अक्षय बर्दापूरकर
अक्षय विलास बर्दापूरकर हे एक भारतीय चित्रपट निर्माता आणि उद्योजक असून ते प्लॅनेट मराठी ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.[१]
| अक्षय बर्दापूरकर | |
|---|---|
|
| |
| जन्म |
अक्षय विलास बर्दापूरकर १८ मे १९८० छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व |
भारतीय |
| कारकीर्दीचा काळ | इ.स. २००७ - चालू |
| भाषा | मराठी, हिंदी |
| शिक्षण | पदवीधर |
| अधिकृत संकेतस्थळ | https://akshaybardapurkar.com/ |
जीवन
[संपादन]अक्षय बर्दापूरकर यांचा जन्म १८ मे १९८० रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून ते पदवीधर असून आणि ब्रँड मॅनेजमेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे.
कारकीर्द
[संपादन]२००७ या वर्षी अक्षय बर्दापूरकर यांनी ब्रायन ऍडम्स आणि बॅकस्ट्रीट बॉईज सारख्या जागतिक कलाकारांसह व्यावसायीक कार्यक्रम आयोजित करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यासोबतच त्यांनी कलाकार व्यवस्थापन आणि ब्रँड-इमेजिंग संस्था स्थापन केली.
बर्दापूरकर यांनी रेगे (२०१४) या मराठी चित्रपटासाठी मुख्य समन्वयक म्हणून काम केले असून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर समीक्षकांची प्रशंसा मिळाली.
प्लॅनेट मराठी ग्रुप
[संपादन]२०२१ मध्ये बर्दापूरकर यांनी भारतातील पहिली मराठी भाषा समर्पित प्लॅनेट मराठी ही स्ट्रीमिंग सेवा सुरू केली.[२][३] जानेवारी २०२४ पर्यंत प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते, ५,५०,००० हून अधिक ऍप इंस्टॉल आणि २४ दशलक्षांहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज होते.[४] मराठीच्या पलीकडे विस्तार करत अक्षय बर्दापूरकर यांनी अनेक भारतीय प्रादेशिक भाषांना लक्ष्य करणाऱ्या प्लॅनेट भारत आणि प्लॅनेट गोएम या नवीन प्लॅटफॉर्मची घोषणा केली.[५][६]
इतर उपक्रम
[संपादन]आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च २०२५) बर्दापूरकर यांनी प्लॅनेट स्त्री या नवीन प्लॅटफॉर्मची घोषणा केली.[७][८] हा महिलांसाठी असलेला भारतातील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट, मालिका, वेब सिरीज, चित्रपट उपलब्ध असतील.
चित्रपट
[संपादन]| वर्ष | चित्रपट |
|---|---|
| २०२२ | गोष्ट एका पैठणीची[९] |
| २०२२ | तमाशा लाइव्ह[१०] |
| २०२२ | पाँडिचेरी |
| २०२२ | चंद्रमुखी[११] |
| २०२२ | सनी |
| २०२० | एबी आणि सीडी[१२] |
| अप्रकाशित | मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी[१३][१४] |
वेब सिरीज
[संपादन]- रानबाजार (२०२२)[१५]
सन्मान
[संपादन]- गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सन्मानित[१६][१७]
- फोर्ब्स इंडिया मासिकात वैशिष्ट्यीकृत[१८]
- व्होग इंडियामध्ये वैशिष्ट्यीकृत
संदर्भ
[संपादन]- ↑ "अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अक्षय बर्दापूरकर 'प्लॅनेट मराठी ओटीटी' घेऊन येणार 10 नव्या कोऱ्या वेब सिरीज". दिव्य मराठी.
- ↑ "अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म". दिव्य मराठी.
- ↑ "मराठीतील पहिला OTT प्लॅटफॉर्म बंद होणार? अक्षय बर्दापूरकरांवर दिवाळखोरीची कारवाई". न्यूझ१८ मराठी. 2025-04-12. 2025-08-05 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Marathi OTT platform Planet Marathi records 500% increase in subscriber base | Today News". Mint (इंग्रजी भाषेत). 2022-09-04. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "Goa CM, Pramod Sawant launches an exclusive Konkani content OTT platform, Planet Goem". The Times of India. 2022-10-10. ISSN 0971-8257.
- ↑ "Planet Marathi Group to launch news vertical". Mint (इंग्रजी भाषेत). 2023-04-25. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "अक्षय बर्दापुरकर ने भारत के पहले महिला-केंद्रित OTT प्लेटफॉर्म की घोषणा की". jantaserishta.com (हिंदी भाषेत). 2025-03-08. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "महिला दिनानिमित्त 'प्लॅनेट मराठी ओटीटी' कडून स्त्रियांना खास भेट; मिळणार फ्री सबस्क्रिप्शन". एबीपी माझा. 2022-03-05. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "गोष्ट एका पैठणीची". महाराष्ट्र टाइम्स. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "'तमाशा लाईव्ह' मधील 'वाघ आला'गाणं रिलीज; १५ जुलैला चित्रपट होणार प्रदर्शित". एबीपी माझा. 2022-06-22. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "'दिग्दर्शनातील स्वातंत्र्य महत्त्वाचे'". सकाळ. 2020-11-14. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "AB Aani CD producer Akshay Bardapurkar: To recreate the film's momentum is going to be a difficult task". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-03-19. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "Sonalee Kulkarni's Mogalmardini Chhatrapati Tararani To Release On March 22". News18 (इंग्रजी भाषेत). 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट". पुढारी न्यूझ. 2021-11-07. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "'रानबाजार' वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स". महाराष्ट्र टाइम्स. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपट आता पाहता येणार OTT वर; तेही पूर्ण सबस्क्रिप्शन न घेता". टीव्ही९ मराठी. 2023-02-08. 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "Planet Marathi's Akshay Bardapurkar Awarded By The President Of India For Goshta Eka Paithanichi". Business World (इंग्रजी भाषेत). 2025-08-05 रोजी पाहिले.
- ↑ "Working With Stalwarts Like Big B And Vikram Gokhale Was Like Being In An Institution Of Great Talent: 'AB Aani CD' Producer Akshay Bardapurkar — Transcontinental Times" (इंग्रजी भाषेत). 2020-06-21. 2025-08-05 रोजी पाहिले.