अंबिका बेरी
अंबिका बेरी (अंबिका सभरवाल) | |
---|---|
![]() अंबिका बेरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार(२०१७) स्विकारताना | |
जन्म |
अंबिका सूरज सबरवाल १९५८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | टेक्सटाइल डिझायनिंग पदविका |
मालक | इंडियन आर्ट गॅलरी |
जोडीदार | संजीव बेरी |
वडील | सूरज प्रकाश सभरवाल |
आई | राणी सभरवाल |
पुरस्कार | नारी शक्ती पुरस्कार |
अंबिका बेरी (पूर्वाश्रमीच्या: अंबिका सभरवाल) या भारतीय कलादालनाच्या (इंडियन आर्ट गॅलरीच्या) मालक आहेत. अंबिका जुन्या कचऱ्यापासून अशा कलाकृतींना जन्म देते ज्यामुळे लोकांच्या घरांचे सौंदर्य वाढते. जुन्या वस्तूंपासून बनवलेल्या अमूल्य कलाकृतींनी, त्यांनी मैहरच्या इचौल या गावाला अद्भुत कलेचे केंद्र बनवले आहे. हे गाव आता कलाकार, लेखक आणि शिल्पकारांसाठी भारतातील सर्जनशील आश्रयस्थान बनले आहे. याकामासाठी बेरी यांना २०१८ साली नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]
जीवन
[संपादन]१९५८ मध्ये जालंधर (पंजाब) येथे जन्मलेल्या अंबिकाचे वडील सूरज प्रकाश सभरवाल हे वास्तुविशारद होते आणि आई राणी सभरवाल गृहिणी होत्या. सभरवाल दाम्पत्याच्या दोन मुलांमध्ये (एक मुलगा आणि एक मुलगी) मोठी असलेली अंबिका हिला लहानपणापासूनच कलाकृती तयार करण्याची आणि चित्रकलेची आवड होती. ती घरात पडलेल्या निरुपयोगी गोष्टींना हाताळून त्यांना एक नवीन आकार द्यायची. अंबिकाने तिचे शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट (बोर्डिंग) डलहौसी, हिमाचल प्रदेश येथील सिनियर केंब्रिज येथे केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली पॉलिटेक्निकमधून टेक्सटाइल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला. टेक्सटाईलमध्ये डिप्लोमा केल्यानंतर, त्यांनी १९८० मध्ये 'विचित्र साडी' मध्ये डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली. एक वर्ष तिथे काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. दरम्यान, १९८२ मध्ये अंबिकाचे लग्न कोलकाता येथील रहिवासी संजीव बेरीशी झाले. संजीव बेरी हे सतना जिल्ह्यात स्थापन केलेला सँडरसन मिनरल्स हा कौटुंबिक व्यवसाय चालवत होते.[१][२]
बेरी ह्या एक कलादालनाच्या संस्थापक आहेत.[३] हे कलादालन सन १९९० मध्ये कोलकाता येथे उघडले गेले होते. या कलादालनाला गॅलरी संस्कृती असे संबोधले जाते.[२]
बेरी यांनी कलाकारांसाठी एक रिट्रीट स्थापन केले.[३] त्याला "आर्ट इचोल" असे म्हणतात आणि ते "कलाकार, लेखक आणि शिल्पकारांसाठी भारतातील एकमेव कायमस्वरूपी सर्जनशील रिट्रीट" असल्याचे म्हटले जाते. हे रिट्रीट इचल या छोट्या गावात आहे जे खजुराहोच्या पर्यटन क्षेत्रापासून १४० किमी अंतरावर आहे.[४]
बेरी यांनी मैहरमध्ये राहणारे बंगाली सरोद वादक, बहु-वादन वादक आणि संगीतकार अलाउद्दीन खान यांचे घर पुनर्संचयित केले. या घराचे तीन भाग केले असून पैकी दुसऱ्या भागात कलाकारांसाठीचे निवासस्थान बनवण्यात आले, तर तिसऱ्या क्षेत्रात लेखकांसाठीची सोय करण्यात आली आहे.[५] यात तीन एकरांच्या शिल्पकला पार्कचा समावेश करण्यात आला आहे. हा परिसर प्रदर्शनासाठी असलेल्या कलाकृतींनी भरलेला आहे, ज्यामध्ये सरोद वाजवणाऱ्या अल्लाउद्दीन खानचा पुतळा देखील आहे.[२]
२०१८ मध्ये बेरी यांना "महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान" म्हणून ओळखला जाणारा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[५] २०१८ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी बेरी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[६][३] भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी देखील उपस्थित होत्या. त्या वर्षी सुमारे ३० लोक आणि नऊ संस्थांना सन्मानित करण्यात आले, त्यांना पुरस्कार आणि प्रत्येकी $१००,००० चे बक्षीस मिळाले.[७][८]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "अंबिका बेरी: जिनके प्रयासों से एक छोटे से गाँव को मिली नई पहचान". २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b c "Ambica Beri's Art Ichol: A creative retreat for artists, writers & sculptors in Madhya Pradesh". The Economic Times. 2021-01-14 रोजी पाहिले.
- ^ a b c "Meet Ms. Ambika Beri, #NariShakti Puraskar 2017 awardee". PIB India. 7 March 2018. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "India crowns up Sheroes with 'Nari Shakti Puraskar' to mark Int'l Women's Day". www.newsbharati.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-14 रोजी पाहिले.
- ^ a b "Judge, Doctor, Scholar, Conservationist: 10 Women Honored at Rashtrapati Bhavan". The Better India (इंग्रजी भाषेत). 2018-03-08. 2021-01-14 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-13 रोजी पाहिले.
- ^ "On International Women's Day, the President conferred the prestigious Nari Shakti Puraskars to 30 eminent women and 9 distinguished Institutions for the year 2017". pib.gov.in. 2021-01-14 रोजी पाहिले.
- ^ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 9 March 2018. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-08 रोजी पाहिले.