Jump to content

अघोष ओष्ठ्यकण्ठ्य ऊष्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अघोष ओष्ठ्यकण्ठ्य ऊष्मन, किंवा अधिक अचूकपणे अघोष ओष्ठीकृत कण्ठ्य ऊष्मन आणि कधीकधी अघोष ओष्ठ-कण्ठ्य अन्तस्थ असे विश्लेषण केलेला, हा बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जाणारा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे. आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेमध्ये(आयपीए) या ध्वनीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह [xʷ], किंवा जरा संदिग्धपणे, [ʍ] आहे. [ʍ] हे चिन्ह १९७९ पर्यंत "अघोष [w]" म्हणूनच परिभाषित केले जात होते, [] जेव्हा त्याला [w] सारखेच [ k͡p ] या उच्चारस्थानासह एक ऊष्मन ज्याला [ ɡ͡b ] या उच्चारस्थानाचा एक अन्तस्थ ध्वनी असे परिभाषित केले होते. [] आयपीए माहितीपुस्तिकामध्ये [ʍ] याला ऊष्मन म्हणून प्रस्तावनेत वर्णन करते, [] तर एका अध्यायात त्याला अन्तस्थ म्हणून वैशिष्ट्यीकृत केले आहे.

वैशिष्ट्ये

[संपादन]

अघोष ओष्ठ्यकण्ठ्य ऊष्मनाची वैशिष्ट्ये:

  • याची उच्चारण पद्धत ऊष्मानिक आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवेचा प्रवाह थोडेसे आंकुचन पावून छोटेसे वाहिनी तयार करून याचे उच्चारण होते.
  • याचे उच्चारस्थान ओष्ठ्यकण्ठ्य आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे मृदू टाळूवर जिभेच्या मागील भागाच्या साहाय्य घेत ओठांना गोल करून उच्चारले जाते.
  • याची ध्वनी निर्मिती अघोष आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे स्वरतंतूंच्या कंपनांशिवाय निर्माण केले जाते. काही भाषांमध्ये स्वरतंतू जाणीवपूर्वक वेगळे ठेवले जातात, ज्यामुळे ते नेहमी अघोष राहते; तर इतर भाषांमध्ये ते सैल असतात, ज्यामुळे शेजारील ध्वनींमुळे ते सघोष होऊ शकते.
  • हे एक मौखिक व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवा नाकातून बाहेर पडू दिली जात नाही.
  • हे एक मध्य व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवेचा प्रवाह जिभेच्या बाजूने न जाता, जिभेच्या मध्यभागावरून पुढे निर्देशित करून निर्माण केला जातो.
  • याची वायुप्रवाह प्रणाली फुफ्फुसीय आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, बहुतेक ध्वनींप्रमाणेच, केवळ बरगड्यांमधील स्नायू आणि पोटाच्या स्नायूंच्या साहाय्याने हवा बाहेर ढकलून याचे उच्चारण केले जाते.

कोणत्या भाषेत असते?

[संपादन]

अघोष ओष्ठ्यकण्ठ्य ऊष्मन

[संपादन]
भाषा शब्द आयपीए अर्थ नोंदी
हुपा [] xwe꞉y / ख्वे [xʷeːj] 'त्याची मालमत्ता'
कबरदेब्जी тхуы / त्ख्व [txʷə] ⓘ 'पाच' अदगाब्जीमध्ये त्याचा उच्चार [ f ] असा होतो.
कुर्दी कुर्मांजी (उत्तर) خویشک / ख्विश्क [xʷɪʃk] 'बहीण'
कलहोरी (दक्षिण) خوەش / ख्वॅ [xʷæʃ] 'छान'
लुशूत्सीदी dʔiyb / द्ख्वऽइब [dxʷʔib] 'न्यूहालेम, वॉशिंग्टन'
फारशी शास्त्रीय पर्शियन خواستن / ख्वास्तान [xʷɑːs.ˈtan] 'इच्छा असणे' फारसीच्या आधुनिक प्रमाण बोलींमध्ये, उच्चार विकसित होऊन एक साधा अघोष कण्ठ्य ऊष्मन ( [ x ] ) ध्वनी बनला आहे.
शख्वपमखी secwepemctsín / शख्वपमख्चिन [ʃəxʷəpəməxˈtʃin] 'सख्वपमखी भाषा'
स्पॅनिश जलद भाषण juego / ख्वेगो [ˈxʷe.ɣ̞o̞] 'खेळ'
वाशो Wáʔi / ख्वाऽई/वाऽई [ˈxʷaʔi] किंवा [ˈw̥aʔi] "तोच हे करत आहे"

अघोष ओष्ठ्यकण्ठ्य अन्तस्थ

[संपादन]
भाषा शब्द आयपीए अर्थ नोंदी
अल्यूट[] अटकान hwax̂ / वाख्ह [w̥aχ] 'धूर'
बेरिंग ʼЎ / वाख्ह
इंग्रजी काही स्कॉटिश आणि आयरिश भाषिकांमध्ये रिसीव्ड प्रनन्सिएशन[] whine / ह्वाइन [w̥aɪ̯n] 'कण्हणे'
पुराणमतवादी सामान्य अमेरिकी[]
आयरिश[][] [w̥ʌɪ̯n]
स्कॉटिश[][१०][]
दक्षिण अमेरिकी[११] [w̥äːn]
न्यू झीलंड[][१०][] [w̥ɑe̯n]
खाम गमाले खाम ह्वा [w̥ɐ] 'दात' अन्तस्थ म्हणून वर्णन केले जाते.[१२]
स्लोव्हेन[१३][१४] vse / ह्वसे [ˈw̥sɛ] 'सर्व'

संदर्भ

[संपादन]

 

  1. Association phonétique internationale (1952). "The International Phonetic Alphabet (revised to 1951)". Le Maître Phonétique. Troisième série. 30 (97). Front matter. JSTOR 44748475.
  2. International Phonetic Association (1978). "The International Phonetic Alphabet (Revised to 1979)". Journal of the International Phonetic Association. 8 (1–2). Supplement. JSTOR 44541414.
  3. आयपीए १९९९: ix
  4. Golla, Victor (1996). "Hupa Language Dictionary Second Edition". Oct 31, 2021 रोजी पाहिले.
  5. Головко, Е. В. (1994). Словарь алеутско-русский и русско-алеутский (беринговский диалект) [Aleut-Russian and Russian-Aleut Dictionary (Bering dialect)]. Отд-ние изд-ва "Просвещение". p. 14. ISBN 978-5-09-002312-2.
  6. "Received Pronunciation Phonology". 2019-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-20 रोजी पाहिले.
  7. 1 2 Rogers (2000), p. 120. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "FOOTNOTERogers2000" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  8. 1 2 Lass (2002), p. 121.
  9. 1 2 3 Wells (1982), p. 432. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "FOOTNOTEWells1982" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  10. 1 2 McMahon (2002), p. 31.
  11. Labov, Ash & Boberg (2006).
  12. Wilde (2016).
  13. Šuštaršič, Komar & Petek (1999), p. 136.
  14. Greenberg (2006), p. 18.