८] | dewŊétiʔ/देवङेतीऽ | [dewˈŋ̊etiʔ] | 'उतार असलेले पठाराची बाजू' | ||
| वेल्श[९] | fy nghot/व ङॉत | [və ŋ̊ɔt] | 'माझे कोट' | /k/ चे अनुनासिक उत्परिवर्तनला होते. वेल्श ध्वनीशास्त्र पहा | |
| शुमी | खालाती[१०] | [ŋ̊ɑ˦mõ˦] | 'उंट' | तिबेटीपासून परिभाषिक शब्दातच जासतीप्रमाणे.[१०] | |
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]