अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र
Appearance
अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (Malayalam: അഗസ്ത്യമല ജെെവ സംരക്ഷണ മേഖല) याची स्थापना २००१ साली झाली. हे क्षेत्र भारताच्या दोन राज्यात विभाजित आहे. त्याचे एकूण ३,५००.३६ चौरस किमी (१,३५१.५० चौ. मैल) क्षेत्रफळापैकी १,८२८ चौरस किमी (७०६ चौ. मैल) क्षेत्र हे केरळ राज्यात असून, उरलेले १,६७२.३६ चौरस किमी (६४५.७० चौ. मैल) क्षेत्र हे तमिळनाडू राज्यात आहे.सन २०१६ मध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र हे जागतिक संरक्षित जैविक क्षेत्राची एक कडी बनली.
याचा विस्तार केरळच्या कोल्लम व तिरुवनंतपुरम जिल्ह्यात तसेच तमिळनाडूच्या तिरुनेरवेल्ली व कन्याकुमारी जिल्ह्यात आहे. हे दक्षिण भारताच्या, पश्चिम घाटाच्या, दक्षिणी कोपऱ्यात स्थित आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |