अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुढील मजकुराची माहिती हवी ते बघायचं आहे! धन्यवाद!

Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: अविश्वकोशीय, असंबंद्ध, संदर्भहीन मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


संस्‍थेची स्‍थापना कै. श्रीधर नारायण सावंत यांच्या नेतॄत्‍वाखाली झाली. अखिल नरडवे ग्रामस्‍थ बंधूंना एकत्र आणून परस्‍परांमधे एकजूट, सेवा व बंधू प्रेम, स्‍नेह भाव आणि सहकार्य निर्माण करून नरडवे गावची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि ऐहिक पातळी उन्‍नत करणे हे संस्‍थेचे ध्‍येय आहे. तत्‍पुर्वी मुंबईत व गावात शालेय इमारत बांधणीव शैक्षणिक मदत इत्‍यादी कार्यासाठी प्रयत्‍न झाले. इ.स.१९३५ च्‍या मानाने नरडवे विकास संघ स्‍थापन होवून त्‍यात कै. रावजी विश्राम सावंत, कै. गणपत पुंडलिक सावंत, दत्‍ताराम विश्राम गण सावंत, कै. गोविंद विश्राम सावंत (नाना पोस्‍टमास्‍तर),कै. नारायण सावंत, कै. सिताराम अनाजी सावंत इ. व्‍यक्‍ती या संस्‍थेत होत्‍या. शिक्षण सेवा मंडळ हे कै. बाळक़ॄष्‍ण अमॄत सावंत यांच्‍या नेतॄत्‍वाखाली कार्यरत होते इ. माहिती उपलब्‍ध आहे. परंतू गावच्‍या इतिहासात सर्वसमावेशक व धर्मादाय आयुक्‍तांकडे नोंद झालेली अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई हीच पहिली संस्‍था होय.

कार्यक्रम[संपादन]

संस्‍थेच्‍या प्रारंभीच्‍या काळात मुंबईतीलग्रास्‍थांना एकत्र आणण्‍यासाठी १९५३ ते १९५९ हया काळात शारिरीक खेळांचे सामने, वक्‍तॄत्‍व स्‍पर्धा, नरडवे कुटुंबीयांचे स्‍नेह संमेलन, दसरा संमेलन, नाटयप्रयोग इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. तसेच सभासद संख्‍या वाढविणे, पूरग्रस्‍तांना मदत इ. कार्यदेखील झाले होते. तसेच गावातील प्राथमिक शाळेच्‍या जिर्णोरासाठी संघाने आर्थिक मदत व श्रमदान केले.

दरम्‍यान मे 1959 मध्‍ये गावात अनेक वर्ष्‍ेा अर्धवट स्थितीत बांधकाम राहीलेल्‍या शाळेच्‍या अपूर्ण इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्‍याचा महत्‍वपुर्ण व धाडसी निर्णय संस्‍थेने घेतला. भर रस्‍त्‍यावर पडक्‍या अवस्‍थेतील शाळेची अपूर्ण इमारत ही गोष्‍ट गावाच्‍या सार्वजनिक जीवनाला लांछनास्‍पद होती. गावातील तसेच मुंबईकर ग्रामस्‍थांच्‍या सहकार्याने, संस्‍थेच्‍या कार्यकर्त्‍यांनी अथक परिश्रम करून इमारतीचे बांधकाम पुर्णत्‍वास नेले. या कार्यामुळेमुंबईतील नरडवेकरांचा तरूणवर्ग संघाकडे आकॄष्‍ट झाला व कार्यकर्त्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण होवून संस्‍थेच्‍या कार्यास गती मिळाली.


अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई या संस्‍थेला पन्‍नास ७ डिसेंबर २००२ रोजी पुर्ण झाली त्‍यानिमित्‍त नरडवे येथे सुवर्ण महोत्‍सवी कार्यक्रम पार पडला.

या इमारतीचे नामकरण शिवशक्‍ती असे करून तिचे उदघाटन गावचे जेष्‍ठ नागरीक आमदार भा. बा. सावंत यांच्‍या हस्‍ते दि. १६ मे १९६० रोजी करण्‍यात आले, त्‍यावेळच्‍या सहा दिवसांच्‍या कार्यक्रमासाठी संघाचे ९५ सदस्‍य मुंबईहून गावात आल्‍याने अभुतपुर्व उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईहून गावात आलेल्‍या ग्रामस्‍थ कलाकारांच्‍या संचात तीन नाटयप्रयोग अफाट गर्दीत यशस्‍वीरित्‍या करण्‍यात आले होते.

संस्‍थेने ही इमारत जिल्‍हा स्‍थानिक बोर्डाच्‍या ताब्‍यात देण्‍याचे ठरविले होते परंतु गावात सुरू झालेल्‍या इंग्रजी शाळेच्‍या वर्गाची बसण्‍याची गैरसोय असल्‍याने शिवशक्‍ती इमारतीत इंग्रजी शाळेचे वर्ग बसवण्‍यास संघाने अनुमती दिली.


नरडवे इंग्लिश स्‍कूल[संपादन]

नरडवे इंग्लिश स्‍कूल या नावाने संस्‍थेने अनेक वर्ष चालविलेल्‍या माध्‍यमिक शाळेची स्‍थापना माजी आमदार कै. भा. बा. सावंत यांनी कणकवली भाग एज्‍युकेशन सोसायटी मार्फत इ.स. १९५९ मध्‍ये केली. गावांत हायस्‍कुल सूरू करण्‍यात कै. रामचंद्र दाजी सावंत तथा रामभाउ (गुरूजी) यांचा प्रथम उल्‍लेख करावा लागेल. सुरूवातीचे आठवीचे वर्ग शिकविण्‍यासाठी कै. शांताराम शंकर सावंत (बाबूराव) व श्री. नारायण दामोदर राणे उर्फ अण्‍णा राणे तसेच कै. लवू विश्राम सावंत इ. नी काही काळ विनावेतन योगदान दिले. इ.स. १९६१ पासून अखिल नरडवे ग्रामोद्धार संघाने हायस्कुलचा कारभार क. भा. एज्‍यु . सो. कडून आपल्‍याकडे घेतला. गावच्‍या लोकांना शिक्षण संस्‍था चालविण्‍याचा अनुभव मिळावा हा त्‍या मागचा हेतू होता. हायस्‍कुल चालविणे ही गोष्‍ट म्‍हणजे प्रतिकुल आर्थिक स्थितीमुळे संघापुढे मोठे आव्‍हान होते. त्‍यावेळी आर्थिक जबाबदारी पेलण्‍यासाठी ग्रामस्‍थांनी रोख अगर धान्‍यरूपाने वर्गणी दिली त्‍या संबंधी संस्‍थेच्‍या आठव्‍या वार्षिक अहवालात पुढील उल्‍लेख आहे ही जी वसूली करण्‍यात आली जिच्‍या यशात वाटा काही स्‍थानिक ग्रामस्‍थांकडे विशेष पोहोचतो की ज्‍यांनी आपली खाजगी कामे बाजूला सारून संबंध गावात तसेच शेजारच्‍या गावी रात्री अपरात्री फिरून अविश्रांत मेहनत घेवून मोठया चिकाटीने आणि आस्‍थेने ही वर्गणी वसूल केली. त्‍यांनी आम्‍हाला कायमचे उपकॄत करून ठेवले आहे. अर्धपगारी रजेमुळे आपली आर्थिक झीज सोसून खास या कार्याला वाहून घेणारे श्री अनंत सखाराम सावंत (शिक्षक), चिकाटीने प्रयत्‍न करणारे श्री तात ‍‍ञिंबक सावंत (सरपंच), लवू गोविेंद सावंत, श्रीधर यशवंत सावंत तथा शिरी काका, पुतळाजी बाळ सावंत, कॄष्‍णा धोंडू सावंत, बळीराम गणपत सावंत, जनार्दन राजाराम सावंत, तसेच आर्थिक सहकार्य करणारे श्री गोविंद महादेव सावंत (पोलिसपाटील), गोविंद विश्राम सावंत (नाना पोष्‍ट मास्‍तर ) रामचंद्र सखाराम सावंत, भिकाजी कॄष्‍णा ढवळ, धोंडू धाकु ढवळ, शांताराम शंकर सावंत, गण सावंत बाळ सावंत, विठठल सिताराम सावंत (मास्‍तर), कॄष्‍णाजी नारायण सावंत, सखाराम धाकू सावंत, शांतारामबुवा मेस्‍त्री, आणि रामचंद्र राजाराम सावंत या सर्वांच्‍या सहकार्यामुळेच हा निधि उपलब्‍ध होवू शकला. हे कार्य सुमारे १० ते २० वर्ष सतत चालू होते.

हायस्‍कुलचे प्रशासन[संपादन]

हायस्‍कुलचे प्रशासन चालविण्‍यासाठी तात्‍कालीन सरचिटणीस कै. श्री. ना. सावंत यांनी अतोनात परिश्रम घेतले. लोकसंघटन, शैक्षणिक बाबींचा सखोल अभ्‍यास, शिक्षणाधिका–यांच्‍या भेटीगाठी, निधीचे संकलन इ. साठी आपल्‍या प्रकृतीची पर्वा न करता सातत्‍याने व चिकाटीने आपले कार्य त्‍यांनी चालू ठेवले. या कामी तत्‍कालीन अध्‍यक्ष कै. यशवंतराव जनार्दन सावंत तथा हसनेकरदादा यांचे मार्गदर्शन व आर्थिक पाठिंबा हे संस्‍थेला वरदानच ठरले. संस्‍थेच्‍या इतर कार्यकर्त्‍यानी अनेक उपक्रम करून वर्गणीसाठी घरोघरी फिरून निधी संकलन करून हायस्‍कूलचा कारभार सांभाळण्‍यास मोलाचे सहकार्य केले.

मुख्‍याद्यापक[संपादन]

प्रारंभी हायस्‍कुलसाठी मुख्‍याद्यापक मिळविणे ही अडचणीची बाब होती. तरी देखील श्री. मोडक, श्री कुळकर्णी, श्री दामले इ. मुख्‍याद्यापकांच्‍या कारकीर्दी उल्‍लेखनीय होत्‍या. इ.स. १९६९ मध्‍ये श्री मोहन शांताराम मिशाळया अनुभवी व कार्यतत्‍पर मुख्‍याद्यापकांची नियुक्‍ती झाल्‍यावर या प्रशालेला स्‍थैर्य प्राप्‍त होउन तिची उन्‍नती झाली. उत्‍तम प्रशासकीय कौशल्‍य, उत्‍कृष्‍ठ अध्‍यापन कौशल्‍य, योग्‍य पर्यवेक्षण व संस्‍थ्‍ोला मनापासून सहकार्य देण्‍याची वृत्‍ती या त्‍यांच्‍या गुणांमुळे 24 वर्षाच्‍या त्‍यांच्‍या दिर्घ कारकीर्दीत हायस्‍कुलचा शैक्षणिक दर्जा उंचावला. शालान्‍त परीक्षेत गुणांचे उच्‍चांक प्रस्‍थापित करणारे निकाल लागले. आपापलेनिकाल उत्‍तम लावण्‍यासाठी झटणा–या शिक्षक बंधुचे सहकार्य त्‍यांना लाभले व शाळेची सर्वांगीण उन्‍नतीची कारकीर्द पूर्ण करून इ. स. १९९२ मध्‍ये त्‍यांना विदयार्थी, शिक्षक, संस्‍था व गाव यांच्‍या तर्फे भावपूर्ण भव्‍य सत्‍कार करून सेवानिवृत्‍तीचा निरोप देण्‍यात आला . त्‍यांच्‍या नंतर मुख्‍याद्यापक श्री रूपाजी जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली माध्‍यमिक विद्यालयाची प्रगती चालू होती.

यश प्राप्ती[संपादन]

श्री सतीश सदाशिव पवार या विदयार्थ्‍याने कोल्‍हापूर विभागात सन १९९२ मध्‍ये गुणवत्‍ता यादीत १७ वा व मागास वर्गीयात पहिला क्रमांक मिळवून शाळेला अभूतपुर्व यश मिळवून दिले. व संस्‍थेचा नावलौकीक वाढविला हे नमूद करतांना अभिमान वाटतो. याच्रपमाणे क्रीडा स्‍पर्धा, चित्रकला, वक्‍तृत्‍व स्‍पर्धा इ विविध क्षेत्रात शाळेच्‍या विदयार्थ्‍यांनी अनेक पारितोषके मिळविली आहेत व मिळवत आहेत.